Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मध्य प्रदेशमध्ये 7,400 हून जास्त गुणवंत विद्यार्थ्यांना स्कूटर; इलेक्ट्रिक स्कूटरसाठी ₹1.20 लाखांची मदत

मध्य प्रदेशातील 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री स्कूटी योजनेअंतर्गत 7,400 हून जास्त विद्यार्थ्यांना स्कूटर किंवा आर्थिक मदत मिळाली असून इलेक्ट्रिक स्कूटर निवडणाऱ्यांना ₹1.20 लाखांपर्यंत मदत मिळू शकते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 21, 2026 | 03:13 PM
मध्य प्रदेशमध्ये 7,400 हून जास्त गुणवंत विद्यार्थ्यांना स्कूटर; इलेक्ट्रिक स्कूटरसाठी ₹1.20 लाखांची मदत
Follow Us
Follow Us:
  • मध्य प्रदेशात 7,400 हून जास्त गुणवंत 12वीच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री स्कूटी योजनेचा लाभ मिळाला.
  • इलेक्ट्रिक स्कूटर घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ₹1.20 लाखांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येत आहे.
  • 2026 मध्ये पात्रतेसाठी पहिल्याच प्रयत्नात 70% गुण आणि शाळेत प्रथम क्रमांक आवश्यक आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शनिवारी सरकारी शाळांमधील 7,400 हून जास्त गुणवंत इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री स्कूटी योजनेअंतर्गत स्कूटर आणि आर्थिक मदत वितरित केली. भोपाळमधील शासकीय सुभाष एक्सलन्स उच्च माध्यमिक विद्यालयात या योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

विद्यार्थ्यांना थेट आर्थिक मदत

कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी काही निवडक विद्यार्थ्यांना प्रतीकात्मक स्वरूपात स्कूटरच्या चाव्या सुपूर्द केल्या. तर पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये आर्थिक मदत थेट जमा करण्यात आली. इलेक्ट्रिक स्कूटरची निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ₹1.20 लाख, तर पेट्रोल स्कूटर घेणाऱ्यांना ₹90,000 पर्यंत मदत मिळू शकते.

या आर्थिक मदतीमध्ये केवळ वाहनाची किंमतच नाही, तर रजिस्ट्रेशन, इन्शुरन्स, 2 हेल्मेट आणि काही आवश्यक अॅक्सेसरीजच्या खर्चाचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासाचा खर्च आणि दैनंदिन ये-जा काही प्रमाणात सोपी होण्यास मदत होऊ शकते.

TVS Ntorq 150 ची किंमत आणि EMI किती? 150cc स्कूटर घेण्याआधी जाणून घ्या खर्च आणि माहिती

2026 साठी पात्रतेत बदल

2026 मध्ये सुधारित करण्यात आलेल्या नियमांनुसार, विद्यार्थ्याने इयत्ता 12वीची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात किमान 70% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. तसेच संबंधित सरकारी शाळेत तो विद्यार्थी प्रथम क्रमांकावर असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा सर्व शैक्षणिक शाखांमधील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरू शकतात.

कार्यक्रमादरम्यान मोहन यादव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या भविष्यातील योजनाही जाणून घेतल्या. खुशी राय या विद्यार्थिनीने B.Comचे शिक्षण घेत असून चार्टर्ड अकाउंटंट होण्याची तयारी करत असल्याचे सांगितले. इतर विद्यार्थ्यांनी डॉक्टर, वकील, इंजिनिअर आणि उद्योजक होण्याची इच्छा व्यक्त केली.

एकट्यानेच नदी साफ करणाऱ्या ‘बिट्टू तबाही’ला थेट परदेशी CEO कडून जॉब ऑफर! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन

मुख्यमंत्र्यांनी ही योजना केवळ विद्यार्थ्यांना वाहन देण्यासाठी नसून त्यांच्या शैक्षणिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी असल्याचे सांगितले. सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे आणि उच्च शिक्षणाच्या प्रवासात त्यांना सुविधा मिळाव्यात, हा योजनेमागचा उद्देश आहे.

यादव यांनी मध्य प्रदेशच्या यंदाच्या शालेय शिक्षणाचे बजेट सुमारे ₹38,000 कोटी असल्याचेही सांगितले. तसेच 1 सप्टेंबर रोजी शालेय शिक्षण आणि आदिवासी कल्याण विभागाने सुमारे 1.45 लाख विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वाटप केल्याची माहिती दिली.

 

Web Title: Madhya pradesh students get scooters under new scheme auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

TVS Ntorq 150 ची किंमत आणि EMI किती? 150cc स्कूटर घेण्याआधी जाणून घ्या खर्च आणि माहिती
1

TVS Ntorq 150 ची किंमत आणि EMI किती? 150cc स्कूटर घेण्याआधी जाणून घ्या खर्च आणि माहिती

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील
2

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या
3

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स
4

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.