फोटो सौजन्य: iStock
अनेकदा मोटर ट्रेनिंग स्कूलमध्ये कार चालवताना आपल्याला क्लच, गिअर आणि ॲक्सिलरेटेर वर लक्ष देण्यास सांगितले जाते. तसेच, पहिल्याच दिवशी कार रिव्हर्स गिअरमध्ये कशी घ्यावी याबाबत सुद्धा शिकवले जाते. अनेकदा असे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, जिथे चक्क रिव्हर्स गिअरमध्ये स्टंट केले जाते. मात्र, रिव्हर्स गिअरमध्ये कार वेगाने धावू शकते का? चला याबद्दल जाणून घेऊयात.
बऱ्याचदा लोकांना असे वाटते की कार फक्त फॉरवर्ड गिअरमध्येच वेगाने जाऊ शकते, तर रिव्हर्स गिअर फक्त हळूहळू मागे जाण्यासाठी वापरले जाते. पण खरंच असं आहे का? खरं तर, कोणत्याही कारचा स्पीड थेट त्याच्या इंजिन आणि गिअर सिस्टमच्या पॉवरशी संबंधित असतो. जर कारचे इंजिन पॉवरफुल असेल आणि ट्रान्समिशन सिस्टम रिव्हर्स गिअरमध्ये योग्यरित्या पॉवर देत असेल, तर ती कार मागेही वेगाने जाऊ शकते.
कारचा वेग त्याच्या इंजिनच्या ताकदीवर अवलंबून असतो. जर कारमध्ये 1000 सीसी इंजिन असेल, तर याचा कमाल वेग 4000 सीसी किंवा त्याहून अधिक इंजिन असलेल्या रेसिंग कार इतका नसेल.
इंजिन जितके पॉवरफुल असेल तितकीच ती कार पुढे किंवा मागे धावू शकेल – मग ती पुढे जात असो किंवा मागे. हेच कारण आहे की रेसिंग कार सामान्य पॅसेंजर कारपेक्षा अनेक पटीने वेगवान असतात, कारण त्या विशेषतः हाय-स्पीड परफॉर्मन्ससाठी डिझाइन केलेल्या असतात.
कारच्या गिअरबॉक्समध्ये रिव्हर्स गियर अशा प्रकारे डिझाइन केला असतो की तो मर्यादित वेगानेच काम करतो. सामान्य कारमध्ये, रिव्हर्स गिअरचा स्पीड 20 ते 40 किमी/तास असतो, कारण तो बहुतेकदा पार्किंग किंवा वळण घेण्यासारख्या लहान हालचालींसाठी वापरला जातो. जर ट्रान्समिशन आणि इंजिन पॉवर पूर्णपणे रिव्हर्स गिअरमध्ये ऑपरेट केले तर कार लवकर मागे जाऊ शकते, परंतु बहुतेक कार कंपन्या असे करत नाहीत कारण जास्त वेगाने रिव्हर्स जाण्यात धोका असतो.
खास Batman Lovers साठी STUDDS ने लाँच केला स्टायलिश हेल्मेट, किंमत फक्त…
जर तुम्हाला वाटत असेल की रिव्हर्स गिअर फक्त स्लो स्पीडसाठी आहे, तर Rimac Nevera तुमचा दृष्टिकोन बदलू शकते. ही एक हाय-परफॉर्मन्स असलेली इलेक्ट्रिक हायपरकार आहे, जिने रिव्हर्स गिअरमध्ये 275.74 किमी प्रतितास वेग गाठण्याचा विक्रम केला आहे.
2023 मध्ये रिमॅक नेव्हेराने जुलै हा विक्रम केला होता आणि ती अजूनही रिव्हर्स गिअरमध्ये जगातील सर्वात वेगवान कार मानली जाते. ही कार चार इलेक्ट्रिक मोटर्ससह येते जी तिला 1900+ हॉर्सपॉवरपर्यंत पॉवर देते. याचा रिव्हर्स गिअर देखील त्याच पॉवरने चालतो कारण इलेक्ट्रिक कारमध्ये फॉरवर्ड आणि रिव्हर्स दोन्हीसाठी वेगळे गिअर सेटअप नसते.