Jasprit Bumrah च्या ताफ्यात अनेक महागड्या कार, किंमत वाचाल तर क्लीन बोल्ड व्हाल
अनेक अटीतटीच्या सामन्यात भारताला विकेट मिळवून देणारा खेळाडू म्हणजे जसप्रीत बुमराह. बुमराहचा यॉर्कर नेहमीच समोरच्या फलंदाजांची दांडी गुल करत असतो. म्हणूनच तर त्याला यॉर्कर किंग देखील बोलले जाते. मात्र, बुमराहची चर्चा फक्त खेळामुळे नाही तर त्याच्याकडे असणाऱ्या आलिशान कार्समुळे देखील होते.
बुमराहच्या ताफ्यात असणाऱ्या करोडो रुपयांच्या कार्स कोणत्याही सुपरस्टारच्या कार कलेक्शनपेक्षा कमी नाहीत. जर तुम्ही त्यावर एक नजर टाकली तर तुम्ही देखील म्हणाल “काय कलेक्शन आहे यार!”. चला जसप्रीत बुमराहच्या कार कलेक्शनबद्दल जाणून घेऊयात.
Honda च्या ‘या’ बाईकचा मार्केटमध्ये धूम धडाका ! रोज 5000 ग्राहक करताय खरेदी, किंमत फक्त…
जसप्रीत बुमराहच्या गॅरेजमधील ही पहिली कार आहे. रेंज रोव्हर वेलार आर-डायनामिक एस P250 पेट्रोल आणि Sd200 डिझेल व्हेरिएंटमध्ये येते. डिझेल व्हेरिएंट हा सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांपैकी एक आहे आणि त्याची कमाल हॉर्सपॉवर सुमारे 201 HP आणि कमाल टॉर्क सुमारे 430 NM आहे.
ही कार ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने सुसज्ज आहे जी 8.2 सेकंदात 0-100 किमी/ताशी स्पीड पकडते. भारतातील रेंज रोव्हर वेलारची एक्स-शोरूम किंमत ₹87.90 लाख पासून सुरू होते, ही किंमत पेट्रोल आणि डिझेल दोन्ही मॉडेलसाठी आहे. टॉप मॉडेलची किंमत 89.90 लाख रुपयांपर्यंत जाते.
एस-क्लास मेबॅक ही अनेक जणांची आवडती कार आहे. मेबॅकमध्ये 4.0 -लिटर ट्विन-टर्बोचार्ज्ड पेट्रोल V8 इंजिन आहे. या कारचे कमाल पॉवर आउटपुट सुमारे 463 बीएचपी आणि सुमारे 700 एनएम आहे. मेबॅकमध्ये 9-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि रिअर व्हील ड्राइव्ह सेटअप आहे.
Office ला जाणाऱ्या मुलींसाठी ‘या’ Electric Scooter आहे एकदम बेस्ट, ट्रॅफिकमध्ये सुद्धा फटाफट धावेल
ही कार फक्त 4.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढवू शकते. भारतातील मेबॅक एस560 ची एक्स-शोरूम किंमत 2.11 कोटी रुपयांपासून सुरू होते. आरटीओ, विमा आणि टीसीएस सारखे ऑन-रोड खर्च यामध्ये जोडल्यास, एकूण ऑन-रोड किंमत 2.32 कोटी रुपयांपर्यंत पोहोचते.
निसान जीटीआर ही कार प्रेमींची आवडती कार म्हणून ओळखली जाते. या कारचा लूक खूपच आकर्षक आहे. म्हणूनच कारच्या जगात तिला “गॉडझिला” म्हणून देखील ओळखले जाते. या कारमध्ये 3.8 लिटर ट्विन टर्बोचार्ज्ड व्ही6 इंजिन आहे, जे 565 हॉर्सपॉवर आणि 633 एनएम पीक टॉर्क देते. ही कार फक्त 209 सेकंदात 0 ते 96 किमी/ताशी स्पीड पकडते. याशिवाय, या कारचा कमाल वेग 315 किमी/ताशी आहे. निसान जीटीआरची किंमत 2.12 कोटी रुपये (एक्स-शोरूम) आहे.