फोटो सौजन्य: iStock
भारतात अनेक अशा ऑटो कंपन्या आहेत, ज्या विदेशी जरी असल्या तरी त्यांच्या कारचे उत्पादन ते भारतात करतात. यामुळे कारची किंमत बजेटमध्ये तर असतेच पण याशिवाय देशात रोजगार निर्मिती सुद्धा होते. गेल्या काही वर्षांपासून Maruti Suzuki च्या कार्स भारत उत्पादित होत आहे. तसेच, लवकरच कंपनीच्या 4 लोकप्रिय मेड इन इंडिया कार जपनच्या मोबिलिटी शो मध्ये सादर होणार आहे.
जपान मोबिलिटी शो 2025 हा जपानमधील टोकियो येथे 30 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर 2025 या कालावधीत आयोजित केला जाईल. या शोमध्ये सुझुकी त्यांच्या अनेक कार सादर करेल, विशेषतः चार मेड इन इंडिया मारुती मॉडेल्स देखील सादर होणार आहेत. यामध्ये Maruti Jimny 5-door (Jimny Nomade), Maruti e Vitara, Maruti Fronx FFV Concept आणि Maruti Victoris CBG व्हर्जन यांचा समावेश आहे. चला या प्रत्येक मॉडेलबद्दल जाणून घेऊयात.
Maruti S Presso साठी दरमहा द्यावा लागेल फक्त 5 हजारांपेक्षा कमी EMI, फॉलो करा ‘हा’ फायनान्स प्लॅन
Suzuki आपली सर्वाधिक लोकप्रिय ऑफ-रोडर Jimny चे 5-door व्हर्जन Jimny Nomade जपानमध्ये सादर करणार आहे. हे मॉडेल भारतात तयार होणाऱ्या Maruti Jimny वर बेस्ड आहे. डिझाइनच्या दृष्टीने दोन्ही जवळपास सारख्या आहेत, परंतु जपानी-स्पेक Jimny Nomade मध्ये काही अतिरिक्त फीचर्स. जसे की ADAS (Advanced Driver Assistance System) दिले जातील. यात भारतीय मॉडेलप्रमाणेच 1.5-लीटर नैचरल ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे आणि 4WD (Four-Wheel-Drive) हे स्टँडर्ड स्वरूपात मिळते.
दुसरे मॉडेल म्हणजे Maruti e Vitara, ही पूर्णपणे इलेक्ट्रिक SUV असेल जी भारतातील गुजरात प्लांटमध्ये तयार केली जाते. या SUV ला सुमारे 100 देशांमध्ये एक्सपोर्ट केले जाणार असून, लवकरच भारतातही तिचे लाँच होण्याची शक्यता आहे. यात दोन बॅटरी पॅक पर्याय मिळतील, 49 kWh आणि 61 kWh, ज्यांच्या सहाय्याने ती 500 किमीपेक्षा जास्त रेंज देऊ शकेल. Euro NCAP क्रॅश टेस्टमध्ये या कारला 4-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. या SUV चे डिझाइन Maruti च्या नव्या डिझाइन लँग्वेजवर आधारित असून ती एकदम मॉडर्न लूक देते.
Suzuki या वेळेस Fronx FFV Concept सादर करणार आहे. हे एक Flex Fuel Vehicle (FFV) आहे, जे हाय एथेनॉल ब्लेंड फ्यूलवर चालू शकते. भारतात या मॉडेलला 1.2-लीटर पेट्रोल इंजिन, 1.0-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि CNG व्हर्जनसह सादर करण्यात आले आहे. खरं तर, Maruti आधीपासूनच आपली वाहने E20 (20% एथेनॉल ब्लेंड) फ्यूलशी सुसंगत बनवत आहे. Fronx FFV हा कंपनीच्या कार्बन न्यूट्रल मिशनकडे जाणाऱ्या दिशेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
‘या’ तीन चाकांच्या Electric Scooter ची ग्राहकांमध्ये जोरदार चर्चा, जाणून घ्या किंमत
सप्टेंबर 2025 मध्ये लाँच झालेली Maruti Victoris देखील या शोमध्ये पाहायला मिळेल, पण या वेळेस Compressed Bio Gas (CBG) व्हर्जनमध्ये ती पाह्यला मिळेल. ही कार भारतात तयार करण्यात आली आहे आणि आता Suzuki ती एक प्रोटोटाइप CBG मॉडेल म्हणून प्रदर्शित करणार आहे. यासोबत कंपनी भारतातील स्वतःच्या बायोगॅस प्लांटचा मिनिएचर मॉडेल देखील दाखवेल, जो डेअरी युनियन्सच्या सहकार्याने तयार केला गेला आहे. CBG हे एक पर्यावरणपूरक इंधन आहे, जे ऑर्गॅनिक वेस्टपासून तयार होते आणि पारंपरिक CNG चा एक शाश्वत पर्याय आहे.