Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jeep Compass : कारप्रेमींसाठी आनंदाची बातमी! सर्वाधिक परवडणारी ऑटोमॅटिक जीप कंपास लाँच; किंमत फक्त इतक्या लाखांपासून सुरु

Jeep Compass Sport 9 : जीप® इंडियाने आपल्या लोकप्रिय जीप कंपास लाइन-अपमध्ये नवीन 'कंपास स्पोर्ट ९-स्पीड ऑटोमॅटिक' व्हेरिएंट लाँच केले आहे. ९-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा परफॉर्मन्स देणारी ही आतापर्यंतची सर्वात परवडणारी ऑटोमॅटिक जीप कंपास ठरली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 27, 2026 | 02:10 PM
सर्वाधिक परवडणारी ऑटोमॅटिक जीप कंपास लाँच ( सौजन्य - सोशल मीडिया )

सर्वाधिक परवडणारी ऑटोमॅटिक जीप कंपास लाँच ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • जीप इंडियाचा मोठा धमाका!
  • सर्वाधिक परवडणारी ऑटोमॅटिक जीप कंपास लाँच
  • किंमत २१.९९ लाखांपासून सुरू
Jeep Compass Sport 9 : जीप® इंडियाने आज ९-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह कंपास स्पोर्ट एफडब्ल्यूडीच्या लाँचची घोषणा केली, ज्यासह ही भारतात लाँच करण्यात आलेली आतापर्यंतची सर्वाधिक परवडणारी ऑटोमॅटिक जीप कंपास वेईकल ठरली आहे. ही नवीन व्हेरिएंट कंपास लाइन-अपच्या सुरुवातीच्या व्हेरिएंटमध्ये पहिल्यांदाच ऑटोमॅटिक परफॉर्मन्स उपलब्ध करून देते, ज्यामुळे जीप कंपासचे वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन, परफॉर्मन्स आणि अस्सल व्यक्तिमत्त्व शोधणाऱ्या ग्राहकांसाठी अधिक परवडणारा पर्याय निर्माण होतो. ( Jeep Compass Sport 9 ) 

युरोपमध्ये चिनी कार कंपन्यांची मोठी झेप; पहिल्यांदाच जपानी कंपन्यांना टाकले मागे! पाहा कोणत्या आहेत अव्वल कंपन्या

सुलभ परफॉर्मन्स देण्यासाठी डिझाइन

नवीन कंपास स्पोर्ट ९एटीमध्ये १७० एचपी आणि ३५० एनएम टॉर्क निर्माण करणाऱ्या विश्वासार्ह २.०-लिटर मल्टीजेट® II टर्बो डिझेल इंजिनची दैनंदिन ड्रायव्हिंगमध्ये स्मूथ आणि सुलभ परफॉर्मन्स देण्यासाठी डिझाइन केलेले ९-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे. दैनंदिन प्रवासात अधिक सोयीसुविधा शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन वाढत्या प्रमाणावर महत्त्वाची पसंती ठरत आहे.

कंपास स्पोर्टमध्ये ९-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन

या लाँचबाबत मत व्यक्त करत स्टेलांटिस इंडियाच्या ऑटोमोटिव्ह ब्रँड्सचे बिझनेस हेड आणि डायरेक्टर कुमार प्रियेश म्हणाले, “कंपासने नेहमी जीपची अस्सल क्षमता, वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन आणि आत्मविश्वासपूर्ण ड्रायव्हिंग अनुभवाचे प्रतिनिधित्व केले आहे. कंपास स्पोर्टमध्ये ९-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन लाँच करून आम्ही हा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक परवडणारा बनवत आहोत.”

एसयूव्ही वेईकल बाजारपेठेत वेगळे स्थान

गेल्या काही वर्षांत, कंपासने जीपचे वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन आणि रस्त्यावरील प्रबळ उपस्थितीसह तंत्रज्ञान, आराम आणि आत्मविश्वासपूर्ण ड्रायव्हिंग डायनॅमिक्सशी सांगड घालत भारताच्या प्रीमियम एसयूव्ही वेईकल बाजारपेठेत वेगळे स्थान निर्माण केले आहे. कंपास स्पोर्ट ९एटी तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि सुलभतेच्या दमदार वैशिष्ट्यांची सिरीज अविरतपणे देत आहे. ही वेईकल ६ एअरबॅग्ज, ऑटो होल्ड आणि क्रूझ कंट्रोलने सुसज्ज आहे, तसेच या वेईकलमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो™ आणि अॅपल कारप्ले™ सह २१.३ सेमी युकनेक्ट™ टचस्क्रीन, स्टीअरिंग-माउंटेड कंट्रोल्स आणि इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल डोअर मिरर्सचा समावेश आहे.

