फोटो सौजन्य: www.lohiaauto.com
भारतीय बाजारात सध्या इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा वाढता ओढा पाहायला मिळतो आहे. इंधन दरवाढ, पर्यावरणाची चिंता आणि कमी देखभाल खर्च या कारणांमुळे ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. ही गरज लक्षात घेऊन अनेक ऑटोमोबाईल कंपन्या इलेक्ट्रिक कार, बाईक आणि स्कूटर बाजारात सादर करत आहेत. ग्राहकांचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शहरे आणि गावांमध्ये याचा वापर झपाट्याने वाढत आहे. आता तर बाजारात इलेक्ट्रिक ऑटो रिक्षाही दाखल होत असून, प्रवासी वाहतुकीसाठी हा एक स्वस्त आणि पर्यावरणपूरक पर्याय ठरत आहे. सरकारचाही इलेक्ट्रिक वाहनांवर भर असून सबसिडीमुळे हे वाहन अधिक आकर्षक ठरत आहे.
भारतीय मार्केटमध्ये एक पर्यावरणपूरक वाहन म्हणून इलेक्ट्रिक वाहनांकडे पहिले जाते. अशातच, Lohia Auto ने युधा नावाची एक नवीन इलेक्ट्रिक ऑटो लाँच केली आहे. कंपनीने त्यात कोणत्या प्रकारचे फीचर्स आणि रेंज दिली आहे? ही इलेक्ट्रिक रिक्षा किती किमतीत खरेदी करता येईल? अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.
फक्त ‘एवढ्या’ किमतीत Tesla Model Y आणाल घरी, ‘असा’ असेल डाउन पेमेंट आणि EMI चा हिशोब
लोहिया ऑटोने भारतीय बाजारपेठेत नवीन कमर्शियल वाहन सेगमेंटमध्ये Youdha नावाची एक नवीन इलेक्ट्रिक ऑटो लाँच केली आहे. यामध्ये कंपनीने प्रवाशांच्या सेफ्टीबरोबरच रेंजकडे सुद्धा लक्ष दिले आहे.
Lohia Youdha इलेक्ट्रिक ऑटोला कंपनीने 11.8 kWh प्रति तास क्षमतेची एलएफपी बॅटरी दिली आहे. ही बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर 227 किमी पर्यंत चालवता येते. त्यात बसवलेली मोटर ऑटोला सहा किलोवॅटची पॉवर आणि 55 न्यूटन मीटर टॉर्क देते. या रिक्षामधील बॅटरी चार्ज होण्यासाठी चार ते पाच तास लागतात. यासोबतच, तिचा टॉप स्पीड ताशी 40 किमी पर्यंत आहे. ड्रायव्हरशिवाय, त्यात तीन प्रवासी प्रवास करू शकतात.
कंपनीने ही इलेक्ट्रिक ऑटो अनेक उत्तम फीचर्ससह सादर केली आहे. यात 7 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 12 इंचाचे व्हील्स, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, हायड्रॉलिक ब्रेक आहेत.
Tesla Model Y ची महागडी किंमत भारतात कमी होणार का? काय आहे सरकारची नवीन EV Policy?
लोहिया योधा इलेक्ट्रिक ऑटो भारतीय बाजारात 2.79 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात आली आहे. या ऑटोसह, कंपनी पाच वर्षांची किंवा 1.30 लाख किलोमीटरची वॉरंटी देत आहे.
कंपनी पहिल्यांदा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, आसाम सारख्या राज्यांमध्ये विक्रीसाठी इलेक्ट्रिक ऑटो उपलब्ध करून देईल.