
Komaki One Ace ची बॅटरी आणि रेंज
Komaki One Ace मध्ये 2.2kWh क्षमतेची Lithium Ferro Phosphate बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, फुल चार्ज केल्यानंतर हा स्कूटर 150km पेक्षा जास्त रेंज देऊ शकतो. त्यामुळे ऑफिस, कॉलेज किंवा शहरातील रोजच्या प्रवासासाठी वारंवार चार्जिंग करण्याची चिंता कमी होऊ शकते. सामान्य घरगुती सॉकेटच्या मदतीने बॅटरी चार्ज करता येते आणि 0 ते 100% चार्ज होण्यासाठी साधारण 4 ते 5 तास लागतात.
50-60kmph टॉप स्पीड आणि 3 राइडिंग मोड्स
परफॉर्मन्ससाठी या स्कूटरमध्ये BLDC हब मोटर देण्यात आली आहे. याची टॉप स्पीड 50 ते 60kmph दरम्यान आहे. शहरातील ट्रॅफिकमध्ये रोजच्या वापरासाठी ही स्पीड पुरेशी ठरू शकते. राइडिंगच्या गरजेनुसार Eco, Sport आणि Turbo असे 3 मोड्स मिळतात. ब्रेकिंगसाठी पुढे डिस्क आणि मागे ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत.
फीचर्समध्ये मिळतात अनेक स्मार्ट सुविधा
One Ace मध्ये Vibrant Smart Dash डिस्प्ले देण्यात आला असून त्यावर राइडशी संबंधित आवश्यक माहिती पाहता येते. याशिवाय Reverse Assist, Parking Assist, Repair Switch, Cruise Control आणि Keyless Entry यांसारखे फीचर्स मिळतात. रात्रीच्या राइडसाठी Ultra Bright Full LED Lighting System देण्यात आले आहे. सामान ठेवण्यासाठी 18 लिटरचा बूट स्पेसही मिळतो.
Vinfast Grand Premia इलेक्ट्रिक मोटरबाइकचे डिझाइन आले समोर! खास फ्रंट फेअरिंगसह येणार ही नवी बाइक
₹66,499 किंमत आणि 6 कलर ऑप्शन
Komaki One Ace ची एक्स-शोरूम किंमत ₹66,499 आहे. हा इलेक्ट्रिक स्कूटर 6 कलर ऑप्शनमध्ये अव्हेलेबल आहे. तसेच बॅटरी, मोटर आणि कंट्रोलरसाठी 3 वर्षे किंवा 30,000km पर्यंत वॉरंटी दिली जाते. त्यामुळे कमी बजेटमध्ये चांगली रेंज आणि रोजच्या वापरासाठी आवश्यक फीचर्स शोधणाऱ्यांसाठी हा स्कूटर विचारात घेण्यासारखा ऑप्शन ठरतो.