संतुलित राइड देण्यासाठी डिझाइन

कंपास स्पोर्टमध्ये विविध रस्त्यांच्या परिस्थितीमध्ये संतुलित राइड देण्यासाठी डिझाइन केलेले फ्रिक्वेन्सी सिलेक्टिव्ह डॅम्पिंग (एफएसडी) सस्पेन्शन, तसेच आत्मविश्वासपूर्ण व रिस्पॉन्सिव्ह हाताळणीसाठी डायनॅमिक स्टीअरिंग टॉर्क (डीएसटी) देखील देण्यात आले आहे.

काय आहे खास?

ग्राहक २९,९०० रुपये किमतीच्या पर्यायी अॅक्सेसरी पॅकसह आपल्या कंपास स्पोर्ट ९एटीचे अधिक वैयक्तिकरण करू शकतात, ज्यामध्ये स्टाइल, सुलभता आणि दैनंदिन उपयुक्तता वाढवण्यासाठी डिझाइन केलेल्या निवडक अॅक्सेसरीजचा समावेश आहे. या पॅकमध्ये अॅम्बियंट लाइटिंग, संतुलित राइड देण्यासाठी डिझाइन डॅशकॅम, स्वूश डीकॅल, ऑल-वेदर फ्लोअर मॅट्स आणि मड फ्लॅप्स यांचा समावेश आहे.

किंमत आहे खास?

जीप कंपासचा विस्तृत पोर्टफोलिओ ग्राहकांना मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायांसह २डब्ल्यूडी आणि ४डब्ल्यूडी ड्राइव्हट्रेन्सचे पर्याय सतत उपलब्ध करून देतो, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या ड्रायव्हिंगच्या गरजा आणि आवडीनुसार योग्य कंपास वेईकल निवडता येते. जीप® कंपास स्पोर्ट ९एटीची किंमत २१.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे आणि भारतातील सर्व जीप® डीलरशिप्स व स्टेलांटिस ब्रँड हाऊसेसमध्ये वेईकलची डिलिव्हरी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होईल.

ऑटोमोबाईल प्रॉडक्ट्स ऑफ इंडियाला ₹46.62 लाखांचा तोटा; कंपनीची आर्थिक स्थिती चिंताजनक

💡

Frequently Asked Questions

  • Que: नवीन जीप कंपास Sport 9AT एक्स-शोरूम किंमत किती आहे?

    Ans: नवीन जीप कंपास स्पोर्ट ९एटीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत २१.९९ लाख रुपये आहे.

  • Que: नवीन एसयूव्हीमध्ये कोणते इंजिन आणि ट्रान्समिशन देण्यात आले आहे?

    Ans: यात विश्वासार्ह २.०-लिटर मल्टीजेट® II टर्बो डिझेल इंजिन देण्यात आले आहे, जे १७० एचपी पॉवर आणि ३५० एनएम टॉर्क निर्माण करते आणि त्याला ९-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन जोडले आहे.

  • Que: कंपास स्पोर्ट ९एटीच्या डिलिव्हरी कधीपासून सुरू होणार आहेत?

    Ans: गाडीची डिलिव्हरी नोव्हेंबर २०२६ च्या दुसऱ्या आठवड्यापासून भारतातील सर्व जीप® डीलरशिप्सवर सुरू होईल.

Web Title: Jeep india launches compass sport 9 speed automatic diesel at 21 99 lakh ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • automobile news
  • Jeep India

संबंधित बातम्या

Renault ची स्वस्त 7-सीटर SUV नव्या अवतारात येणार! टेस्टिंग सुरू, लूकपासून फीचर्सपर्यंत काय बदलणार?
1

Renault ची स्वस्त 7-सीटर SUV नव्या अवतारात येणार! टेस्टिंग सुरू, लूकपासून फीचर्सपर्यंत काय बदलणार?

Nagpur News : दिवाळीत ऑटोमोबाईल बाजाराला वेग; विक्रीत १२ टक्क्यांची वाढ
2

Nagpur News : दिवाळीत ऑटोमोबाईल बाजाराला वेग; विक्रीत १२ टक्क्यांची वाढ

Automobile: दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला ब्रेक! पुण्यात वाहननोंदणीत ‘इतकी’ घट; इलेक्ट्रिक वाहनांची…
3

Automobile: दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला ब्रेक! पुण्यात वाहननोंदणीत ‘इतकी’ घट; इलेक्ट्रिक वाहनांची…

दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला पसंती; 8991 वाहनांची खरेदीसाठी नोंदणी
4

दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला पसंती; 8991 वाहनांची खरेदीसाठी नोंदणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.