Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : दिवाळीत ऑटोमोबाईल बाजाराला वेग; विक्रीत १२ टक्क्यांची वाढ

Nagpur News : दसऱ्याच्या काळात झालेल्या वाहन बुकिंगमुळे नागपूरच्या ऑटोमोबाईल क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळीत वाहन विक्रीला आणखी वेग येण्याची शक्यता असून, ऑटोमोबाईल बाजारपेठ ११ ते १२ टक्के वाढीच्या दराने घोडदौड करण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 23, 2026 | 03:54 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • बुकिंग फुल्ल; अनेक मॉडेल्सचा तुटवडा
  • एमएच-४९ची आघाडी कायम
  • मागणी वाढली, ऑफर मात्र घटल्या
Nagpur News : सणासुदीच्या हंगामात नागपूरच्या वाहन बाजाराने पुन्हा एकदा वेग पकडला आहे. दशहऱ्याच्या काळात झालेल्या बंपर बुकिंगनंतर आता वाहन विक्रेत्यांचे लक्ष दिवाळीच्या विक्रीकडे लागले आहे. जीएसटीमधील सवलतीचा फायदा आणि सणांच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करण्याची ग्राहकांची वाढलेली तयारी यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.

टू व्हीलरपासून फोर व्हीलरपर्यंत जवळपास सर्वच श्रेणींमध्ये ग्राहकांची गर्दी दिसत आहे.
२०२६मध्ये आतापर्यंत जिल्ह्यात १,४६,८६२ वाहनांची नोंदणी झाली आहे. मागील वर्षभरात १,७१,४७४ वाहने विकली गेली होती. विशेष म्हणजे यंदाच्या आकडेवारीत अद्याप दिवाळीच्या विक्रीचा समावेश झालेला नाही. त्यामुळे आगामी दिवसांत वाहन विक्रीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. वाहन खरेदीसाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे सर्वाधिक महत्त्वाचे महिने मानले जातात.

मागील वर्षी दसरा आणि दिवाळी एकाच महिन्यात आल्याने ऑक्टोबरमध्येच
२२,५००हून अधिक वाहनांची विक्री झाली होती. यंदा दोन्ही सण वेगवेगळ्या महिन्यांत असल्याने दिवाळीच्या विक्रीची
स्वतंत्र लाट येणार आहे. दसऱ्यादरम्यान मिळालेला प्रतिसाद पाहता डीलर्सच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

Nagpur News : बाजारपेठा गजबजल्या, वाहतूक कोंडीने रस्ते गुदमरले! वाहनांच्या गर्दीत नागरिकांची कसरत

बुकिंग फुल्ल; अनेक मॉडेल्सचा तुटवडा

विदर्भ ऑटो डीलर्स असोसिएशनचे अनुज पांडे यांच्या मते, दिवाळीसाठी वाहनांची बुकिंग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. टू व्हीलर आणि फोर व्हीलर या दोन्ही विभागांमध्ये ग्राहकांचा प्रतिसाद समाधानकारक आहे. अनेक डीलर्सकडे वाहनांची बुकिंग आधीच झालेली असून काही लोकप्रिय मॉडेल्सचा स्टॉकही कमी पडू लागला आहे. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर वाहनाची डिलिव्हरी हवी असल्यास ग्राहकांनी आधीच बुकिंग करणे आवश्यक ठरणार आहे.

एमएच-४९ची आघाडी कायम

जिल्ह्यातील वाहन बाजाराची गेल्या काही वर्षांची आकडेवारीही वाढीचा कल स्पष्ट करते. एमएच-४९ मध्ये सर्वाधिक वाहनांची नोंदणी होत असून २०२३ मध्ये या आरटीओची वाढ ८ टक्के, २०२४मध्ये १२.६१ टक्के, तर २०२५मध्ये १३ टक्के राहिली. एमएच-४०ची वाढ अनुक्रमे १०.९० टक्के, १०.७० टक्के आणि १३.४४ टक्के नोंदविण्यात आली.

यंदा १९ ऑक्टोबरपर्यंतच जिल्ह्यातील वाहन विक्रीने २०२३ चा संपूर्ण आकडा मागे टाकला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर एकूण विक्री किती उंची गाठते, याकडे आता वाहन व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे. सध्याचा ट्रेंड कायम राहिल्यास ऑटोमोबाईल बाजार यंदाही दुहेरी अंकातील वाढ नोंदवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Mohan Bhagwat: ‘बांगलादेशप्रमाणे भारतातही प्रयत्न…’, रिजीम चेंजबाबत मोहन भागवतांचे परखड मत

मागणी वाढली, ऑफर मात्र घटल्या

यंदाच्या बाजाराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कंपन्यांकडून मोठ्या सवलती किंवा आकर्षक ऑफर देण्याची गरजच भासत नाही. ग्राहकांकडून वाहनांना मिळणारा प्रतिसाद पाहता कंपन्या आणि डीलर्सनी मॉडेलची वैशिष्ट्‌ये व उत्पादनाची गुणवत्ता यावर अधिक भर दिला आहे. मागणी मजबूत असल्याने अनेक बँडच्या वाहनांवर मागील वर्षांप्रमाणे मोठ्या सवलती उपलब्ध नाहीत.

Web Title: Nagpur news automobile market gains momentum during diwali 12 increase in salescp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 03:54 PM

Topics:  

  • automobile news
  • Marathi News
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Punah Nakki Bhetu Marathi Play: मुक्ता बर्वे–प्रियदर्शन जाधव पहिल्यांदाच एकत्र! ‘पुन्हा नक्की भेटू’मधून रंगणार नात्यांचा अनोखा खेळ
1

Punah Nakki Bhetu Marathi Play: मुक्ता बर्वे–प्रियदर्शन जाधव पहिल्यांदाच एकत्र! ‘पुन्हा नक्की भेटू’मधून रंगणार नात्यांचा अनोखा खेळ

Khagras Marathi Movie: नावातच गूढ, पोस्टरमध्ये रहस्य! ‘खग्रास’ चित्रपटाची पहिली झलक समोर
2

Khagras Marathi Movie: नावातच गूढ, पोस्टरमध्ये रहस्य! ‘खग्रास’ चित्रपटाची पहिली झलक समोर

Jhumka Patola Song: सीमा पाहवा यांचा डान्स पाहून बॉलिवूडही थिरकलं! सेलिब्रिटींच्या कमेंट्सनी वेधलं लक्ष!
3

Jhumka Patola Song: सीमा पाहवा यांचा डान्स पाहून बॉलिवूडही थिरकलं! सेलिब्रिटींच्या कमेंट्सनी वेधलं लक्ष!

Chandrapur News: तळोधीतील नळाच्या पाण्यात जंतूसदृश घटक? ग्रामस्थ आक्रमक, ग्रामपंचायतीला २४ तासांचा अल्टिमेटम
4

Chandrapur News: तळोधीतील नळाच्या पाण्यात जंतूसदृश घटक? ग्रामस्थ आक्रमक, ग्रामपंचायतीला २४ तासांचा अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.