फोेटो सौजन्य: @MotorBeam (X.com)
भारतीय ऑटोमोबाईल मार्केट आणि येथील वाहनांची वाढती मागणी नेहमीच विदेशी ऑटो कंपन्यांना आपल्या कार्स लाँच करण्यास प्रोत्साहित करत असते. भारतात विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या जातात, ज्यात सर्वात जास्त डिमांड ही एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना असते.
भारतात अनेक उत्तम ऑटो कंपन्या कार्यरत आहेत. जीप ही त्यातीलच एक कंपनी. या कंपनीने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. कंपनीने एंट्री लेव्हल आणि मिड लेव्हल एसयूव्ही म्हणून ऑफर केलेल्या Jeep Compass आणि Jeep Meridian चे नवीन व्हर्जन ट्रेल एडिशन लाँच करण्यात आले आहे. या एडिशनमध्ये (जीप ट्रेल एडिशन) कोणत्या प्रकारचे फीचर्स देण्यात आले आहेत? हे नवीन एडिशन कोणत्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे? त्याबद्दल जाणून घेऊयात.
नवीन ट्रेल एडिशन जीप कंपासमध्ये ट्रेल एडिशन हूड, साईड बॉडी डेकल्स, मॅट ब्लॅक ग्रिल ॲक्सेंट, न्यूट्रल ग्रे एलिमेंट्ससह ग्रिल रिंग, डीएलओ आणि बॅकलाइट मोल्डिंग, रूफ रेल इन्सर्ट, ओआरव्हीएम, जीप आणि कंपास बॅज, रिअर लोअर फॅसिया ॲप्लिक आणि रेड-अॅक्सेंटेड फ्रंट लोअर फॅसिया आहेत. ग्रॅनाइट मेटॅलिक सॅटिन ग्लॉस 18-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील्स आणि रूफ रेल.
जीप कंपासच्या इंटिरिअरमध्ये डॅशबोर्डवर इग्नाइट रेड मिड-बोल्स्टर, ब्लॅक लेदरेट अपहोल्स्ट्री, स्टीअरिंग व्हीलवर रेड कॉन्ट्रास्ट स्टिचिंग, गियर बूट आणि सीट अपहोल्स्ट्री आहेत. यात डार्क कॅमोफ्लेज ग्राफिक्स देखील आहेत.
कंपास प्रमाणेच, जीप मेरिडियन ट्रेल एडिशनमध्ये सिग्नेचर हुड डेकल, ट्रेल एडिशन बॅजिंग आणि हाय-ग्लॉस ब्लॅक रूफ आहे. एक्सटिरिअरमध्ये ग्रिलवर न्यूट्रल ग्रे ॲक्सेंट, हेडलॅम्प सराउंड, रूफ रेल इन्सर्ट, रिअर फॅसिया व्हॅलेन्स, बॅजेस आणि साइड क्लॅडिंग ॲप्लिक आहे. फॉग लॅम्प सराउंड, डीएलओ, रिअर लाईटबार मोल्डिंग, ओआरव्हीएम आणि रिअर लोअर फॅसिया तसेच रेड फ्रंट फॅसिया हायलाइट्सवर अतिरिक्त पियानो ब्लॅक ॲक्सेंट आहेत. इंटिरिअरमध्ये रुबी रेड ॲक्सेंटसह हाय-कॉन्ट्रास्ट ब्लॅक व्हाइनिल इंटिरिअर, कॅमफ्लाज थीम असलेले ॲप्लिक, पियानो ब्लॅक सेंटर कन्सोल आणि मॅचिंग स्पीकर सराउंड्स आहेत.
कंपनीने जीप कंपास ट्रेल एडिशनची सुरुवातीची किंमत 25.41 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 27.41 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
जीप मेरिडियन ट्रेल एडिशनची किंमत 31.27 लाख ते 37.27 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.