Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केटीएमचा नवा प्लांट ब्राझीलमध्ये सुरू! वर्षाला 20,000 बाइक्स तयार करण्याची क्षमता! जाणून घ्या सविस्तरपणे

केटीएमने ब्राझीलमधील मनौस येथे नवीन मोटरसायकल असेंब्ली प्लांट सुरू केला आहे. वर्षाला 20,000 बाइक्स तयार करण्याची कॅपसिटी असलेल्या या प्लांटमध्ये केटीएम आणि हुस्क्वर्णाची 10 मॉडेल्स असेंबल केली जाणार आहेत. या प्रकल्पामुळे ब्राझीलमधील कंपनीच्या प्रोडक्शन आणि डीलर नेटवर्कला किती चालना मिळणार?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 18, 2026 | 10:04 AM
केटीएमचा नवा प्लांट ब्राझीलमध्ये सुरू! वर्षाला 20,000 बाइक्स तयार करण्याची क्षमता! जाणून घ्या सविस्तरपणे
Follow Us
Follow Us:
  • केटीएमच्या नव्या मनौस प्लांटची वार्षिक कॅपसिटी 20,000 मोटरसायकल्स असेंबल करण्याची आहे.
  •  या प्लांटमध्ये केटीएम आणि हुस्क्वर्णाच्या मोटोक्रॉस, एन्ड्युरो आणि अ‍ॅडव्हेंचर श्रेणीतील 10 मॉडेल्स असेंबल होतील.
  •  2027 पर्यंत ब्राझीलमधील डीलर नेटवर्क 12 वरून 30 आउटलेट्सपर्यंत वाढवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.
ऑस्ट्रियाची सुप्रसिद्ध बाईक कंपनी केटीएमने ब्राझीलमधील मनौस शहरात नवीन मोटरसायकल असेंब्ली प्लांट सुरू केला आहे. या प्लांटची वार्षिक कॅपसिटी 20,000 बाइक्स तयार करण्याची आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 20 दशलक्ष ब्राझिलियन रियाल म्हणजेच जवळपास 37.49 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. या प्लांटमध्ये केटीएम आणि हुस्क्वर्णा या दोन्ही ब्रँडच्या मोटरसायकल असेंबल केल्या जाणार आहेत. सुरुवातीला मोटोक्रॉस, एन्ड्युरो आणि अ‍ॅडव्हेंचर अशा श्रेणींमधील 10 मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

बजाज ऑटोच्या प्लांटजवळ स्वतंत्र प्रोडक्शन सेंटर

केटीएम यापूर्वी ब्राझीलमध्ये डाफ्रा मोटोससोबत पार्टनरशिप करून मनौसमध्ये बाइक्स असेंबल करत होती. ही पार्टनरशिप 2016 मध्ये सुरू झाली होती. आता कंपनीने स्वतःच्या स्वतंत्र असेंब्ली सुविधेद्वारे लोकल प्रोडक्शन वाढवण्याची दिशा स्वीकारली आहे. विशेष म्हणजे, हा नवीन प्लांट बजाज ऑटोच्या मनौस येथील औद्योगिक सुविधेच्या परिसरात आहे; पण केटीएम आणि हुस्क्वर्णासाठी त्याचे कामकाज स्वतंत्रपणे चालणार आहे.

या कारखान्यात सीकेडी (Completely Knocked Down) पद्धतीने काम केले जाते. म्हणजे मोटरसायकलचे सुटे भाग किटच्या स्वरूपात आणून कारखान्यात त्यांची जोडणी केली जाते. या प्रक्रियेत किटची तयारी, इंजिन असेंब्ली, मोटरसायकलची अंतिम जोडणी आणि गुणवत्ता तपासणी यांचा समावेश आहे. तयार बाइक्सची पॅकिंग आणि डीलर नेटवर्कपर्यंत पाठवण्याची व्यवस्थाही येथे केली जाते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या प्लांटमध्ये ऑस्ट्रियातील कारखान्यांप्रमाणेच टेक्निकल नियम आणि गुणवत्ता मानकांचे पालन केले जाईल.

हिरो विडाची Dirt.e K3 6Days लिमिटेड एडिशन सादर! जगभरात फक्त 100 युनिट्स होणार उपलब्ध!

