Kia Cars Diwali Discounts Up To ₹1.70 Lakh (फोटो सौजन्य-AI एआय)
दिवाळीच्या सणानिमित्त किया कार्स दिवाळी डिस्काउंट ऑफर अंतर्गत भारतीय मार्केटमध्ये कस्टमर्सना मोठी बचत करण्याची संधी मिळत आहे. किआ कार्निव्हलवर ₹1.70 लाखांपर्यंत, किया कॅरेन्स क्लॅव्हिस टर्बोवर ₹95,000 आणि किया सोनेट HTK (O) वर ₹65,000 पर्यंत फायदे जाहीर करण्यात आले आहेत. याशिवाय किया सेल्टोस, सिरॉस, सोरेंटो आणि कॅरेन्स क्लॅव्हिस EV वरही वेगवेगळ्या सवलती दिल्या जात आहेत. पण प्रत्येक गाडीवरील बचत ही व्हेरिएंट, एक्सचेंज आणि कस्टमरच्या पात्रतेवर अवलंबून असेल.
किया कार्निव्हलवर सर्वाधिक बचतीची संधी
किया कार्निव्हलवर ₹1 लाख एक्सचेंज बोनस, ₹50,000 कॉर्पोरेट बेनिफिट आणि ₹20,000 स्क्रॅपेज इन्सेंटिव्ह असे एकूण ₹1.70 लाखांपर्यंत फायदे दिले जात आहेत. पण एक्सचेंज आणि स्क्रॅपेज बेनिफिट्स एकाच वेळी मिळतीलच असे नाही. त्यामुळे एक्सचेंज आणि कॉर्पोरेट बेनिफिट एकत्र मिळाल्यास ₹1.50 लाखांपर्यंत बचत होऊ शकते.
किया कॅरेन्स क्लॅव्हिस टर्बोवर ₹10,000 कॅश डिस्काउंट, ₹30,000 एक्सचेंज बोनस, ₹15,000 कॉर्पोरेट बेनिफिट आणि ₹20,000 लॉयल्टी बोनस दिला जात आहे. स्क्रॅपेजसाठी आणखी ₹20,000 चा इन्सेंटिव्ह नमूद करण्यात आला आहे. यामुळे एकूण फायदे ₹95,000 पर्यंत पोहोचतात.
किया सोनेट, सेल्टोस आणि सिरॉसवर काय ऑफर?
किया सोनेट HTK (O) व्हेरिएंटवर ₹15,000 कॅश डिस्काउंट मिळत आहे. एक्सचेंज, कॉर्पोरेट आणि स्क्रॅपेज बेनिफिट्ससह एकूण ₹65,000 पर्यंत बचत होऊ शकते. सोनेटच्या इतर व्हेरिएंटवर ₹50,000 पर्यंत फायदे दिले जात आहेत.
किया कार खरेदीचा मोठा फायदा! 3 वर्षांनंतर ICE कारवर 75%, EV वर 70% रिसेल व्हॅल्यूची हमी
किया कॅरेन्स क्लॅव्हिस EV वर ₹75,000, किया सिरॉस पेट्रोल आणि डिझेलवर ₹55,000 पर्यंत फायदे मिळू शकतात. किया सेल्टोसवर ₹40,000 पर्यंत लॉयल्टी आणि स्क्रॅपेज बेनिफिट्स आहेत. किया सोरेंटोवर ₹40,000 पर्यंत एक्सचेंज आणि लॉयल्टी बोनस दिला जात आहे.
किया सिरॉस EV आणि कॅरेन्स क्लॅव्हिस CNG वर ₹20,000 स्क्रॅपेज इन्सेंटिव्ह नमूद करण्यात आले आहे. या ऑफर्सचा प्रत्यक्ष फायदा डीलरशिप, व्हेरिएंट आणि पात्रतेनुसार बदलू शकतो. त्यामुळे गाडी बुक करण्याआधी जवळच्या किया शोरूममध्ये ऑफरची माहिती घेणे फायदेशीर ठरेल.
Ans: किया कार्निव्हलवर एक्सचेंज, कॉर्पोरेट आणि स्क्रॅपेज बेनिफिट्स मिळून ₹1.70 लाखांपर्यंत फायदे दिले जात आहेत. प्रत्यक्ष बचत पात्रतेवर अवलंबून असेल.
Ans: किया सोनेट HTK (O) व्हेरिएंटवर ₹65,000 पर्यंत फायदे मिळू शकतात. इतर व्हेरिएंटवर ₹50,000 पर्यंत ऑफर दिली जात आहे.
Ans: किया कॅरेन्स क्लॅव्हिस टर्बोवर ₹95,000 पर्यंत फायदे दिले जात आहेत. यामध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट बेनिफिट, लॉयल्टी बोनस आणि स्क्रॅपेज इन्सेंटिव्हचा समावेश आहे.






