
फोटो सौजन्य: iStock
भारतात नेहमीच मेड इन इंडिया उत्पादनाला चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र, आनंद तेव्हा होतो जेव्हा हेच मेड इन इंडिया उत्पादन विदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात. भारतात अनेकी विदेशी ऑटो कंपन्या आहेत, ज्या भारतातच त्यांच्या कार्स उत्पादित करीत असतात. नुकतेच Nissan ने त्यांच्या 12 लाख मेड इन इंडिया कार निर्यात करत मोठा टप्पा गाठला आहे.
निसान मोटर इंडियाने भारतातून 12 लाख गाड्यांची निर्यात पूर्ण करत एक ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. “मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड” या तत्त्वज्ञानावर आधारित या यशाने भारत निसानसाठी आशिया, मध्य पूर्व आणि इतर जागतिक बाजारांसाठी एक धोरणात्मक उत्पादन आणि निर्यात केंद्र बनल्याचे पुन्हा अधोरेखित केले आहे.
या यशाचा प्रतीक म्हणून जीसीसी (GCC) प्रदेशात निर्यात झालेली 12 लाखावी गाडी न्यू निसान मॅग्नाइट बी-एसयूव्ही (B-SUV) होती. तिला तामिळनाडूतील एन्नोर येथील कामराजर बंदरावर निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स यांनी हिरवा झेंडा दाखवला.
निसान मोटर इंडियाने निर्यात सुरू केल्यापासून आफ्रिका, मध्य पूर्व, लॅटिन अमेरिका आणि आग्नेय आशियातील 65 देशांमध्ये निसान सनी, किक्स, मायक्रा आणि मॅग्नाइटसह विविध मॉडेल्सची निर्यात केली आहे. डाव्या (LHD) आणि उजव्या (RHD) हाताने चालविणाऱ्या दोन्ही प्रकारच्या बाजारपेठांमध्ये भारत निर्मित निसान गाड्यांचा ठसा उमटला आहे.
Tata Motors ला लागली दिवाळीची लॉटरी! ऑक्टोबर 2025 विक्रीचा आकडा पाहून प्रतिस्पर्ध्यांची झोप उडाली
या प्रसंगी बोलताना सौरभ वत्स म्हणाले, “भारतातून 1.2 दशलक्ष निसान वाहने निर्यात करण्याचा आणखी एक ऐतिहासिक टप्पा साजरा करताना आम्हाला अभिमान वाटतो. ही कामगिरी आमच्या टीमच्या कष्टांचे आणि जगभरातील ग्राहकांच्या आमच्या मेड-इन-इंडिया कारवरील विश्वासाचे प्रतिबिंब आहे. निसान मॅग्नाइट ही आमच्यासाठी जागतिक यशोगाथा ठरली आहे.”
न्यू निसान मॅग्नाइटने सुरक्षा आणि गुणवत्ता या दोन्ही क्षेत्रात मानके प्रस्थापित केली आहेत. या गाडीला ग्लोबल एनसीएपीकडून प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 5-स्टार रेटिंग आणि बाल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 3-स्टार रेटिंग मिळाले आहे.
HSRP Number Plate नाही? ‘इतका’ मोठा दंड भरायला तयार राहा! सगळा खिसा होईल रिकामा
20 हून अधिक “फर्स्ट-इन-क्लास” आणि “बेस्ट-इन-क्लास” वैशिष्ट्यांसह तसेच 55+ सेफ्टी फीचर्सह ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लोकप्रिय ठरली आहे.
निसान मॅग्नाइट ही निसानच्या ‘वन कार, वन वर्ल्ड’ धोरणाचे प्रतीक असून, ती आता 65 हून अधिक देशांमध्ये विकली जाते. भारतात तयार होणाऱ्या या कार्स जागतिक पातळीवर भारताच्या उत्पादन कौशल्याचे प्रदर्शन करतात.
कंपनी लवकरच आपली नवीन जागतिक सी-एसयूव्ही निसान टेक्टन (Nissan Tecton) भारतात लाँच करणार असून, ही गाडी निवडक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्येही निर्यात केली जाणार आहे.