फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरच्या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे इंधनाची वाढती किंमत. अशातच अनेक अशा दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करतात. नुकतेच मार्केटमध्ये एक अशी ई-स्कूटर लाँच झाली आहे, जी चक्क 20 मिनिटात चार्ज होऊ शकते. तसेच ही स्कूटर चालवण्यासाठी तुम्हाला लायसन्सची सुद्धा गरज भासणार नाही.
Zelio E Mobility ने त्यांच्या लो स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर Gracy+ चे अपडेटेड व्हर्जन लाँच केले आहे. विशेष म्हणजे यामध्ये वापरलेली बीएलडीसी मोटर पूर्ण चार्ज केल्यावर फक्त 1.8 युनिट वीज वापरते. त्यानुसार, ही स्कूटर फक्त 20 रुपयांमध्ये चार्ज होते. याचा ग्राउंड क्लिअरन्स 180 मिमी पर्यंत वाढवण्यात आला आहे जेणेकरून ती भारतीय रस्त्यांवर सहज धावू शकेल. या स्कूटरचे वजन 88 किलो आहे आणि ही 150 किलोपर्यंतचा भार वाहून नेऊ शकते. त्यामुळे, डिलिव्हरी एजंट, ऑफिसमध्ये ये-जा करणारे आणि विद्यार्थ्यांसाठी ही स्कूटर परफेक्ट आहे.
Maruti Suzuki XL6 आता जास्तच झाली सुरक्षित, मात्र किंमतीत सुद्धा झाली वाढ
नवीन ग्रेसी+ आता सहा बॅटरी पर्यायांसह येते, ज्यामध्ये लिथियम-आयन आणि जेल बॅटरी दोन्ही पर्यायांचा समावेश आहे. त्याचे टॉप मॉडेल्स एका चार्जवर 130 किमी पर्यंत धावू शकतात. हे विशेषतः ज्यांना लांब अंतराचा प्रवास करावा लागतो त्यांच्यासाठी डिझाइन केलेले आहेत. स्कूटरचा टॉप स्पीड 25 किमी प्रतितास आहे. म्हणून, ही स्कूटर लो-स्पीड कॅटेगरीत येते आणि बहुतेक भारतीय राज्यांमध्ये, याला ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक नाही.
फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, Gracy+ मध्ये डिजिटल डिस्प्ले, कीलेस स्टार्ट, DRL, अँटी-थेफ्ट अलार्म, USB चार्जिंग पोर्ट, पार्किंग गियर आणि पिलियनसाठी फूटरेस्ट आहे. ही स्कूटर व्हाइट, ग्रे, ब्लॅक आणि ब्ल्यू रंगात येते.
कंपनी या स्कूटरवर चांगली सर्व्हिस वॉरंटी देखील देते. यावर दोन वर्षांची वॉरंटी, लिथियम-आयन बॅटरीवर तीन वर्षांची वॉरंटी तर जेल बॅटरीवर एक वर्षाची वॉरंटी मिळते.
धमाकेदार Hero HF Deluxe Pro मार्केटमध्ये लाँच, फक्त 73,550 रुपयात मिळेल जास्त मायलेज
बॅटरीनुसार चार्जिंगचा वेळ बदलतो. लिथियम-आयन बॅटरी चार्ज होण्यासाठी सुमारे 4 तास लागतात, तर जेल बॅटरी चार्ज होण्यासाठी 8 ते 12 तास लागतात. यामध्ये ब्रेकिंग सिस्टीम देखील सुधारण्यात आली आहे. समोर ड्रम ब्रेक आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. तसेच, अधिक आरामासाठी हायड्रॉलिक शॉक अॅब्सॉर्बर बसवण्यात आले आहेत. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, त्याची किंमत ₹58,000 पासून सुरू होते.