फोटो सौजन्य: iStock
स्वतःची कार असावी ही प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. खरंतर, स्वतःची कार खरेदी करण्याचा क्षण हा आयुष्यातील सर्वात आनंददायी क्षणांपैकी एक असतो. म्हणूनच तर अनेक जण हा क्षण टिपण्यासाठी फोटोज किंवा व्हिडिओज काढतात. मात्र, कार खरेदी करताना बजेटकडे सुद्धा पाहावे लागते. त्यातही सगळेच बजेट फ्रेंडली कार्सच्या शोधात असतात.
जर तुमचा बजेट 5 लाख रुपये असेल आणि तुम्हाला नवीन कार घ्यायची असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी योग्य आहे. भारतात अजूनही अशा अनेक लहान कार उपलब्ध आहेत ज्या कमी किमतीत चांगला मायलेज, आवश्यक फीचर्स आणि उत्तम परफॉर्मन्स देतात.
खरंतर, या कार विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आल्या आहेत. चला जाणून घेऊया अशा पाच सर्वात किफायतशीर कारबद्दल ज्या लोकप्रिय तर आहेतच मात्र तुमच्या बजेटमध्ये सुद्धा आहे.
अमेरिका आणि इटलीच्या नाकावर टिचून ‘हा’ देश बनला Luxury Cars चा बादशाह, जगभरात वाजतोय डंका
मारुती अल्टो के10 ही देशातील सर्वाधिक विक्री आणि लोकप्रिय असणाऱ्या कारपैकी एक आहे. याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4.23 लाख रुपये आहे, ज्यामुळे ती भारतातील सर्वात स्वस्त कारपैकी एक मानली जाते. ही कार 1.0-लिटर पेट्रोल इंजिनने सुसज्ज आहे, जे केवळ चांगला पिकअपच देत नाही तर मायलेजच्या बाबतीतही चांगली परफॉर्म करते.
जर तुम्ही मिनी एसयूव्हीसारखी दिसणारी कार शोधत असाल, तर मारुती एस-प्रेसो तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकते. त्याची सुरुवातीची किंमत 4.26 लाख रुपये आहे आणि त्यात 1.0-लिटर पेट्रोल इंजिन देखील आहे. ही कार विशेषतः त्यांच्यासाठी आहे ज्यांना कॉम्पॅक्ट आकारासह हाय ग्राउंड क्लीयरन्स हवा आहे.
रेनॉल्ट क्विड ही हॅचबॅक कार आहे, ज्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4.70 लाख रुपये आहे. क्विड त्याच्या आकर्षक एक्सटिरिअर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 8-इंच टचस्क्रीनसारख्या आधुनिक फीचर्ससाठी ओळखली जाते. त्यात 1.0-लिटर पेट्रोल इंजिन देखील आहे, जे चांगला पॉवर आणि मायलेज देते.
रिव्हर्स गिअरमध्ये किती वेगाने धावू शकते कार? प्रत्येक कार चालकाला याचे उत्तर ठाऊक असलेच पाहिजे
मारुती सुझुकी सेलेरियोची किंमत 5 लाख रुपयांपेक्षा थोडी जास्त आहे, मात्र त्याच्या बेस्ट मायलेज आणि सीएनजी पर्यायामुळे, सेलेरियो अजूनही सर्वात किफायतशीर पर्यायांपैकी एक मानली जाते. विशेषतः लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या आणि इंधन खर्च कमी ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी ही कार बेस्ट आहे. ही 1.0-लिटर पेट्रोल इंजिनसह येते, परंतु त्यात एक सीएनजी व्हेरिएंट देखील उपलब्ध आहे, जो उत्कृष्ट मायलेज देतो.
टाटा टियागोची सुरुवातीची किंमत 4.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरु होते आणि या बजेटमधील ही एकमेव कार आहे, जी ४-स्टार सेफ्टी रेटिंगसह येते. टियागोमध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन आहे. त्याची बिल्ड क्वालिटी, ड्युअल एअरबॅग्ज, एबीएस आणि इतर सेफ्टी फीचर्स या कारला एक वेगळी ओळख देतात.