Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ही’ सेडान कार खरेदी करण्यासाठी भारतीयांची झुंबड, विक्रीच्या बाबतीत गेल्या सहा महिन्यापासून अव्वल स्थानी

भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. मे 2024 पासून ही कार सेडान प्रकारातील सर्वात जास्त विक्री होणारी कार ठरली आहे. जाणून घ्या या कारबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Oct 22, 2024 | 07:28 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

एका कारने भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे.  या कारने 50 हजार कार युनिट्सच्या विक्रीचा आकडा पार केला आहे. ही कार आहे Volkswagen Virtus.  फॉक्सवॅगन कंपनीसाठी  Virtus  ही भारतीय बाजारपेठेतील महत्वपूर्ण कार ठरली आहे. मे 2024 पासून ही कार सेडान प्रकारातील सर्वात जास्त विक्री होणारी कार ठरली आहे.  या कारचे भारतात जून 2022 मध्ये लॉंचिग झाले होते. त्यानंतर या कारला भारतीय ग्राहकांनी पसंती दिली आणि विक्रीच्या बाबतीत ऐतिहासिक कामगिरी  या कारने केली आहे.

Volkswagen Virtus चे दर महिन्यामध्ये सरासरी 1700 युनिट्सची विक्री होत आहे. यासोबत कंपनीच्या  Virtus आणि Taigun यांची एकत्रित विक्री पाहिल्यास जुलै ते सप्टेंबर या तीमाहीत 1 लाखाहून जास्त विक्रीचा आकडा पार केला आहे.  या दोन्ही कार्सनी भारतातील विक्रींमध्ये कंपनीसाठी 18.5 टक्के योगदान दिले आहे.

 शक्तिशाली इंजिनामुळे कारची लोकप्रियता

Volkswagen Virtus या कारच्या लोकप्रियतेचे सर्वात प्रमुख कारण आहे या कारमध्ये असलेले दोन शक्तिशाली इंजिन पर्याय, या शक्तिशाली इंजिन पर्यायांमुळे ही कार सेडान प्रकारातील  सर्वात शक्तिशाली कार बनते. Virtus मध्ये 1.0 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर टर्बो-पेट्रोल इंजिनचा पर्याय आहे. कारमध्ये 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड ऑटोमॅटिक आणि 7-स्पीड डीसीटी गिअरबॉक्सचा पर्याय आहे.

कारमध्ये आहेत प्रीमियम वैशिष्ट्ये

Virtus  मध्ये अनेक प्रीमियम वैशिष्ट्यांचा समावेश केला गेला आहे. ज्यामध्ये 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 8-इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले आणि  सनरूफ यांचा समावेश आहे. तसेच कारमध्ये वायरलेस फोन चार्जर, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप आणि हवेशीर फ्रंट सीट्स सारखी वैशिष्ट्ये देखील आहेत.

हे देखील वाचा- इलेक्ट्रीक वाहनांमध्ये AC च्या वापराने बॅटरीमध्ये होते घट? जाणून घ्या यासंबंधीचे तथ्य

कार सुरक्षेमध्येही अव्वल

फॉक्सवॅगन व्हरटसची 2023 मध्ये ग्लोबल NCAP द्वारे  क्रॅश चाचणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये कारला 5-स्टार सुरक्षा रेटिंगही मिळाले आहे. सुरक्षा वैशिष्ट्यांचा विचार केल्यास कारमध्ये 6 एअरबॅग्ज (स्टँडर्ड), इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), हिल होल्ड असिस्ट, रेन सेन्सिंग वायपर ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स आणि रिअर पार्किंग कॅमेरा इत्यादींचा समावेश आहे.

कारची किंमत आणि स्पर्धा

Volkswagen Virtus ची भारतातील एक्स शो रुम किंमत 11.56 लाख रुपये  ते 19.41 लाख रुपये या दरम्यान आहे. देशामध्ये या कारची स्पर्धा ही प्रामुख्याने  मारुती सियाझ ,ह्युंदाई वेर्ना, होंडा सिटी आणि स्कोडा स्लाव्हिया यांसारख्या कारशी आहे.

Web Title: Indians flock to buy volkswagen virtus sedan car top in terms of sales for the last six months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2024 | 07:27 PM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डींविरोधात केलं वक्तव्य; आई कोंडा सुरेखांच्या मंत्रिपदावर गंडांतर
1

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डींविरोधात केलं वक्तव्य; आई कोंडा सुरेखांच्या मंत्रिपदावर गंडांतर

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
2

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

चीनला बसणार मोठा धक्का! India चा Brazil सोबत 30 अब्ज डॉलरचा Business Plan ; ‘या’ 5 क्षेत्रांना होणार मोठा फायदा
3

चीनला बसणार मोठा धक्का! India चा Brazil सोबत 30 अब्ज डॉलरचा Business Plan ; ‘या’ 5 क्षेत्रांना होणार मोठा फायदा

AM/NS इंडिया आणि ICAR-IARI च्या संशोधनातून मोठा खुलासा, लोह खनिजाच्या टाकाऊ घटकांपासून सुधारेल जमिनीचे आरोग्य!
4

AM/NS इंडिया आणि ICAR-IARI च्या संशोधनातून मोठा खुलासा, लोह खनिजाच्या टाकाऊ घटकांपासून सुधारेल जमिनीचे आरोग्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.