Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

33 किमीचा मायलेज अन् किंमत 6.25 लाख रुपये! February 2026 मध्ये ग्राहकांनी ‘या’ कारला दिलासा तुफान प्रतिसाद

जर तुम्ही स्वस्त किमतीत चांगली मायलेज देणारी कार खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण देशातील सर्वाधिक विकली जाणारी सेडान कारबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 01, 2026 | 08:57 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • देशात सेडान कारला चांगली मागणी
  • Maruti Suzuki Dzire ठरली सर्वाधिक विकली जाणारी सेडान कार
  • फेब्रुवारी 2026 मध्ये 19,326 युनिट्सची विक्री
फेब्रुवारी 2026 हा महिना भारतीय कार बाजारपेठेतील सेडान विभागासाठी खास होता. एंट्री-लेव्हल सेडान Maruti Suzuki Dzire ने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये या कारचे 19,326 युनिट्सची विक्री झाली आहे. डिझायर केवळ सर्वाधिक विक्री होणारी सेडानच नाही तर ती देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी कार देखील बनली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

एसयूव्हीचा ट्रेंड वाढत असला तरी, डिझायरने दाखवून दिले आहे की सेडानची मागणी कमी झालेली नाही. 19,326 युनिट्सची विक्री दर्शवते की डिझायर ही एक पसंतीची फॅमिली कार आहे. जास्त मायलेज आणि कमी देखभाल खर्चामुळे टॅक्सी आणि फ्लीट सेगमेंटमध्ये ती मजबूत उपस्थिती राखते.

‘या’ Electric Bikes तुमचं कॉलेज लाइफ गाजवतील! लूक असा जो भल्याभल्या स्पोर्ट बाईकला लाजवेल

मारुती डिझायर ग्राहकांमध्ये इतकी लोकप्रिय कशी?

उत्तम मायलेज

Maruti Suzuki Dzire ही कार उत्कृष्ट मायलेजसाठी ओळखली जाते. Maruti Suzuki च्या कार्स नेहमीच इंधन बचतीसाठी प्रसिद्ध आहेत आणि डिजायर या बाबतीत आघाडीवर आहे.

परवडणारी किंमत

Maruti Suzuki Dzire किफायतशीर किमतीत प्रीमियम लुक आणि आरामदायी केबिन देते. त्यामुळे बजेटमध्ये चांगली आणि स्टायलिश सेडान शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ही कार आकर्षक पर्याय ठरते.

विश्वासार्ह इंजिन

Maruti Suzuki Dzire मध्ये विश्वासार्ह इंजिन देण्यात आले आहे. कमी मेंटेनन्स खर्च आणि देशभरात मजबूत सर्विस नेटवर्क असल्यामुळे ग्राहकांचा या कारवर विश्वास अधिक वाढतो.

TATA Motorsची Tiago EV आता आणखी ‘पॉवरफुल’! नव्या अवतारात मिळणार जबरदस्त रेंज आणि प्रीमियम फीचर्स

फॅमिली आणि कमर्शियल वापरासाठी योग्य

मोठा बूट स्पेस आणि आरामदायी रिअर सीट्समुळे Maruti Suzuki Dzire ही कार कौटुंबिक वापरासोबतच कमर्शियल वापरासाठीही उत्तम पर्याय ठरते. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीही ही कार आरामदायी आहे.

SUV च्या काळात सेडानची पुन्हा एन्ट्री?

गेल्या काही वर्षांत SUV सेगमेंटची मागणी झपाट्याने वाढली आहे. मात्र Maruti Suzuki Dzire च्या यशामुळे योग्य किंमत, चांगले मायलेज आणि विश्वासार्हता असल्यास सेडान कार्स अजूनही बाजारात मजबूत स्पर्धक ठरू शकतात, हे स्पष्ट झाले आहे.

फेब्रुवारी 2026 मध्ये 19,326 युनिट्सची विक्री करत डिजायरने पुन्हा एकदा आपली लोकप्रियता सिद्ध केली. भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह फॅमिली सेडानपैकी एक म्हणून डिजायरची ओळख अधिक मजबूत झाली आहे.

जर पुढील काही महिन्यांतही हीच विक्रीची गती कायम राहिली, तर Maruti Suzuki Dzire लवकरच नंबर-1 कार होण्याच्या शर्यतीतही पुढे येऊ शकते.

Web Title: Maruti suzuki dzire 19326 units sold in february 2026 become most selling sedan car in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 08:57 PM

Topics:  

  • automobile
  • Maruti suzuki Dzire
  • record sales

संबंधित बातम्या

Renault धमाका करण्यास सज्ज! लवकरच पेट्रोल आणि EV पर्यायात आणणार ‘ही’ खास SUV
1

Renault धमाका करण्यास सज्ज! लवकरच पेट्रोल आणि EV पर्यायात आणणार ‘ही’ खास SUV

आकर्षक बँक ऑफर्ससह ४ वर्षांची वॉरंटी! Vijay Sales कडून Xiaomi टीव्ही एस मिनी एलईडी सिरीजचे प्री-बुकिंग सुरू
2

आकर्षक बँक ऑफर्ससह ४ वर्षांची वॉरंटी! Vijay Sales कडून Xiaomi टीव्ही एस मिनी एलईडी सिरीजचे प्री-बुकिंग सुरू

Classic 350 ची क्रेझ कमी होणार? Triumph ची नवीन बाईक मार्केट गाजवण्याचा तयारीत
3

Classic 350 ची क्रेझ कमी होणार? Triumph ची नवीन बाईक मार्केट गाजवण्याचा तयारीत

‘या’ तारखेपासून Volvo च्या Cars महागणार! अचानक का वाढवली किंमत? जाणून घ्या
4

‘या’ तारखेपासून Volvo च्या Cars महागणार! अचानक का वाढवली किंमत? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.