फोटो सौजन्य: @carandbike (X.com)
पूर्वी कार खरेदी करताना जास्तकरून ग्राहक त्याच्या मायलेज आणि किमतीकडे जास्त लक्ष द्यायचे. मात्र, आज ही स्थिती पूर्णपणे बदलले आहे. आजचा ग्राहक हा कार खरेदी करताना त्यातील सेफ्टी फीचर्सकडे सुद्धा लक्ष देतो. ग्राहकांची हीच बाब लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये उत्तम सेफ्टी फीचर्स ऑफर करत असतात. तसेच, कारचे क्रॅश टेस्ट सुद्धा करतात. नुकतेच मारुती सुझुकीने Maruti XL6 ला अपडेट केले आहे. कंपनीने कारचे सेफ्टी फीचर्समध्ये अपडेट केले आहे.
मारुती सुझुकी भारतीय मार्केटमध्ये अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर करते. अलीकडेच एमपीव्ही सेगमेंटमध्ये कंपनीने सादर केलेली Maruti XL6 अपडेट करण्यात आली आहे. यासोबतच या कारची किंमतही वाढवण्यात आली आहे. कंपनीने त्यात कोणत्या प्रकारचे सेफ्टी फीचर्स अपडेट केले आहेत. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
वाहतूक पोलिसांना Saiyaara ची भुरळ! खास चेतावणी देत म्हटलं, “अन्यथा तुमचं प्रेम ही अर्धवट राहील…”
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मारुती सुझुकी XL6 चे सेफ्टी फीचर अपडेट करण्यात आले आहे. आता त्यात स्टॅंडर्ड म्हणून सहा एअरबॅग्जची सुरक्षा दिली आहे. सेफ्टी फीचर अपडेटनंतर, ते तात्काळ प्रभावाने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सेफ्टी फीचर अपडेटसोबतच त्याची किंमत देखील थोडी वाढवण्यात आली आहे. माहितीनुसार, त्याची किंमत 0.8 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे.
एका Toyota Fortuner वर किती टॅक्स लावते सरकार? आकडा वाचाल तर हैराण व्हाल !
यात एलईडी हेडलाइट्स, फॉग लॅम्प, एलईडी डीआरएल, 16 इंच ड्युअल टोन अलॉय व्हील्स, बॉडी क्लॅडिंग, रिअर वायपर आणि वॉशर, रूफ रेल, लाकडी इन्सर्टसह ब्लॅक केबिन, तीन स्पोक स्टीअरिंग व्हील, दुसऱ्या रांगेतील कॅप्टन सीट्स, फूटवेल लाइटिंग, ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, ऑटो एसी, रेन सेन्सिंग वायपर, क्रूझ कंट्रोल, सात इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ॲपल कार प्ले, ईएससी, रिअर पार्किंग सेन्सर, 360 डिग्री कॅमेरा, टीपीएमएस, हिल होल्ड असिस्ट, रिअर डिफॉगर अशी वैशिष्ट्ये आहेत.
XL6 ही मारुती सुझुकी बजेट MPV सेगमेंटमध्ये देते. ती मारुती एर्टिगा, रेनॉल्ट ट्रायबर, किआ कॅरेन्स क्लॅव्हिस सारख्या MPV शी स्पर्धा करते.