Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Renault ची स्वस्त 7-सीटर SUV नव्या अवतारात येणार! टेस्टिंग सुरू, लूकपासून फीचर्सपर्यंत काय बदलणार?

Renault ट्रायबर ही कमी बजेटमध्ये उपलब्ध असलेली लोकप्रिय 7-सीटर कार लवकरच नव्या फेसलिफ्ट अवतारात दाखल होण्याची शक्यता आहे. टेस्टिंगदरम्यान नव्या मॉडेलचे फोटो समोर आले असून, कारच्या पुढील भागात नवीन हेडलाईट, ग्रिल आणि बंपर मिळण्याची शक्यता आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 24, 2026 | 05:49 PM
Renault ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Renault ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Renault Triber नव्या अवतारात येणार!
  • नवीन डिझाइन, प्रीमियम इंटिरियर आणि वाढीव फीचर्सची शक्यता.
  • 1.0 लिटर पेट्रोल इंजिन कायम राहणार.

New Renault Triber Facelift: तुम्हाला 7 सीटर गाडी घ्यायची आहे का? पण बजेट कमी आहे? तर मग रेनॉल्ट ट्रायबर हे नाव तुम्ही नक्की ऐकलं असेल. भारतातली सगळ्यात स्वस्त 7 सीटर गाडी म्हणून ही गाडी खूप फेमस आहे. मारुती एर्टिगा आणि इनोव्हा सारख्या मोठ्या गाड्यांना ही छोटी गाडी टक्कर देते. आणि आता याच गाडीचा नवीन चेहरा, म्हणजेच फेसलिफ्ट मॉडेल लवकरच बाजारात येणार आहे.

अलीकडेच या नव्या ट्रायबरचे काही फोटो समोर आले आहेत. टेस्टिंग करताना ही गाडी दिसली आहे. चला बघूया नव्या ट्रायबरमध्ये काय काय बदल होणार आहेत.डिझाईनमध्ये काय बदल होणार?टेस्टिंगच्या फोटोंवरून कळतंय की मागच्या बाजूला फार मोठा बदल झालेला नाही.

हे मॉडेल मागच्या जुन्या मॉडेलसारखा दिसत आहे. साईडला पण तीच लाईन आणि तोच क्रीज आहे.पण पुढचा भाग पूर्णपणे झाकलेला होता. म्हणजे नक्कीच समोरच्या बाजूला मोठा बदल होणार आहे. नवीन हेडलाईट, नवीन ग्रिल आणि नवीन बंपर मिळण्याची शक्यता आहे. कंपनीने पुढचा लुक अजून गुप्त ठेवला आहे. Renault

फिचर्स पण वाढणार

सध्याच्या ट्रायबरमध्ये पण भरपूर फिचर्स आहेत. प्रोजेक्टर हॅलोजन हेडलाईट, 8 इंचाची टचस्क्रीन, 7 इंचाचा डिजिटल मीटर, वायरलेस चार्जर, स्टेरिंगवर बटणे, बटन दाबून गाडी सुरू करणे, असे सगळं मिळतं. नव्या मॉडेलमध्ये डॅशबोर्डचा डिझाईन थोडा बदलणार आहे. आतमध्ये जास्त सॉफ्ट मटेरियल वापरलं जाणार आहे, त्यामुळे गाडी जास्त प्रीमियम वाटेल. रंग पण थोडे हलक्या शेडचे असतील. एकंदरीत आतून गाडी जास्त चांगली दिसणार आहे.

Diwali Car Offers: फक्त 6 लाखात घरी आणा Maruti Suzuki Dzire; दमदार मायलेज आणि सुरक्षिततेमुळे ठरू शकते बेस्ट पर्याय

सेफ्टीचं काय?

