फोटो सौजन्य: @HyundaiIndia (X.com)
भारतीय मार्केटमध्ये आता इलेक्ट्रिक वाहनांना जोरदार मागणी मिळताना दिसत आहे. त्यात वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे देशातील ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना जास्त प्राधान्य देताना दिसत आहे. हीच वाढती मागणी पाहून, अनेक ऑटो कंपन्या देशात बेस्ट इलेक्ट्रिक कार ऑफर करत असतात. Hyundai ने देखील मार्केटमध्ये आपली इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये Hyundai Creta Electric ऑफर केली जाते. जर तुम्हाला ही कार घ्यायची असेल, तर 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, 7 वर्षांसाठी तुम्हाला दरमहा किती ईएमआय भरावा लागेल, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया. पण, त्याआधी या कारची किंमत जाणून घेऊया.
Hyundai Creta Electric Executive हा त्याचा बेस व्हेरियंट म्हणून देण्यात आला आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 17.99 लाख रुपये आहे. जर ही कार राजधानी दिल्लीतून खरेदी केले तर सुमारे 5300 रुपयांच्या रजिस्ट्रेशन चार्जेससह, इंश्युरन्ससाठी सुमारे 68000 रुपये द्यावे लागतील. याशिवाय, 17990 रुपये टीसीएस चार्जेस म्हणून देखील द्यावे लागतील. त्यानंतर त्याची ऑन-रोड किंमत 18.90 लाख रुपये होते.
जर तुम्ही Hyundai Creta Electric चा बेस व्हेरिएंट खरेदी केला तर बँक फक्त एक्स-शोरूम किमतीतच फायनान्स करेल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 16.90 लाख रुपयांचे फायनान्स करावे लागेल. जर बँक तुम्हाला 9% व्याजदराने सात वर्षांसाठी 16.90 लाख रुपये देत असेल, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी तुम्हाला दरमहा फक्त 27197 रुपये ईएमआय भरावा लागेल.
जर तुम्ही बँकेकडून 9 टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 16.90 लाख रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी दरमहा 27197 रुपये ईएमआय भरावा लागेल. अशा परिस्थितीत, 7 वर्षांत तुम्हाला ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकच्या बेस व्हेरियंटसाठी सुमारे 5.94 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. त्यानंतर तुमच्या कारची एक्स-शोरूम, ऑन रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 24.84 लाख रुपये होईल.
आताच लाँच झालेल्या ‘या’ Electric Car ला दणादण मिळतेय बुकिंग, फक्त 24 तासात मिळवले हजारो ग्राहक
इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये ह्युंदाईने क्रेटा इलेक्ट्रिक आणली आहे. या विभागात, ते थेट MG Windsor Pro EV, Tata Curvv EV शी स्पर्धा करते. लवकरच कंपनी Maruti Suzuki E Vitara, Toyota Electric Hyryder आणि Tata Harrier EV यांच्याशी स्पर्धा करावी लागेल.