
फोटो सौजन्य: Pinterest
टाटा मोटर्सने अखेर Sierra च्या टॉप व्हेरिएंट Accomplished आणि Accomplished+ यांच्या किंमती जाहीर केल्या आहेत. याआधी कंपनीने या एसयूव्हीच्या इतर व्हेरिएंट्सच्या किंमती जाहीर केल्या होत्या, मात्र आता टॉप मॉडेल्सची माहितीही समोर आली आहे. Sierra मधील Accomplished व्हेरिएंटला टॉप रेंज मानले जात असून, यामध्ये अधिक प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. 1.5 लिटर पेट्रोल इंजिनसह Accomplished व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत सुमारे 17.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. डिझेल इंजिनसह हा व्हेरिएंट किंचित महाग असून, Accomplished+ हा सर्वात महाग पर्याय ठरतो.
Yamaha च्या ‘या’ 2 बाईक भारतात पुन्हा दिसणार नाही! विक्री पूणर्पणे बंद
Tata Sierra मध्ये पेट्रोल आणि डिझेल असे दोन्ही इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. पेट्रोल इंजिनमध्ये नॉर्मल आणि टर्बो असे दोन पर्याय दिले आहेत. Accomplished पेट्रोल व्हेरिएंटची किंमत सुमारे 19.99 लाख रुपयेपर्यंत जाते, तर Accomplished+ टर्बो पेट्रोल वेरिएंटची किंमत सुमारे 20.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. डिझेल इंजिनसह Accomplished व्हेरिएंटची सुरुवात अंदाजे 18.99 लाख रुपयांपासून होते, तर Accomplished+ डिझेल व्हेरिएंटची किंमत 21 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. एकूणच पाहता, डिझेल Accomplished+ हा Sierra चा सर्वात महाग व्हेरिएंट आहे.
Accomplished ट्रिममध्ये टाटाने भरपूर प्रीमियम फीचर्स दिले आहेत. यामध्ये पुढील सीट्ससाठी व्हेंटिलेशन, मोठा 12.3 इंच टचस्क्रीन, पॅनोरमिक सनरूफ आणि ॲम्बियंट लाइटिंगचा समावेश आहे. याशिवाय 12 स्पीकर असलेली JBL म्युझिक सिस्टीम, हेड-अप डिस्प्ले, 6 प्रकारे ॲडजस्ट होणारी पॉवर ड्रायव्हर सीट आणि बॉस मोडसारखी फीचर्सही देण्यात आली आहेत. सेफ्टीसाठी या व्हेरिएंटमध्ये Level 2 ADAS सिस्टीम मिळते, ज्यामुळे ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित होते.
Accomplished+ व्हेरिएंटमध्ये Accomplished मधील सर्व फीचर्ससोबत काही अतिरिक्त सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये पावर्ड टेलगेट, एअर प्युरिफायर, मागील प्रवाशांसाठी स्वतंत्र स्क्रीन आणि काही Extra ADAS फीचर्स मिळतात. याशिवाय सीक्वेन्शियल इंडिकेटर्स देण्यात आले असून, त्यामुळे या एसयूव्हीचा लुक अधिक प्रीमियम दिसतो.
जर तुम्हाला जास्त फीचर्स आणि प्रीमियम अनुभव हवा असेल, तर Accomplished व्हेरिएंट किंमत आणि फीचर्स यांचा उत्तम समतोल साधतो. Accomplished+ व्हेरिएंट अधिक लक्झरी अनुभव देतो, मात्र त्याची किंमतही जास्त आहे. त्यामुळे बहुतांश ग्राहकांसाठी Accomplished व्हेरिएंट हा अधिक योग्य आणि व्हॅल्यू फॉर मनी पर्याय ठरू शकतो.