Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किया इंडियाची ऐतिहासिक कामगिरी! जून महिन्यात २४,५५२ गाड्यांची विक्री करत नोंदवला नवा उच्चांक

किया इंडियाने जून २०२६ मध्ये २४,५५२ गाड्यांची विक्री करून १९% वार्षिक वाढीसह जून महिन्यातील आपल्या विक्रीचा ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. पहिल्या सहामाहीत १.६३ लाखांहून अधिक वाहनांची विक्री करणाऱ्या कियाच्या या यशात नव्या सेल्टोस आणि सोनेट या मॉडेल्सचा तसेच विस्तारलेल्या नेटवर्कचा मोठा वाटा आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 02, 2026 | 11:22 PM
किया इंडियाची ऐतिहासिक कामगिरी! जून महिन्यात २४,५५२ गाड्यांची विक्री करत नोंदवला नवा उच्चांक
Follow Us
Follow Us:

भारतीय वाहन बाजारात आपला दबदबा कायम राखत किया इंडियाने जून २०२६ मध्ये विक्रीचा एक नवा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. कंपनीने या महिन्यात २४,५५२ गाड्यांची होलसेल विक्री केली असून, कियाने भारतात पाऊल ठेवल्यापासूनची जून महिन्यातील ही आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी ठरली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच जून २०२५ मध्ये कंपनीने २०,६२५ गाड्यांची विक्री केली होती. त्या तुलनेत यंदा कंपनीच्या विक्रीत तब्बल १९ टक्क्यांची उल्लेखनीय वार्षिक वाढ झाली आहे.

पहिल्या सहामाहीतही विक्रमी विक्री

फक्त जून महिनाच नव्हे, तर २०२६ या कॅलेंडर वर्षाची पहिली सहामाही देखील किया इंडियासाठी अत्यंत फायदेशीर ठरली आहे. या पहिल्या सहा महिन्यांत कंपनीने एकूण १,६३,७४९ वाहनांची विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा १,४२,१३९ इतका होता. म्हणजेच कंपनीने पहिल्या सहामाहीत १५.२ टक्क्यांची दमदार वृद्धी नोंदवली आहे.

कियाचा मोठा धमाका! कियाच्या ३ नवीन एसयूव्ही लवकरच येणार मार्केटमध्ये!

‘सेल्टोस‘ आणि ‘सोनेट‘ ठरल्या गेमचेंजर

कियाच्या या यशात ‘किया सेल्टोस’ आणि ‘किया सोनेट’ या मॉडेल्सचा सिंहचा वाटा आहे. मध्यम आकाराच्या एसयूव्ही प्रकारात सेल्टोसची मागणी प्रचंड आहे. तिचे अद्ययावत डिझाईन, प्रगत फीचर्स, प्रीमियम तंत्रज्ञान आणि ‘भारत NCAP’ कडून मिळालेले ५-स्टार सेफ्टी रेटिंग यामुळे ग्राहकांनी या गाडीला पसंती दिली आहे. विशेष म्हणजे, कियाचे जुने ग्राहकही आता नव्या सेल्टोसकडे आकर्षित होत आहेत. तर दुसरीकडे, कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकारात ‘सोनेट’ने आपली मजबूत पकड कायम ठेवत कंपनीच्या विक्रीचा आलेख उंचावला आहे. याशिवाय Carens Clavis, MY2026 Syros आणि Clavis EV यांसारख्या मॉडेल्सना मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे कंपनीला हा टप्पा गाठता आला.

किया इंडियाकडून प्रोजेक्ट ‘डी.आर.ओ.पी’च्या फेज-४ ची सुरुवात; शाश्वत विकास आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाला नवी गती

नेटवर्कचा विस्तार

ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी कियाने भारतात आपले जाळे मोठ्या प्रमाणावर विस्तारले आहे. सध्या देशातील ४०७ शहरांमध्ये कंपनीचे ८९२ टचपॉइंट्स (शोरूम्स आणि्ह सर्विस सेंटर्स) कार्यरत आहेत. तसेच, कंपनीच्या अधिकृत ‘प्री-ओन्ड’ कार व्यवसायाचे १३३ आउटलेट्स सुरू झाले आहेत, ज्यामुळे जुन्या गाड्यांची खरेदी-विक्री आणि एक्सचेंज करणे सोपे झाले आहे.

या यशाबद्दल बोलताना किया इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष सेल्स आणि मार्केटिंग अतुल सूद म्हणाले, “वर्षाची पहिली सहामाही ऐतिहासिक विक्रीसह पूर्ण करणे हा किया इंडियासाठी एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. हा पराक्रम ग्राहकांचा आमच्या ब्रँडवरील अढळ विश्वास दर्शवतो. नवीन सेल्टोस, सोनेट आणि केरेन्स क्लॅव्हिसच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे आणि माय२६ सायरसला मिळालेल्या उत्कृष्ट प्रतिसादामुळेच आम्ही हे यश मिळवू शकलो आहोत.”

Web Title: Kia indias sales hike in june month auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 10:16 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • kia

संबंधित बातम्या

‘कारच्या वायपर’चा शोध लावला होता या महिलेने! ही आहे‘मेरी अँडरसन’ यांच्या क्रांतिकारी शोधाची गोष्ट
1

‘कारच्या वायपर’चा शोध लावला होता या महिलेने! ही आहे‘मेरी अँडरसन’ यांच्या क्रांतिकारी शोधाची गोष्ट

कारचा ‘वायपर’ चालू केल्यावर खडखड आवाज येतोय? घरच्या घरी करा ‘हे’ सोपे उपाय!
2

कारचा ‘वायपर’ चालू केल्यावर खडखड आवाज येतोय? घरच्या घरी करा ‘हे’ सोपे उपाय!

नवीन गाड्यांच्या लाँचच्या जोरावर रेनॉल्ट आणि निस्सानच्या विक्रीत जून महिन्यात मोठी वाढ!
3

नवीन गाड्यांच्या लाँचच्या जोरावर रेनॉल्ट आणि निस्सानच्या विक्रीत जून महिन्यात मोठी वाढ!

अँब्यूलन्स किंवा फायर ब्रिगेडची गाडी चालवायची आहे? फक्त ड्रायव्हिंग लायसन्स पुरेसे नाही; ‘बॅज’ आणि विशेष प्रशिक्षण ही आवश्यक आहे!
4

अँब्यूलन्स किंवा फायर ब्रिगेडची गाडी चालवायची आहे? फक्त ड्रायव्हिंग लायसन्स पुरेसे नाही; ‘बॅज’ आणि विशेष प्रशिक्षण ही आवश्यक आहे!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.