Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पार्किंगवरून वाद विकोपाला, व्यापाऱ्याला मारहाण; बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी

वाहन पार्किंगच्या कारणावरून झालेल्या वादातून दोन जणांनी संगनमत करून एका सोने-चांदीच्या व्यापाऱ्याला शिवीगाळ, मारहाण करून बंदूक रोखून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 16, 2026 | 11:50 AM
पार्किंगवरून वाद विकोपाला, व्यापाऱ्याला मारहाण; बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी

पार्किंगवरून वाद विकोपाला, व्यापाऱ्याला मारहाण; बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी

Follow Us
Follow Us:
  • पार्किंगच्या कारणावरून वाद
  • व्यापाऱ्याला मारहाण
  • बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी
फुलंब्री : वाहन पार्किंगच्या कारणावरून झालेल्या वादातून दोन जणांनी संगनमत करून एका सोने-चांदीच्या व्यापाऱ्याला शिवीगाळ, मारहाण करून बंदूक रोखून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. ही घटना शनिवार (दि. १४) रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास शहरात घडली आहे. या प्रकरणात सोने-चांदीचे व्यापारी जितेंद्र भानुदास वानखेडे यांनी फुलंब्री पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

 

वानखेडे यांच्या तक्रारीनुसार हरीश प्रकाश वर्मा याने बंदूक काढून जीवे मारण्याची धमकी दिली असून भरत प्रकाश वर्मा याने मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ही घटना वानखेडे यांच्या दुकानासमोर घडला असून, दत्त मंदिरासमोरील वाहन पार्किंग करण्यावरून हे वाद झाले आहेत. घटनेच्या दिवशी दत्त मंदिरासमोरील पार्किंगच्या कारणावरून मंदिराच्या पुजारी यांच्यासोबतही हरीश वर्मा यांचा वाद झाला होता, असे तक्रारीत नमूद केले आहे.

दरम्यान, रात्री जितेंद्र वानखेडे हे आपल्या दुकानात असताना हरीश वर्मा व भरत वर्मा यांनी दुकानासमोर वाहन पार्किंग करण्याच्या कारणावरून त्यांना शिवीगाळ केली. यावेळी हरीश वर्मा याने त्यांना दुकानाच्या चॅनल गेटवर ढकलल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर जितेंद्र वानखेडे यांचे भाऊ राहुल वानखेडे घटनास्थळी आले असता भरत वर्मा याने त्यांची गचांडी पकडून चापट बुक्क्यांनी नाकावर मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी शिवम वानखेडे, अक्षय पाडळकर व मंगेश राठोड यांनी  मध्यस्थी करून भांडण सोडवले. तसेच हरीश वर्मा याने बंदूक काढून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा : “लॉटरी लागली म्हणून खाऊ घातला पेढा अन्…” ओळखीच्या नराधमाचे विवाहितेला औषध देऊन केले अघोरी कृत्य!

या घटनेनंतर राहुल वानखेडे यांनी फुलंब्री येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेतले. जितेंद्र वानखेडे यांच्या तक्रारीवरून हरीश व भरत यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास फुलंब्री पोलिस करीत असून, तपासानंतर घटनेचे नेमके सत्य स्पष्ट होणार आहे.

हे सुद्धा वाचा : घराशेजारी झुडपात लपवले पिस्तूल; पुणे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पकडले

💡

Frequently Asked Questions

  • Que: फुलंब्रीमध्ये वाद कशावरून झाला?

    Ans: दुकानासमोर वाहन पार्किंग करण्याच्या कारणावरून जितेंद्र वानखेडे आणि हरीश वर्मा व भरत वर्मा यांच्यात वाद झाला.

  • Que: व्यापाऱ्याला कोणी मारहाण केली आणि धमकी दिली?

    Ans: तक्रारीनुसार भरत प्रकाश वर्मा याने मारहाण केली, तर हरीश प्रकाश वर्मा याने बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी दिली.

  • Que: या प्रकरणाचा तपास कोण करीत आहे?

    Ans: जितेंद्र वानखेडे यांच्या तक्रारीवरून फुलंब्री पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली असून, पुढील तपास फुलंब्री पोलिस करीत आहेत.

Web Title: A trader has been assaulted in phulambri over a vehicle parking issue nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: “लॉटरी लागली म्हणून खाऊ घातला पेढा अन्…” ओळखीच्या नराधमाचे विवाहितेला औषध देऊन केले अघोरी कृत्य!
1

Chhatrapati Sambhajinagar: “लॉटरी लागली म्हणून खाऊ घातला पेढा अन्…” ओळखीच्या नराधमाचे विवाहितेला औषध देऊन केले अघोरी कृत्य!

घराशेजारी झुडपात लपवले पिस्तूल; पुणे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पकडले
2

घराशेजारी झुडपात लपवले पिस्तूल; पुणे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पकडले

Gondiya News: २८ आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती धोकादायक; ३९४ पदे रिक्त, ग्रामीण आरोग्यसेवेचे वास्तव उघड
3

Gondiya News: २८ आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती धोकादायक; ३९४ पदे रिक्त, ग्रामीण आरोग्यसेवेचे वास्तव उघड

10 स्वीकृत नगरसेवकांचा तिढा शुक्रवारी सुटणार? भाजपच्या सात जागांसाठी दीडशेहून अधिक इच्छुक
4

10 स्वीकृत नगरसेवकांचा तिढा शुक्रवारी सुटणार? भाजपच्या सात जागांसाठी दीडशेहून अधिक इच्छुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.