
शरद पवारांचे कार कलेक्शन
दिल्लीमध्ये शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शरद पवार यांच्या निवासस्थानी डिनर पार्टी झाली. यामध्ये राजकीय नेत्यांसह उद्योगपती सहभागी झाले होते. या पार्टीला अजित पवारांची देखील विशेष उपस्थिती होती. शरद पवार यांचा राजकीय प्रवास फारच प्रेरणादायी आहे. 27 व्या वर्षी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. जुलै 1978 मध्ये ‘पुरोगामी लोकशाही दलाचे’ नेते म्हणून शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. वयाच्या 38 व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाल्याने ते राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले. मात्र, तुम्हाला त्यांच्या कार कलेक्शनबद्दल ठाऊक आहे का? चला याबद्दल जाणून घेऊयात.
Kia Seltos Vs Tata Sierra, कोणती SUV आहे एकदम बेस्ट? खरेदी करण्याअगोदर जाणून घ्या सर्वकाही
शरद पवारांच्या कार कलेक्शनबाबत अशी ठोस माहिती नाही. मात्र, ते अनेकदा लक्झरी कार्समधून प्रवास करत असतात. ते कोणत्या कारने प्रवास करतात, त्याबद्दल माहिती जाणून घेऊयात.
शरद पवारांना अनेकदा टोयोटा लँड क्रूझरमध्ये पहिले आहे. ही एक मजबूत आणि लक्झरीयस एसयूव्ही असून तिला तिच्या आरामदायी राइड आणि उच्चस्तरीय सेफ्टीसाठी ओळखले जाते. राजकीय दौर्यांदरम्यान विविध ठिकाणी सहज प्रवास करण्यासाठी ही कार उपयुक्त ठरते.
शरद पवार लेक्सस LX 570 चा वापर करतानाही दिसले आहेत. टोयोटाच्या लक्झरी डिव्हिजनमधील ही हाय-टेक्नॉलॉजी युक्त आणि अत्यंत प्रीमियम एसयूव्ही आहे.
या’ SUV ला ग्राहकांनी लांबूनच केला नमस्कार! अचानक 79 टक्क्यांनी विक्री आपटली, कंपनी टेन्शनमध्ये
जून 2024 मध्ये आलेल्या अहवालांनुसार आणि सोशल मीडिया पोस्ट्सनुसार त्यांनी नवीन मर्सिडिज-बेंझ C-क्लास खरेदी केली किंवा तिचा वापर केला असल्याचे समोर आले आहे. तसेच शरद पवार ‘007’ नंबर प्लेट असलेल्या एका मर्सिडिजमध्येही दिसले होते, मात्र ती विशिष्ट गाडी स्थानिक आमदाराची असल्याची माहिती आहे.