फोटो सौजन्य: Gemini
भारतीय ऑटो बाजारात Tata Motors कडे एक महत्वपूर्ण ऑटो कंपनीने म्हणून पहिले जाते. कंपनीने आतापर्यंत अनेक उत्तम कार्स ऑफर केल्या आहेत, ज्या नेहमीच विक्रीच्या बाबतीत टॉप मारत असतात. यासोबतच वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ पाहता कंपनीने बेस्ट इलेक्ट्रिक कार देखील ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीचा ऑक्टोबर 2025 मधील कार विक्रीचा रिपोर्ट सादर झाला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Tata Motors पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड (TMPV) ने ऑक्टोबर 2025 मध्ये विक्रमी विक्रीची नोंद केली आहे. कंपनीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये एकूण 61,295 वाहनांची विक्री केली असून, ही आकडेवारी ऑक्टोबर 2024 मधील 48,423 युनिट्सच्या तुलनेत तब्बल 26.6% वाढ दर्शवते.
November 2025 मध्ये एकापेक्षा एक Two Wheeler लाँच होणार, जाणून घ्या अपेक्षित किंमत
या सणासुदीचा काळ टाटा मोटर्ससाठी विशेष ठरला असून, सलग दुसऱ्या महिन्यात कंपनीने सर्वाधिक मासिक घाऊक विक्री नोंदवली आहे. एसयूव्ही विभागाने विक्रीत आघाडी घेतली असून, 47,000 हून अधिक युनिट्स विक्रीसह 77% बाजारहिस्सा नोंदवला आहे. ही विक्री कंपनीच्या SUV श्रेणीवरील ग्राहकांच्या विश्वासाचे आणि वाढत्या मागणीचे द्योतक ठरली आहे.
इलेक्ट्रिक वाहन (EV) विभागानेही या महिन्यात नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. कंपनीने 9,286 युनिट्स ईव्ही विक्री नोंदवून 73% वार्षिक वाढ साध्य केली. ही वाढ टाटा मोटर्सच्या विस्तारित होत असलेल्या EV पोर्टफोलिओवरील ग्राहकांच्या वाढत्या विश्वासाचे प्रतीक आहे.
सणासुदीच्या हंगामात ग्राहकांकडून मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे किरकोळ विक्रीत मोठी झेप दिसली. नेक्सॉन मॉडेलने आपल्या मल्टी-पॉवरट्रेन पर्यायांमुळे 50% वार्षिक वाढ नोंदवली. हॅरियर आणि सफारी यांनी एकत्रित 7000 युनिट्स विक्रीसह नवे विक्रम मोडले, ज्यात अॅडव्हेंचर एक्स व्हेरिएंट्सची लोकप्रियता आणि हॅरियर EV साठी असलेली मजबूत मागणी निर्णायक ठरली.
HSRP Number Plate नाही? ‘इतका’ मोठा दंड भरायला तयार राहा! सगळा खिसा होईल रिकामा
याशिवाय, कंपनीने या सणासुदीच्या हंगामात म्हणजेच नवरात्री ते दिवाळी या काळात 1 लाखांहून अधिक वाहनांची डिलिव्हरी पूर्ण केली, ज्यात 33% वार्षिक वाढ नोंदवली गेली. हा आकडा टाटा मोटर्सच्या ग्राहककेंद्रित दृष्टिकोनाचा आणि वाढत्या बाजारपेठीय पकडीचा पुरावा मानला जातो.
टाटा मोटर्सच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या यशामागे कंपनीच्या सातत्यपूर्ण नावीन्यपूर्ण प्रयत्नांचा, उत्कृष्ट SUV आणि EV मॉडेल्सचा तसेच मजबूत डिलर नेटवर्कचा मोठा वाटा आहे.






