
या मोहिमेचे नेतृत्व कॅप्टन शेखर देशपांडे करत आहेत. या पथकात अधिकारी, नौसैनिक आणि अग्निवीर यांच्यासोबत महिला अधिकारी, महिला अग्निवीर आणि नौदलाशी संबंधित महिला सदस्यांचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भाग, शहरे आणि गावांमधून हा प्रवास होणार असून, तरुणांना इंडियन नेव्हीमधील करिअरच्या संधींची माहिती देणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे.
TVS Ronin मध्ये मोठे अपडेट! नवीन Base+ व्हेरिएंट लाँच; मिळाले खास सेफ्टी आणि टेक फीचर्स
या प्रवासात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित 10 ऐतिहासिक किल्ल्यांना भेट दिली जाणार आहे. यातील काही किल्ल्यांचा ‘Maratha Military Landscapes of India’ या नामांकनाअंतर्गत युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे. त्यामुळे ही मोहीम केवळ बाइक राइड न राहता महाराष्ट्राचा इतिहास, वारसा, साहस आणि नौदल सेवेचा संदेश जोडणारी ठरणार आहे.
मोहिमेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे अग्निवीर योजनेबाबत तरुणांमध्ये जनजागृती करणे. या माध्यमातून सशस्त्र दलांमध्ये अधिकारी पदाखालील मनुष्यबळासाठी असलेल्या अल्पकालीन भरती योजनेची माहिती ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
या संपूर्ण मोहिमेसाठी टीव्हीएस रोनिनचा वापर करण्यात आला आहे. नुकतीच 2026 टीव्हीएस रोनिन ₹1.42 लाख ते ₹1.64 लाख एक्स-शोरूम, दिल्ली या किंमत श्रेणीत सादर करण्यात आली आहे. यात नवीन Base व्हेरिएंटसह Mid आणि Top व्हेरिएंटमध्येही काही अपडेट्स करण्यात आले आहेत. Base व्हेरिएंटमध्ये ड्युअल-चॅनल ABS स्टँडर्ड देण्यात आले असून Sunlit Yellow आणि Desert Mirage रंग मिळतात.
Mid व्हेरिएंटमध्ये Connected Cluster आणि Type-C Charger मिळतो, तर Top व्हेरिएंटमध्ये Traction Control System, Type-C Charger आणि Premium Seat सारखी फीचर्स आहेत. या मोहिमेतून टीव्हीएस रोनिनच्या साहसी प्रतिमेसोबतच देशसेवा, इतिहास आणि तरुणांसाठीच्या करिअर संधींचा संदेश महाराष्ट्रभर पोहोचवला जाणार आहे.