फोटो सौजन्य: iStock
भारतीय बाजारात विविध सेगमेंटमध्ये वाहने ऑफर केली जातात. यात बाईक आणि कार्सची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. अनेक ऑटो कंपन्या आता नवनवीन तंत्रज्ञानासह बेस्ट फीचर्स असणाऱ्या बाईक्स आणि कार लाँच करत आहे.
भारतात लक्झरी कार्सना देखील मोठी मागणी मिळताना दिसत आहे. अनेकांचे स्वप्न असते की आपलीकडे देखील लक्झरी कार असावी. परंतु, महागड्या किमतीमुळे हे स्वप्न पूर्ण होत नाही. अशा लोकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
आता रोल्स रॉइस, बेंटले आणि ट्रायम्फ सारख्या लक्झरी कार्स सामान्य भारतीयांना परवडणार आहेत. याचे कारण म्हणजे भारत आणि युनायटेड किंग्डम (UK) यांच्यातील नवीन फ्री ट्रेड एग्रीमेंट (FTA) दोन्ही देशांना प्रचंड फायदे देणार आहेत. विशेषतः त्याचा परिणाम ऑटोमोबाईल क्षेत्रावर अधिक दिसून येणार आहे. या करारानंतर, लक्झरी कार आणि बाईकच्या किमतीत घट दिसून येईल. चला याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
2 लाखात ‘ही’ Electric Car होईल तुमची, फक्त लक्षात असू द्या EMI चा फंडा
भारत आता यूकेमधून येणाऱ्या उच्च दर्जाच्या कारवरील इम्पोर्ट ड्युटी 100% वरून फक्त 10% पर्यंत कमी करेल. याचा अर्थ असा की आता परदेशातून येणाऱ्या लक्झरी कार्स भारतीय बाजारात स्वस्त होणार आहे. परंतु, या वाहनांच्या संख्येवर एक निश्चित कोटा असेल, ज्यामुळे या कार्स मर्यादित प्रमाणात आयात केल्या जातील.
जग्वार लँड रोव्हर (JLR), Aston Martin, Bentleyआणि Rolls-Royce यांसारख्या यूकेमध्ये बनवलेल्या महागड्या आणि लक्झरी कार ब्रँडच्या किमती कमी होऊ शकतात. भारतात आता या कार्सच्या किमती कमी होऊ शकतात. एवढेच नाही तर, ट्रायम्फ रॉकेट 3 Evel Knievel एडिशन सारख्या यूकेमधून आयात केलेल्या काही मर्यादित एडिशनच्या बाईक्स देखील आता अधिक परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होऊ शकतात.
या करारामुळे भारतालाही चांगला फायदा होणार आहे. भारताच्या ट्रेड व्हॅल्यूच्या जवळपास 99% उत्पादनांवरील टॅरिफ काढून टाकले जाईल. याचा अर्थ असा की महिंद्रा, रॉयल एनफील्ड, टीव्हीएस, बजाज सारख्या भारतीय कंपन्यांना आता युकेमध्ये कार आणि बाईक निर्यात करणे स्वस्त आणि सोपे होईल.
आता बिनधास्त बाईक खरेदी करा ! ‘ही’ कंपनी देतेय फ्री वॉरंटी आणि जबरदस्त कॅशबॅक
महिंद्रा त्यांचे इलेक्ट्रिक मॉडेल्स BE 6 आणि XUV 9e यूकेमध्ये लाँच करण्याची तयारी करत आहे. त्याच वेळी, मारुती आणि टोयोटाच्या पहिल्या ईव्ही e-Vitara आणि अर्बन-क्रूझर देखील गुजरातमधून यूकेला निर्यात केली जाईल. कमी टॅक्समुळे, आता ही वाहने यूकेमध्ये विकणे अधिक फायदेशीर ठरणार आहे.