फोटो सौजन्य: @MaosajiHonda (X.com)
भारतीय मार्केटमध्ये बाईक्सच्या विक्रीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यातही सर्वात जास्त डिमांड ही बजेट फ्रेंडली बाईकला असते. ग्राहक नेहमीच स्वस्तात मस्त अशा बाईकच्या शोधात असतात. तसेच मार्केटमध्ये उत्तम मायलेज देणाऱ्या बाईकची एक वेगळीच हवा असते. अशातच जर तुम्ही एका उत्तम बजेट फ्रेंडली आणि चांगला मायलेज देणारी बाईक खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
भारतीय बाजारपेठेत लोक अशा बाईक शोधत असतात, ज्या किफायतशीर आणि चांगले मायलेज देतात. त्यापैकी एक म्हणजे Honda SP 125 बाईक, जी किफायतशीर असून मायलेजमध्येही उत्तम आहे. चला या होंडा बाईकची किंमत, फीचर्स आणि पॉवरट्रेनबद्दल माहिती जाणून घेऊयात.
भारतीय बाजारात होंडा एसपी 125 ची एक्स-शोरूम किंमत 92,678 रुपयांपासून सुरू होते, जी 1 लाख रुपयांपर्यंत आहे. ही होंडा मोटरसायकल ड्रम आणि डिस्क अशा दोन व्हेरिएंटमध्ये येते. या बाईकमध्ये एबीएस तसेच डिस्क ब्रेकची सुविधा देखील आहे.
इतिहास घडला ! पहिल्यांदाच ड्रायव्हर शिवाय खरेदीदाराच्या घरी पोहोचली Tesla ची कार, भारतात होणार लाँच?
राजधानी दिल्लीमध्ये होंडा एसपी 125 च्या एसटीडी व्हेरिएंटची ऑन-रोड किंमत सुमारे 1 लाख 8 हजार रुपये आहे. या किंमतीत 7,944 रुपये आरटीओ आणि 6,543 रुपये विमा रक्कम समाविष्ट आहे. तुम्ही ही बाईक 5 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर देखील खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला दरमहा किती ईएमआय भरावा लागेल? त्याबद्दल जाणून घेऊयात.
डाउन पेमेंट भरल्यानंतर, तुम्हाला 1 लाख 2 हजार रुपयांचे बाईक लोन घ्यावे लागेल. जर तुम्ही 9.7 टक्के व्याजदराने कर्ज घेतले तर तुम्हाला 3 वर्षांसाठी दरमहा 3 हजार 297 रुपये ईएमआय भरावे लागतील.
फक्त 5 मिनिटात चार्जिंगवर 400 KM ची रेंज ! Mercedes कडून सर्वात पॉवरफुल इलेक्ट्रिक कार सादर
या होंडा बाईकला 123.94cc सिंगल-सिलेंडर BS 6, OBD2,अनुरूप PGM-FI इंजिन मिळते. जे 8 किलोवॅट पॉवर आणि 10.9 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कंपनीच्या मते, ही होंडा बाईक 1 लिटर पेट्रोलमध्ये 65 किमी पर्यंत धावू शकते. जर तुम्ही एकदा या बाईकचे फ्युएल टॅंक फुल्ल केले तर सहज सुमारे 700 किमीचे अंतर कापू शकता.