सेफ्टीच्या बाबतीत ट्रायबरचं थोडं वेगळं आहे. जुन्या ग्लोबल NCAP टेस्टमध्ये या गाडीला 4 स्टार मिळाले होते, जे खूप चांगले होते. पण जेव्हा नवीन आणि कडक नियमांनुसार टेस्ट झाली, तेव्हा तिला फक्त 2 स्टार मिळाले.तरी पण कंपनीने सेफ्टी फिचर्स दिले आहेत. 4 एअरबॅग, ABS विथ EBD, हिल स्टार्ट असिस्ट, मागे पार्किंग सेन्सर, कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटर, असे सगळं मिळतं. फेसलिफ्टमध्ये अजून एअरबॅग वाढण्याची शक्यता आहे.

इंजिन तेच राहणार

इंजिनमध्ये कंपनी कोणताही बदल करणार नाहीये. तेच जुनं आणि विश्वासू 1.0 लिटरचं पेट्रोल इंजिन मिळणार आहे. हे इंजिन 72 bhp ची पॉवर आणि 96 Nm चा टॉर्क देतं. 3 सिलेंडरचं हे इंजिन आहे.हे इंजिन फार पॉवरफुल नाही, पण शहरात चालवायला एकदम ठीक आहे. मायलेज पण चांगलं देतं.

2026 बजाज पल्सर NS200 लाँच! आता मिळणार जास्त पॉवर आणि प्रीमियम फीचर्स! पाहा डिटेल्स

कधी येणार आणि किंमत किती?

रेनॉल्ट लवकरच या नव्या ट्रायबरला लाँच करणार आहे. सध्याच्या मॉडेलची किंमत 6 लाखापासून सुरू होते, जी 7 सीटरसाठी खूपच कमी आहे. नव्या मॉडेलची किंमत थोडी जास्त असेल, पण तरीही ती देशातली सगळ्यात स्वस्त 7 सीटरच राहील.जर तुम्ही कमी बजेटमध्ये मोठ्या फॅमिलीसाठी गाडी शोधत असाल, तर थोडं थांबा. नवी ट्रायबर आल्यावर एकदा नक्की बघा. जुनी ट्रायबरच इतकी यशस्वी होती, तर नवी तर अजून चांगलीच असणार.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नवीन Renault Triber कधी लॉन्च होणार आहे?

    Ans: कंपनीकडून नवीन ट्रायबरच्या लॉन्चची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

  • Que: नवीन Renault Triber मध्ये कोणते बदल होणार आहेत?

    Ans: नवीन हेडलाईट, ग्रिल, बंपर आणि इंटिरियरमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

  • Que: नवीन Renault Triber मध्ये अधिक एअरबॅग्स मिळणार का?

    Ans: फेसलिफ्ट मॉडेलमध्ये एअरबॅग्सची संख्या वाढण्याची शक्यता आहे; मात्र याबाबत कंपनीने अधिकृत माहिती दिलेली नाही.

Web Title: New renault triber facelift design features engine price rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 05:48 PM

Topics:  

  • automobile news
  • new car
  • Renault

संबंधित बातम्या

Nagpur News : दिवाळीत ऑटोमोबाईल बाजाराला वेग; विक्रीत १२ टक्क्यांची वाढ
1

Nagpur News : दिवाळीत ऑटोमोबाईल बाजाराला वेग; विक्रीत १२ टक्क्यांची वाढ

Automobile: दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला ब्रेक! पुण्यात वाहननोंदणीत ‘इतकी’ घट; इलेक्ट्रिक वाहनांची…
2

Automobile: दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला ब्रेक! पुण्यात वाहननोंदणीत ‘इतकी’ घट; इलेक्ट्रिक वाहनांची…

रेनॉल्ट डस्टर हायब्रिडचं मायलेज 29 kmpl? किंमत 16.99 लाखांपासून होतेय सुरु; खरेदीपूर्वी जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी
3

रेनॉल्ट डस्टर हायब्रिडचं मायलेज 29 kmpl? किंमत 16.99 लाखांपासून होतेय सुरु; खरेदीपूर्वी जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी

दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला पसंती; 8991 वाहनांची खरेदीसाठी नोंदणी
4

दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला पसंती; 8991 वाहनांची खरेदीसाठी नोंदणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.