Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किया इंडियाची आणखी एक कामगिरी; ‘इंडियाज बेस्ट वर्कप्लेसेस २०२६’मध्ये मानाचा सन्मान

ग्रेट प्लेस टू वर्क इंडियाकडून किया इंडियाला ‘इंडियाज बेस्ट वर्कप्लेसेस इन ऑटोमोटिव्ह २०२६’ हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळाला आहे. विश्वास, कर्मचारी-केंद्रित कार्यसंस्कृती, नावीन्य आणि उच्च कर्मचारी सहभागामुळे कंपनीने हा मान पटकावला.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 08, 2026 | 04:34 PM
किया इंडियाची आणखी एक कामगिरी; ‘इंडियाज बेस्ट वर्कप्लेसेस २०२६’मध्ये मानाचा सन्मान
Follow Us
Follow Us:

मुंबई, ८ जुलै २०२६: किया इंडिया या भारतातील अग्रगण्य मास-प्रीमियम कार उत्पादक कंपनीला ग्रेट प्लेस टू वर्क इंडियाकडून इंडियाज बेस्ट वर्कप्लेसेस™ इन ऑटोमोटिव्ह २०२६ म्हणून गौरवण्यात आले आहे. या सन्‍मानामधून किया इंडियाची विश्वास, सहयोग आणि निरंतर शिकण्यावर आधारित कार्यसंस्कृती निर्माण करण्याप्रती सातत्यपूर्ण कटिबद्धता दिसून येते, जिथे कर्मचाऱ्यांना नाविन्यपूर्ण विचार करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी आणि कंपनीच्या दीर्घकालीन यशात मोलाचे योगदान देण्यासाठी सक्षम केले जाते.

या वर्षाच्या सुरुवातीला मिळालेल्या सलग दुसऱ्या ग्रेट प्लेस टू वर्क सर्टिफिकेशन नंतर आता हा सन्मान मिळाला आहे, ज्यामुळे सर्वसमावेशक आणि उच्च-कामगिरी देणारे वर्कप्लेस निर्माण करण्यावर कंपनीने ठेवलेल्या सातत्यपूर्ण लक्ष्याची पुष्टी होते. कर्मचारी मौल्यवान, आदरयुक्त आहेत आणि त्यांना उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असे वातावरण तयार करून किया इंडिया आपले कर्मचारी-प्रथम’ तत्त्व अधिक दृढ करत आहे, तसेच आपल्या व्यवसायाची वाढ आणि परिवर्तनाला पाठबळ देत आहे.

ऑफरोडींगचं प्रोफेशनल ट्रेनिंग घ्यायचंय? डोंगरदऱ्यात चिखलात ऑफरोडींग करायचंय? या आहेत मुंबईस्थित टॉप ५ ट्रेनिंग एजन्सीज! लगेच पाहा

हे मूल्यमापन ग्रेट प्लेस टू वर्क इंडियाच्या कडक वर्कप्लेस संस्कृती आराखड्यावर आधारित आहे. किया इंडियाने ९३ टक्‍के कर्मचारी सहभागासह एकूण ७६ टक्‍क्‍यांचा ट्रस्ट इंडेक्स स्कोअर प्राप्त केला आहे, ज्‍यामधून कर्मचाऱ्यांचा उच्च दर्जाचा विश्वास, सहभाग आणि कंपनीच्‍या कर्मचारी-प्रथम संस्कृतीवरील दृढ विश्वास दिसून येतो.

या सन्‍मानाबाबत मत व्‍यक्त करत *किया इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ ग्वांगु ली म्हणाले, “आमचे कर्मचारी हे नेहमी किया इंडियाच्या या उल्लेखनीय प्रवासामागील प्रेरक शक्ती राहिले आहेत. इंडियाज बेस्ट वर्कप्लेसेस इन ऑटोमोटिव्ह २०२६ म्हणून ओळखले जाणे हा आम्ही सर्वांनी मिळून तयार केलेल्या संस्कृतीचा अभिमानास्पद पुरावा आहे. ही संस्कृती नाविन्यपूर्ण विचार, निरंतर शिकणे, परस्पर आदर आणि अर्थपूर्ण प्रभाव पाडण्याचे स्वातंत्र्य देण्यास प्रोत्साहन देते. आम्ही सर्वोत्तम वातावरण तयार करण्यासाठी कटिबद्ध आहोत, जिथे प्रत्येक कर्मचाऱ्याला आदराची वागणूक मिळेल, तो सक्षम बनेल आणि त्याला उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल. हा सन्मान किया इंडिया कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा आहे, ज्यांची आवड, समर्पण आणि अटळ कटिबद्धता आमच्या यशाला पुढे नेत आहे आणि आमच्या कंपनीचे भविष्य घडवत आहे.”

पुणे ऑफरोडरस; फक्त तुमच्यासाठी! ‘या’ आहेत पुण्यातील टॉप ५ ऑफरोडींगचं प्रोफेशनल ट्रेनिंग एजन्सीज!

या प्रसंगी मत व्‍यक्त करत ग्रेट प्लेस टू वर्क इंडियाचे सीईओ बलबीर सिंग म्हणाले, “या सन्‍मानामधून किया इंडियाची विश्वास, आदर, सहकार्य आणि आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी यांवर आधारित वर्कप्लेस संस्कृती निर्माण करण्याप्रती दृढ कटिबद्धता निदर्शनास येते किया इंडियाने सिद्ध केले आहे की, कर्मचाऱ्यांना सक्षम, मौल्यवान आणि प्रेरित वाटू लागते, तेव्हा ते नाविन्यपूर्ण विचार करू शकतात, ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव देऊ शकतात आणि व्यवसायात शाश्वत यश मिळवू शकतात. ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी प्रबळ मापदंड ठरणाऱ्या या उच्च-विश्वासू आणि उच्च-कामगिरी करणाऱ्या वर्कप्लेस संस्कृतीला जोपासल्याबद्दल आम्ही किया इंडियाच्या नेतृत्व टीमचे आणि प्रत्येक कर्मचाऱ्याचे कौतुक करतो. आम्ही अधिक सर्वसमावेशक आणि प्रेरणादायी वर्कप्लेस निर्माण करण्याच्या त्यांच्या या प्रवासाला पुढील यशासाठी शुभेच्छा देतो.”

Web Title: Kia india best place to work auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • automobile
  • india
  • kia

संबंधित बातम्या

VLF स्ट्राडा इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच; किंमत ₹1.20 लाख, रेंज 250 किमीपर्यंत! जाणून घ्या
1

VLF स्ट्राडा इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच; किंमत ₹1.20 लाख, रेंज 250 किमीपर्यंत! जाणून घ्या

भारतात लवकरच लाँच होणार ५ नवीन बाईक्स; हिरो ते बजाज सज्ज!
2

भारतात लवकरच लाँच होणार ५ नवीन बाईक्स; हिरो ते बजाज सज्ज!

भारतात येणार 3 नवीन लग्झरी कार ब्रँड्स! टाटाच्या अविन्यापासून जेनेसिसपर्यंत मोठी तयारी
3

भारतात येणार 3 नवीन लग्झरी कार ब्रँड्स! टाटाच्या अविन्यापासून जेनेसिसपर्यंत मोठी तयारी

मारुती, टाटा, होंडा आणि ह्युंदाई भारतात नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार! जाणून घ्या सविस्तरपणे
4

मारुती, टाटा, होंडा आणि ह्युंदाई भारतात नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार! जाणून घ्या सविस्तरपणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.