केटीएम आणि हुस्क्वर्णाच्या 10 बाइक्सची असेंब्ली

सुरुवातीच्या यादीत केटीएम 250 एसएक्स-एफ आणि 450 एसएक्स-एफ या मोटोक्रॉस बाइक्सचा समावेश आहे. एन्ड्युरो श्रेणीत केटीएम 250 ईएक्ससी-एफ, 350 ईएक्ससी-एफ 6 डेज, 300 ईएक्ससी आणि 300 ईएक्ससी 6 डेज या बाइक्स असतील. हुस्क्वर्णाच्या एफई 350 आणि टीई 300 प्रो या मॉडेल्सचाही यात समावेश आहे. उर्वरित 2 मॉडेल्स म्हणजे केटीएम 390 अ‍ॅडव्हेंचर आर आणि 390 अ‍ॅडव्हेंचर एक्स.

ब्राझीलमध्ये या दोन्ही अ‍ॅडव्हेंचर बाइक्स ऑगस्ट 2026 मध्ये सादर करण्यात आल्या होत्या. त्यांची डीलरशिपवर विक्री ऑक्टोबरपासून सुरू होण्याचे नियोजन आहे. 390 अ‍ॅडव्हेंचर आरची किंमत 37,990 ब्राझिलियन रियाल, तर 390 अ‍ॅडव्हेंचर एक्सची किंमत 33,990 ब्राझिलियन रियाल आहे.

2027 पर्यंत डीलर नेटवर्क वाढवण्याची योजना

केटीएमला 2026 च्या अखेरपर्यंत या प्लांटमधून 3,500 मोटरसायकल असेंबल करण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर 2027 मध्ये प्रोडक्शन वाढवण्याची योजना आहे. सध्या ब्राझीलमध्ये कंपनीचे 12 ऑफीशल डीलर आउटलेट्स आहेत. 2027 पर्यंत ही संख्या 30 पर्यंत नेण्याचे गोल ठेवण्यात आले आहे. त्यामुळे लोकल असेंब्ली आणि विक्री नेटवर्क या दोन्हींचा विस्तार करण्यावर कंपनीचा भर दिसतो.

हिरो एक्सट्रीम 160R 4V आणि एक्सट्रीम 250R लाँच; क्रूझ कंट्रोलसह मिळणार भन्नाट फीचर्स!

💡 Frequently Asked Questions

1. केटीएमचा नवीन प्लांट कुठे सुरू झाला आहे?

केटीएमचा नवीन मोटरसायकल असेंब्ली प्लांट ब्राझीलमधील मनौस शहरात सुरू झाला आहे.

2. या प्लांटमध्ये वर्षाला किती बाइक्स तयार होऊ शकतात?

या प्लांटची वार्षिक कॅपसिटी 20,000 मोटरसायकल्स असेंबल करण्याची आहे. सुरुवातीला केटीएम आणि हुस्क्वर्णाची 10 मॉडेल्स येथे असेंबल केली जाणार आहेत.

3. केटीएम ब्राझीलमधील डीलर नेटवर्क किती वाढवणार आहे?

सध्या कंपनीचे 12 डीलर आउटलेट्स आहेत. 2027 पर्यंत ही संख्या 30 पर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे.

Web Title: Ktm opens new brazil motorcycle assembly plant with 20000 capacity auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 10:04 AM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

स्पोर्ट्स बाइक, इलेक्ट्रिक स्कूटर अन् लिमिटेड एडिशन! या आठवड्यात काय काय घडलं? जाणून घ्या लेटेस्ट बाईक्स अपडेट
1

स्पोर्ट्स बाइक, इलेक्ट्रिक स्कूटर अन् लिमिटेड एडिशन! या आठवड्यात काय काय घडलं? जाणून घ्या लेटेस्ट बाईक्स अपडेट

टेस्लाच्या नव्या ‘फ्लाइंग कार रोडस्टर’साठी भारतात बुकिंग सुरू! फक्त बुकिंगसाठीच लागणार 2.50 ते 3 कोटी रुपये! जाणून घ्या डिटेल्स
2

टेस्लाच्या नव्या ‘फ्लाइंग कार रोडस्टर’साठी भारतात बुकिंग सुरू! फक्त बुकिंगसाठीच लागणार 2.50 ते 3 कोटी रुपये! जाणून घ्या डिटेल्स

मारुती सुझुकीने भारतात विकल्या 65 लाखांहून जास्त जुन्या कार! ‘ट्रू व्हॅल्यू’ स्कीमचा जंगी विक्रम!
3

मारुती सुझुकीने भारतात विकल्या 65 लाखांहून जास्त जुन्या कार! ‘ट्रू व्हॅल्यू’ स्कीमचा जंगी विक्रम!

हिरो विडाची Dirt.e K3 6Days लिमिटेड एडिशन सादर! जगभरात फक्त 100 युनिट्स होणार उपलब्ध!
4

हिरो विडाची Dirt.e K3 6Days लिमिटेड एडिशन सादर! जगभरात फक्त 100 युनिट्स होणार उपलब्ध!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.