Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या ऑटो क्षेत्राला जागतिक बाजारपेठेत मोठी झेप घेण्याची संधी! पंतप्रधान मोदींचा वाहन कंपन्यांना महत्त्वाचा संदेश

भारताचा ऑटो उद्योग जागतिक बाजारपेठेत नंबर वन होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय का? पंतप्रधान मोदींच्या संदेशामुळे संशोधन, तंत्रज्ञान आणि निर्यातीत मोठ्या संधींचे संकेत मिळाले आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 06, 2026 | 08:09 PM
भारताच्या ऑटो क्षेत्राला जागतिक बाजारपेठेत मोठी झेप घेण्याची संधी! पंतप्रधान मोदींचा वाहन कंपन्यांना महत्त्वाचा संदेश
Follow Us
Follow Us:
  • पंतप्रधान मोदींनी वाहन कंपन्यांना संशोधन, तंत्रज्ञानातील गुंतवणूक आणि जागतिक बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करण्याचा संदेश दिला.
  • भारत सध्या जगातील तिसरा मोठा ऑटो उद्योग असून भविष्यात नंबर वन होण्याची क्षमता असल्याचे गडकरी म्हणाले.
  • इलेक्ट्रिक वाहने, स्वच्छ इंधने, वाहन सुरक्षा आणि जुन्या वाहनांच्या स्क्रॅपिंगमुळे भारतीय ऑटो क्षेत्रात मोठे बदल अपेक्षित आहेत.
भारताचा ऑटोमोबाईल उद्योग सध्या वेगाने बदलत असून, देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढल्यामुळे जागतिक बाजारपेठेत मोठी संधी निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहन कंपन्यांना संशोधन, नव्या तंत्रज्ञानातील गुंतवणूक यावर भर देण्याचे आवाहन केले आहे.

नवी दिल्ली इथे झालेल्या सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या 66व्या वार्षिक अधिवेशनासाठी दिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी भारताची जागतिक ऑटो क्षेत्रातील भूमिका अधिक मजबूत होऊ शकते, असे नमूद केले. नवीन मुक्त व्यापार करारांमुळे भारतीय वाहन उद्योगाला परदेशी बाजारपेठांमध्ये पोहोच वाढवण्याची संधी मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

गणेशोत्सवात कार घेण्याचा विचार करताय? पुणे आणि मुंबई शहरांत हे आहेत पंचांगानुसार ५ सर्वात उत्तम मुहूर्त! आत्ताच पाहून घ्या

इलेक्ट्रिक वाहनांसह स्वच्छ इंधनांकडे वाढता कल

ऑटो क्षेत्रात ऊर्जा कार्यक्षमता, स्वच्छ इंधने, इलेक्ट्रिक मोबिलिटी, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगत उत्पादन पद्धतींमुळे मोठे परिवर्तन होत आहे. वाढत्या चार्जिंग पायाभूत सुविधांमुळे इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकारही वाढत असून, यामुळे कंपन्यांसाठी नव्या व्यवसायाच्या संधी निर्माण होत आहेत.

गडकरींचा भारताला नंबर 1 ऑटो उद्योग बनवण्याचा विश्वास

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारताकडे मोठी बाजारपेठ, अभियांत्रिकी कौशल्य आणि उत्पादन क्षमता असल्याचे सांगितले. सध्या भारत जगातील 3ऱ्या क्रमांकाचा ऑटो उद्योग असून, भविष्यात नंबर 1 होण्याची क्षमता देशात असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

5 दमदार इलेक्ट्रिक बाइक्स येत्या वर्षभरात होणार भारतात लाँच! पाहा कोणती बाईक ठरेल तुमच्यासाठी योग्य

गडकरी यांनी इलेक्ट्रिक वाहने, जैवइंधने आणि भविष्यात ग्रीन हायड्रोजनसारख्या पर्यायांवरही भर दिला. विशेषतः ट्रक आणि बस यांसारख्या अवजड वाहनांमध्ये स्वच्छ तंत्रज्ञानाचा वापर वेगाने वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

वाहन सुरक्षा आणि जुन्या वाहनांवरही लक्ष

भारतामध्ये वाहन सुरक्षा सुधारण्यासाठी भारत एनसीएपी अंतर्गत 11 कंपन्यांच्या 30 पेक्षा अधिक मॉडेल्सना प्रमाणपत्र मिळाल्याचे गडकरी यांनी सांगितले. जुन्या वाहनांचे स्क्रॅपिंग, रेट्रोफिटिंग आणि प्रदूषण कमी करण्यासाठी वाहन कंपन्यांनी अधिक सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: India auto industry global growth opportunity pm modi message auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 08:09 PM

Topics:  

  • automobile
  • narendra modi
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

गणेशोत्सवात कार घेण्याचा विचार करताय? पुणे आणि मुंबई शहरांत हे आहेत पंचांगानुसार ५ सर्वात उत्तम मुहूर्त! आत्ताच पाहून घ्या
1

गणेशोत्सवात कार घेण्याचा विचार करताय? पुणे आणि मुंबई शहरांत हे आहेत पंचांगानुसार ५ सर्वात उत्तम मुहूर्त! आत्ताच पाहून घ्या

5 दमदार इलेक्ट्रिक बाइक्स येत्या वर्षभरात होणार भारतात लाँच! पाहा कोणती बाईक ठरेल तुमच्यासाठी योग्य
2

5 दमदार इलेक्ट्रिक बाइक्स येत्या वर्षभरात होणार भारतात लाँच! पाहा कोणती बाईक ठरेल तुमच्यासाठी योग्य

Hyundai कारवर सप्टेंबरमध्ये बंपर ऑफर! तब्बल १ लाख रुपयांपर्यंत मिळणार डिस्काउंट
3

Hyundai कारवर सप्टेंबरमध्ये बंपर ऑफर! तब्बल १ लाख रुपयांपर्यंत मिळणार डिस्काउंट

Honda Elevate New Version: होंडा एलिव्हेटचे नवीन व्हर्जन लवकरच होणार लाँच; पाहा काय-काय बदलणार!
4

Honda Elevate New Version: होंडा एलिव्हेटचे नवीन व्हर्जन लवकरच होणार लाँच; पाहा काय-काय बदलणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.