
KTM ने अधिकृतपणे या बातमीची पुष्टी केली आहे की ते त्यांच्या नवीन RC 490 बाइकवर काम करत आहेत. कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही नवीन ट्विन- सुपरस्पोर्ट बाइक KTM च्या जागतिक लाइन-अपमध्ये ३९० सिरीजच्या वर स्थान मिळवेल. ही बाइक २०२७ च्या शेवटी लाँच होण्याची शक्यता आहे.
बजाज आणि KTM चे एकत्रित प्लॅटफॉर्म
ही नवीन बाइक बजाज आणि KTM सोबत सह-विकसित केल्या जाणाऱ्या ५००सीसी पेक्षा कमी क्षमतेच्या ट्विन-सिलेंडर प्लॅटफॉर्मवर आधारित असेल.
चीनमधील RC 450 पेक्षा वेगळी
चीनमध्ये विकली जाणारी KTM RC 450 ही CFMoto च्या ४४९सीसी इंजिनवर आधारित आहे आणि ती भारतात येण्याची शक्यता नाही. मात्र, नवीन RC 490 चा प्रोजेक्ट संपूर्णपणे वेगळा असून यात बजाजचा खूप मोठा वाटा आहे.
कमीत कमी बजेटमध्ये कारला स्पोर्ट्स लूक कसा द्यावा? या आहेत 5 सोप्या टिप्स
भारतात निर्मिती
या नवीन इंजिनचे उत्पादन बजाजच्या चाकण मधील प्लांटमध्ये केले जाईल, ज्यामुळे जागतिक स्तरावर भारताची भूमिका अधिक मजबूत होणार आहे.
इंजिन आणि परफॉर्मन्स
KTM ने अद्याप इंजिनच्या क्षमतेचे किंवा पॉवरचे अधिकृत आकडे जाहीर केलेले नाहीत. परंतु ही बाइक युरोपच्या A2 लायसन्स श्रेणीनुसार तयार केली जात असल्याने, तिची पॉवर 48 bhp (35 kW) पेक्षा कमी असण्याची अपेक्षा आहे. चाकणमध्ये निर्मिती होत असल्यामुळे या ट्विन-सिलेंडर इंजिनमध्ये उत्तम परफॉर्मन्स आणि रिफाइनमेंट पाहायला मिळेल.
डिझाईन आणि बाजारपेठेतील स्थान
MotoGP चे तंत्रज्ञान
KTM नुसार, त्यांच्या आगामी सुपरस्पोर्ट बाइक्सवर MotoGP मधील अनुभवांचा आणि डिझाईनचा मोठा प्रभाव दिसेल. त्यामुळे RC 490 मध्ये अधिक अग्रेसिव आणि शार्प डिझाईन पाहायला मिळेल.
भारतीय बाजारातील रणनीती
आंतरराष्ट्रीय बाजारात ही बाइक ३९० सिरीजची जागा घेऊ शकते, परंतु भारतात KTM ३९० सिरीज परवडणारा पर्याय म्हणून सुरू ठेवू शकते, तर नवीन RC 490 ही प्रीमियम आणि अधिक रिफाईन पर्याय म्हणून सादर केली जाऊ शकते.
इतर नवीन मॉडेल्सही येणार
या नवीन ट्विन-सिलेंडर प्लॅटफॉर्मवर केवळ RC 490 च नाही, तर 490 Duke आणि 490 Adventure या बाइक्ससुद्धा सादर केल्या जातील. यामध्ये Duke मॉडेल Adventure च्या आधी लाँच होण्याची शक्यता आहे. या सर्व सिरीजचे जागतिक पदार्पण २०२७ च्या अखेरीस होईल अशी शक्यात वर्तवण्यात येत आहे.