फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये नवनवीन कार्स लाँच होत आहे. यात इलेक्ट्रिक वाहनं मोठ्या प्रमाणात लाँच होताना दिसत आहे. ग्राहक देखील या नवीन कार्सना जोरदार प्रतिसाद देताय. मात्र, आज ज्या देशात विविध सेगमेंट कार लाँच होत आहेत, त्याच देशात सर्वात पहिली कोणती कार लाँच झाली? हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?
आजच्या काळात आपल्याला रस्त्यांवर अनेक लक्झरी कार दिसतात. त्यात एसयूव्ही, सेडानचे अनेक मॉडेल्सचा समावेश आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की भारतातील पहिली कार कोणती होती, जी भारतात बनवली गेली होती. देशातील या पहिल्या कारचे नाव The Ambassador असे आहे. एक काळ, जेव्हा या कारची क्रेझ भारतभर होती.
लाँच होण्याअगोदर Vida च्या Electric Scooter चा टिझर सोशल मीडियावर जारी, मिळाली ‘ही’ महत्वाची माहिती
पहिली गाडी अॅम्बेसेडर 1948 मध्ये भारतात बनवण्यात आली होती. सुरुवातीला ही कार हिंदुस्तान लँडमास्टरच्या नावाने आणण्यात आली होती. ही कार ब्रिटिश ब्रँडच्या लोकप्रिय कार मॉरिस ऑक्सफर्ड सीरिज 3 वर आधारित मॉडेल आहे.
अॅम्बेसेडरमध्ये 1.5 लिटर इंजिन होते, जे 35 बीएचपीची पॉवर देत असे. ही कार त्या काळातील सर्वात पॉवरफुल कारपैकी एक होती. ही कार दशकांपासून भारतीय ऑटो बाजारपेठेचा अभिमान होती. देशातील बहुतेक मोठ्या राजकारण्यांना या कारमध्ये प्रवास करायला आवडायचे. काळानुसार, या कारमध्ये अनेक अपडेट्स देखील देण्यात आले.
अॅम्बेसेडर कारला बॉक्सी आकार होता. या कारला क्रोम ग्रिल, गोल हेडलाइट्स आणि टेल फिन्ससह रेट्रो डिझाइन देण्यात आले होते. या कारने शेवटच्या मॉडेलपर्यंतही त्याचे आयकॉनिक डिझाइन कायम ठेवले. या कारचे इंटिरिअर देखील खूप आलिशान होते.
या कारमध्ये बूस्टेड प्लश सीट्स आणि भरपूर लेगरूम होते. ही कार लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी देखील खूप आरामदायी होती. या कारमध्ये पॉवर स्टिअरिंग, एअर कंडिशनिंग सारखे फीचर्स देखील देण्यात आले होते.
फक्त एका छोटाश्या प्लास्टिक पार्टने Tesla चे टेन्शन वाढवले ! फटाफट रिकॉल केला जारी
हिंदुस्तान मोटर्सने 2013 मध्ये ॲम्बेसेडरचे शेवटचे मॉडेल लाँच केले. ॲम्बेसेडरच्या या शेवटच्या व्हर्जनचे नाव Encore होते. या कारमध्ये बीएस4 इंजिन बसवण्यात आले होते. इंजिनसोबत या कारमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला होता. 2014 मध्ये हे मॉडेल बंद झाल्यानंतर, भारतीय बाजारात अनेक दशकांपासून विकले जाणारी ही कार बंद झाली.
हिंदुस्तान मोटर्सच्या या कारचे अनेक मॉडेल्स MK1, MK2, MK3, MK4, Nova, Grand या नावांनी बाजारात आले. ही पहिली मेड-इन-इंडिया कार होती. ती भारतातील पहिली डिझेल-इंजिन कार देखील बनली. कंपनीने 2014 मध्ये या कारची विक्री बंद केली. पण त्यानंतरही काही लोकं अजूनही ही कार वापरत आहेत.
जेव्हा ही कार पहिल्यांदा भारतीय बाजारात आणली गेली तेव्हा या कारची किंमत सुमारे 14 हजार रुपये ठेवण्यात आली होती. पण आजच्या काळानुसार या कारची किंमत पाहिली तर तिची किंमत अंदाजे 14 लाख रुपये मानता येईल.