फोटो सौजन्य: @sagar_smrt/ X.com
Tata Curvv लाँच होण्यापूर्वीच खूप चर्चेत होती, पण आता ती विक्रीच्या कठीण टप्प्याला तोंड देत आहे. नोव्हेंबर 2025 च्या आकडेवारीवरून या एसयूव्ही-कूप स्टाईल कारच्या मागणीत मोठी घट दिसून आली आहे. या एसयूव्हीच्या वार्षिक विक्रीत 79% घट झाली आहे. चला या एसयूव्हीच्या विक्री अहवालावर एक नजर टाकूया.
Tata Sierra खरंच 29.9 किमीचा मायलेज देऊ शकते? जाणून घ्या यामागील सत्यता
गेल्या वर्षी नोव्हेंबर 2024 मध्ये टाटा कर्व्हचे 5,101 युनिट्स विकून मोठा रेकॉर्ड प्रस्थापित केला. मात्र, नोव्हेंबर 2025 मध्ये विक्री फक्त 1,094 युनिट्सवर आली. ही 79 टक्क्यांची मोठी घट दर्शवते, जी कोणत्याही लोकप्रिय कारसाठी एक मोठी चिंता आहे.
ग्राउंड रिपोर्ट्स आणि मार्केट ट्रेंड्सनुसार, Curvv च्या विक्रीत घट होण्याची संभाव्य कारणे जाणून घेऊयात.
टाटा Curvv च्या सेगमेंटमध्ये आता असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. या सेगमेंटमध्ये नवीन Hyundai Creta, Tata Nexon, Kia Seltos, Maruti Grand Vitara आणि Toyota Hyrider सारख्या SUV चा समावेश आहे.
काही ग्राहक Curvv ची किंमत त्याच्या फीचर्स आणि उपयुक्ततेसाठी थोडी जास्त मानतात.
Curvv ची कूप-SUV डिझाइन प्रत्येक ग्राहकांना आकर्षक वाटत नाही. मोठा प्रेक्षक अजूनही पारंपारिक SUV डिझाइन पसंत करतात.
Bolero ला धडकी भरवणारी Tata Sumo 2025 मार्केटमध्ये जोरदार एंट्री मारणार?
टाटाच्या दोन सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्ही, नेक्सॉन आणि पंच यांनी ग्राहकांचे अधिक लक्ष वेधले आहे. त्यांच्या प्रचंड यशामुळे कर्व्हच्या विक्री कमी झाली आहे.
Tata Curvv च्या किमती 9.65 लाखांपासून सुरू होतात आणि टॉप-ऑफ-द-लाइन मॉडेल (अॅकम्प्लिश्ड प्लस डार्क डिझेल डीसीए) साठी 18.85 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जातात.






