फोटो सौजन्य: @carandbike (X.com)
भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक वाहनांना जास्त मागणी मिळत आहे. अनेक वाहन खरेदीदार सुद्धा वाढत्या इंधनाच्या किमतींना कंटाळून आपला मोर्चा इलेक्ट्रिक कारच्या खरेदीकडे वळवत आहे. तसेच सरकार देखील विविध योजना आणि सबसिडी देत देशातील EV विक्रीला प्रोत्साहन देत आहे. अशातच आता देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी Kia Motors आपली नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे.
लवकरच किआ इंडिया भारतात Kia Carens Clavis EV लाँच करण्याची तयारी करत आहे. ही देशातील सर्वात स्वस्त 7-सीटर इलेक्ट्रिक एमपीव्ही म्हणून लाँच केली जाईल का? असे मार्केटमध्ये बोलले जात आहे. चला या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात.
किया 7-सीटर इलेक्ट्रिक एमपीव्ही म्हणून किया कॅरेन्स क्लॅविस ईव्ही लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीकडून ही कार लवकरच लाँच केली जाईल. परंतु त्याच्या लाँचची तारीख अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.
1 लाखाचं डाउन पेमेंट आणि Kia Sonet ची चावी असेल तुमच्या हातात ! समजून घ्या EMI चा हिशोब
कंपनी लाँचच्या वेळी या इलेक्ट्रिक कारची नेमकी किंमत सांगेल. परंतु अशी अपेक्षा आहे की ही कार 15 ते 20 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच केली जाऊ शकते. जर असे झाले तर ती देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर इलेक्ट्रिक एमपीव्ही बनेल.
कियाच्या पहिल्या इलेक्ट्रिक एमपीव्हीमध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात येणार आहे. त्यात सध्या ICE व्हर्जनमध्ये देण्यात येणाऱ्या सर्व फीचर्स असतील. यात एलईडी लाईट्स, एलईडी डीआरएल, पॅनोरॅमिक सनरूफ, चारही चाकांमध्ये डिस्क ब्रेक, एबीएस, ईबीडी, सहा एअरबॅग्ज, एअर प्युरिफायर, अँबियंट लाईट्स, हिल असिस्ट, 360 डिग्री कॅमेरा आणि आयएसओफिक्स चाइल्ड अँकरेज अशी अनेक फीचर्स असतील.
रिपोर्ट्सनुसार, कियाची नवीन इलेक्ट्रिक एमपीव्ही दोन बॅटरी पर्यायांसह आणली जाऊ शकते. ज्यामध्ये 42 किलोवॅट प्रति तास क्षमतेचे आणि 51 किलोवॅट प्रति तास क्षमतेचे बॅटरी पर्याय दिले जाऊ शकतात. या दोन्ही बॅटरी पॅकसह, ही कार एका चार्जमध्ये 400 ते 500 किलोमीटरची रेंज मिळवू शकते.
फुल्ल टॅंकवर 700 KM ची रेंज ! Honda SP 125 खरेदी करण्यासाठी लागतात लांबच लांब रांगा, किती असेल EMI?
किया ही Carens Clavis EV ही इलेक्ट्रिक बजेट एमपीव्ही म्हणून सादर करणार आहे. या कारला बाजारात असलेल्या कोणत्याही इलेक्ट्रिक एमपीव्हीकडून थेट स्पर्धा होणार नाही. परंतु किमतीच्या बाबतीत, MG Windsor EV, Hyundai Creta Electric आणि लवकरच लाँच होणाऱ्या Maruti Suzuki E Vitara सारख्या एसयूव्हींकडून स्पर्धा होईल.