(फोटो सौजन्य: X)
अनेक महिन्यांची मेहनत
सुरेंद्र मागील अनेक महिन्यांपासून न थकता, सतत नदीतून घाण कचरा आणि प्लास्टीक काढण्याचे काम करत होता. अखेर नदीला पूर्ण स्वच्छ करुनच तो मागे हटला. सुरेंद्रने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर नदीची आधीची स्थिती आणि नंतरची स्थिती दाखवून दिली. यात सुरेंद्रच्या मेहनतीनंतर नदी पूर्वीपेक्षा खूप सुधारलेली स्वच्छ दिसून आली. पूर्वीच्या फोटोत जिथे नदीचे पाणी सोडून सर्व ठिकाणी फक्त कचराच कचरा दिसत होता तिथेच नंतरच्या फोटोत मात्र नदीचे पाणी स्पष्ट दिसू लागले होते. यात कचरा अजिबात नव्हता आणि पाणी देखील वाहताना दिसत होते.
नेदरलँडच्या CEO ने दिली ऑफर
सुरेंद्रच्या मेहनती कल्पनेने सर्वजण प्रभावित झाले आणि सोशल मिडियावर अनेकांनी त्याच्या या कार्याचे काैतुक केले. यात तील सर्वात मोठी स्वच्छता संस्था असलेल्या ‘द ओशन क्लीनअप’चे डच सीईओ, बोयान स्लॅट यांचाही समावेश होता. एका मुलाने संपूर्ण नदी एकट्याने साफ केली हे पाहून ते त्याच्यावर चांगलेच खुश झाले आणि पोस्टवर कमेंट करत त्यांनी सुरेंद्रला “आमच्यासोबत काम करायला ये” अशी ऑफर दिली.
View this post on Instagram
A 20 year old Indian man, Surendra Singh Choudhry, known as “Bittu Tabahi,” has been cleaning the heavily polluted Ajnar River himself for months pic.twitter.com/U7N4BkItkf — non aesthetic things (@PicturesFoIder) September 4, 2026
‘सर आम्हाला सोडून जाऊ नका…’; शिक्षकाचे ट्रान्सफर अन् मिठी मारून ढसाढसा रडले विद्यार्थी, Video Viral
सुरेंद्रच्या कामाची आता फक्त देशभरातच नाही तर जगभरात चर्चा होत आहे ज्याचे उदाहरण बोयान स्लॅट यांच्या कमेंटवरुन पाहण्यात आले.सुरेंद्रच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याने नदीचा पूर्वीचा आणि नंतरचा फोटो शेअर केला तर @PicturesFoIder नावाच्या एक्स अकाऊंटवरही त्याचे हे फोटोज शेअर करण्यात आले. या एक्स पोस्टवरच त्याला बोयान स्लॅटने जाॅबची ऑफर दिली. या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत सुरेंद्रच्या अविश्वसनीय कामावर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “खूप खूप अभिनंदन, असेच उत्तम काम करत राहा; यालाच खरी ‘कामगिरी’ म्हणतात. तुमचे हे कार्य आपल्या देशाला प्रेरणा देईल आणि अधिकाधिक लोक यात सहभागी होतील, अशी आशा आहे. आपल्या मूर्ख राजकारण्यांना अशा गोष्टींचे भान कधी येणार, कोणास ठाऊक!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तू या नोकरी आणि प्रसिद्धीस खरोखर पात्र आहेस ”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “समस्या ती जागा साफ करून घेण्याबद्दल नाही, तर पुन्हा तिथे कचरा न करण्याबद्दल आहे; मला असं ऐकायला मिळालंय की लोकांनी पुन्हा तिथे कचरा टाकायला सुरुवात केली आहे”.






