अक्षरशः 'या' बाईक चालवून चालवून थकाल पण पेट्रोल नाही संपणार!
कार असो की बाईक, भारतीय ग्राहक नेहमीच अशा वाहनाच्या शोधात असतात, जी त्यांना उत्तम मायलेज देईल. म्हणूनच तर अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या मार्केटमध्ये दमदार मायलेज असणाऱ्या बाईक ऑफर करत असतात. त्यातही नवीन GST Rates मुळे बाईक्सच्या किमतीत अजूनच घट झाली आहे.
सरकारने नवीन GST 2.0 लागू केल्यानंतर, 350 सीसी पर्यंतच्या बाईक खरेदी करणे स्वस्त झाले आहे. विशेषतः ज्या बाईक आधीच कमी होत्या त्या आता आणखी स्वस्त झाल्या आहेत. अशा परिस्थितीत, आज आपण देशातील चार बेस्ट बाईकबद्दल जाणून घेऊयात, ज्या उत्कृष्ट मायलेज देखील देतात. यापैकी काही बाईक तर 100 किमी किंवा त्याहून अधिक मायलेज देतात. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
गावच्या खडबडीत रस्त्यांवर सुद्धा ‘या’ Cars धावतील एकदम मख्खनसारख्या! किंमत 3.69 लाखांपासून सुरु
Bajaj Freedom 125 CNG ही देशातील सर्वाधिक मायलेज देणारी बाईक आहे. यात 125 सीसी, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे पेट्रोल आणि सीएनजी दोन्हीवर चालू शकते. हे इंजिन 9.5 पीएस आणि 9.7 एनएम पीक टॉर्क निर्माण करते. सीएनजी सिलेंडर सीटखाली बसवलेला आहे. यात 2 किलो सीएनजी सिलेंडर आणि 2 लिटर पेट्रोल टँक आहे. या पहिल्या वाहिल्या सीएनजी बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 90,976 रुपये आहे.
Hero Splendor प्लस ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे, ज्याचे आतापर्यंत 4 कोटींहून अधिक युनिट्स विकले गेले आहेत. यात 97.2 सीसी, एअर-कूल्ड, 4-स्ट्रोक, सिंगल-सिलेंडर, ओएचसी इंजिन आहे. ते 5.9 किलोवॅट पॉवर आणि 8.05 एनएम टॉर्क निर्माण करते. ही बाईक सुमारे 80 ते 85 किमी/ताशी इंधन कार्यक्षमता देते. ही बाईक चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. तर स्प्लेंडर प्लस ड्रम ब्रेकची किंमत 73,527 रुपये (एक्स-शोरूम) आहे.
बजाजच्या बाईक्स त्यांच्या उत्कृष्ट मायलेजसाठी प्रसिद्ध आहेत. या यादीत CT 110X आणि CT 125X यांचा देखील समावेश आहे. रिपोर्टनुसार, या दोन्ही बाइक्स अंदाजे 70 Kmpl किंवा त्याहून थोडं जास्त मायलेज देतात. CT 125X मध्ये 124.4cc चे इंजिन देण्यात आले आहे, जे 10.9 PS पॉवर आणि 11 Nm टॉर्क निर्माण करते. या बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 67,284 रुपये आहे. तर CT 110X ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 70,176 रुपये आहे.
भारतीय पाऊल पडते पुढे! Japan च्या Auto Expo मध्ये Maruti च्या ‘या’ Made In India कार होणार सादर
Bajaj च्या सर्वाधिक मायलेज देणाऱ्या बाईक्सपैकी एक म्हणजे Platina 100. रिपोर्टनुसार, या बाईकचे मायलेजही सुमारे 70 Kmpl किंवा त्याच्या आसपास आहे. या बाईकमध्ये 102cc चे इंजिन दिले असून ते 7.79 PS पॉवर आणि 8.34 Nm टॉर्क निर्माण करते. याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 65,407 रुपये आहे. या बाईकमध्ये 11 लिटर क्षमतेचा मोठा फ्युएल टँक सुद्धा देण्यात आला आहे.