फोटो सौैजन्य: @UPTeslaFremont (X.com)
ग्लोबल मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत वाढ होताना दिसत आहे. यात एलोन मस्कच्या Tesla कारची वेगळीच हवा पाहायला मिळते. टेस्लाच्या लक्झरी कार्स आणि त्यातील अत्याधुनिक फीचर्स नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. आता तर लवकरच कंपनी भारतीय मार्केटमध्ये एंट्री मारण्यास सज्ज होणार आहे. अशातच कंपनीने आपल्या एका कारसाठी रिकॉल जारी केला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
टेस्लाच्या कार्स आधुनिक तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक पॉवरसाठी जगभरात लोकप्रिय आहेत. कंपनीने नुकतेच Tesla Model Y Juniper लाँच केली आहे. मात्र, आता कारमध्ये एका मोठ्या खराबीची बातमी समोर आली आहे. ज्यामुळे कंपनीला या मॉडेलसाठी रिकॉल जारी करावा लागला आहे. हा रिकॉल एक अतिशय लहान प्लास्टिकच्या पार्टसाठी घेण्यात आला आहे. एका लहान प्लास्टिकच्या पार्टमुळे Tesla Model Y Juniper च्या हजारो मॉडेल्सना रिकॉल का करावे लागले त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
Traffic Signal साठी लाल, हिरवा आणि पिवळाच रंग का निवडला गेला? ‘ही’ आहे यामागची भन्नाट स्टोरी
Tesla Model Y Juniper ही Model Y चे अपडेटेड व्हर्जन आहे. ही कार त्याच्या डिझाइन आणि फीचर्ससाठी लोकप्रिय आहे. आता यात सुरक्षिततेबद्दल एक मोठी बातमी आहे. या कारमधील स्टिअरिंग कॉलमला जोडलेला एक छोट्याश्या प्लास्टिकच्या पार्टमधे खराबी आढळली आहे. या छोटाश्या प्लास्टिकच्या पार्टमधील खराबी पुढे मोठा धोका बनू शकतो.
अहवालानुसार, हा छोटासा प्लास्टिकचा पार्ट स्टिअरिंग व्हीलशी संबंधित आहे. जर हा पार्ट योग्यरित्या काम करत नसेल किंवा तुटला तर स्टिअरिंग कॉलम आणि व्हीलमधील कनेक्शनमध्ये समस्या निर्माण होऊ शकते. सोप्या शब्दांत सांगायचे तर, ड्रायव्हरचे स्टीअरिंगवरील पूर्ण नियंत्रण गमावण्याचा धोका वाढू शकतो, ज्यामुळे कार चालवताना अपघात होण्याची शक्यता वाढते.
Tesla Model Y Juniper च्या स्टीअरिंग कॉलमला जोडलेल्या एका लहान प्लास्टिकच्या भागात खराबी निर्माण झाली आहे. त्यांच्या 172 मॉडेल्समध्ये ही खराबी दिसून आली आहे, ज्यासाठी कंपनीने रिकॉल जारी केले आहे. ही समस्या आढळताच, कंपनीने तात्काळ कारवाई केली आणि प्रभावित मॉडेल वाई ज्युनिपर युनिट्ससाठी रिकॉल जारी केले. याचा अर्थ असा की कंपनी या कार्स परत मागवेल आणि त्या विशिष्ट प्लास्टिकच्या पार्टची दुरुस्ती करेल किंवा ते बदलेल, जेणेकरून ड्रायव्हिंग सुरक्षित पद्धतीने करता येईल.