फोटो सौजन्य: X.com
नवीन Kia Seltos मध्ये कंपनीने अनेक हाय-टेक आणि प्रीमियम फीचर्स दिले आहेत. ही SUV 30-inch ट्वीन डिस्प्ले सेटअपसह येते, ज्यामध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि मोठा इन्फोटेनमेंट स्क्रीन आहे. याशिवाय वायरलेस चार्जर, वेंटिलेटेड सीट्स, 10-way powered ड्रायव्हर सीट, अॅम्बियंट लाइटिंग, Bose चे 8 स्पीकर्स, पॅनोरमिक सनरूफ आणि Level-2 ADAS यासारखे फीचर्स तिला अधिक आकर्षक बनवतात.
या’ SUV ला ग्राहकांनी लांबूनच केला नमस्कार! अचानक 79 टक्क्यांनी विक्री आपटली, कंपनी टेन्शनमध्ये
दुसरीकडे Tata Sierra फीचर्सच्या बाबतीत आणखी प्रीमियम ठरते. यात LED projector headlight, कनेक्टेड LED टेललाइट, फ्लश डोर हँडल, triple-screen setup, 360° camera, ब्लाइंड-स्पॉट मॉनिटर, Hypr HUD, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, 12-speaker Dolby Atmos system आणि सेगमेंटमधील सर्वात मोठा पॅनोरमिक सनरूफ मिळतो. त्यासोबत रिअर सनशेड, एअर प्यूरीफायर, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स आणि पावर्ड टेलगेटही उपलब्ध आहे. त्यामुळे फीचर्सच्या बाबतीत Tata Sierra स्पष्टपणे Seltos पेक्षा पुढे आहे.
इंजिनच्या बाबतीत नवीन Kia Seltos तीन पर्यायांसह येते, 1.5L पेट्रोल (115 PS), 1.5L टर्बो पेट्रोल (160 PS) आणि 1.5L डिझेल (116 PS). यात मॅन्युअल, IVT, IMT आणि ऑटोमॅटिक असे सर्व ट्रान्समिशन पर्याय मिळतात.
Tata Sierra मध्येही तीन इंजिन पर्याय दिले आहेत, 1.5L टर्बो पेट्रोल (160 PS), 1.5L Revotron पेट्रोल (106 PS) आणि 1.5L डिझेल (118 PS). विशेष म्हणजे Sierra चे डिझेल इंजिन 280 Nm टॉर्क देते, जे Seltos पेक्षा जास्त आहे. त्यामुळे डिझेल परफॉर्मन्सच्या बाबतीत Sierra अधिक मजबूत ठरते.
Bolero ला धडकी भरवणारी Tata Sumo 2025 मार्केटमध्ये जोरदार एंट्री मारणार?
डायमेंशन्सनुसार Kia Seltos ची लांबी 4,460 mm आणि रुंदी 1,830 mm आहे, तर व्हीलबेस 2,690 mm आहे. Tata Sierra ची लांबी 4,340 mm असली तरी तिची रुंदी 1,841 mm आणि व्हीलबेस 2,730 mm आहे. म्हणजेच Seltos लांब आणि थोडी अरुंद असली तरी Sierra मध्ये मोठ्या व्हीलबेसमुळे केबिनमध्ये अधिक स्पेस मिळतो.
Tata Sierra ची किंमत 11.49 लाख ते 18.49 लाख दरम्यान आहे. नवीन Kia Seltos ची किंमत 2 जानेवारी 2026 रोजी जाहीर होईल, परंतु अंदाजानुसार तिची सुरुवातीची किंमत Sierra पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.






