फोटो सौजन्य: @ishanagarwal24/ X.com
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार्सच्या मागणीत जोरदार वाढ होत आहे. हीच मागणी लक्षात घेत, पूर्वी ज्या कंपन्या पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कार ऑफर करीत होत्या, त्याच आता इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर लक्षकेंद्रित करत आहे.
ग्राहकांना EVs खरेदीसाठी अनेक ऑप्शन पाहायला मिळतात. अशाच एका इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. या कारला ग्राहकांचा एवढा चांगला प्रतिसाद मिळाला की कंपनीला त्या कारचे उत्पादन वाढवावे लागले.
महिंद्राने नुकत्याच लाँच केलेल्या BE 6 इलेक्ट्रिक कारच्या विशेष बॅटमॅन व्हर्जनला कार खरेदीदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. ग्राहकांकडून मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून कंपनीने या कारचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बॅटमॅन व्हर्जन लाँच करताना महिंद्राने सांगितले होते की ते या कारच्या फक्त 300 कार्स बनवेल, परंतु या ओव्हरबुकिंगमुळे कंपनीने आता उत्पादन वाढवून 999 केले आहे.
नवीन रंग आणि दमदार टेक्नॉलॉजीसह Toyota Camry Hybrid Sprint Edition लाँच
ग्राहक त्यांच्या पसंतीचा बॅज नंबर (001999) निवडू शकतात. कारची प्री-बुकिंग आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून सुरू झाली आहे आणि 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजल्यापासून अधिकृत बुकिंग सुरू होईल. त्याची बुकिंग रक्कम ₹21,000 आहे.
महिंद्राने 14 ऑगस्ट रोजी BE 6 इलेक्ट्रिक SUV चा ऑल-ब्लॅक लिमिटेड एडिशन बाजारात आणला. या BE 6 बॅटमॅन एडिशन ची किंमत ₹27.79 लाख (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे. या मॉडेलची डिलिव्हरी 20 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, जो दिवस इंटरनॅशनल बॅटमॅन डे म्हणून साजरा केला जातो. हा BE 6 चा पहिला ब्लॅक-आउट वर्जन असून यात आत व बाहेर दोन्हीकडे बॅटमॅन-थीम डिझाइन एलिमेंट्स देण्यात आले आहेत.
केंद्र सरकार GST कमी करणार? टॅक्स कमी झालाच तर किती असेल Tata Nexon ची किंमत?
डिझाइनच्या बाबतीत, बॅटमॅन एडिशन SUV स्टँडर्ड वर्जनवर आधारित आहे, परंतु यात नवे कॉस्मेटिक टच देण्यात आले आहेत. यात सॅटिन ब्लॅक एक्सटीरियर पेंट, पुढील दरवाजांवर कस्टम बॅटमॅन डीकल्स, तसेच मागील भागावर “BE 6 × द डार्क नाईट” बॅजिंग देण्यात आली आहे. अधिक आक्रमक लूकसाठी यात R20 अलॉय व्हील्स बसवले गेले असून सस्पेन्शन कंपोनंट्सला अल्केमी गोल्ड फिनिशिंग देण्यात आली आहे. आतील डिझाइनमध्येही खास बॅटमॅन थीम लागू केली गेली आहे.
ही स्पेशल एडिशन कार 79 kWh बॅटरी पॅक असलेल्या पॅक थ्री वेरिएंटवर आधारित आहे. या SUV ला एकदा फुल चार्ज केल्यावर 682 किमीपर्यंतची रेंज मिळते. छोट्या 59 kWh व्हेरिएंटमध्ये 230 bhp पॉवर, तर 79 kWh व्हर्जनमध्ये 285 bhp पॉवर मिळते. दोन्ही व्हेरिएंट्सचा टॉर्क 380 Nm इतकाच आहे. चार्जिंगसाठी BE 6 175 kW DC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, ज्यामुळे केवळ 20 मिनिटांत बॅटरी 20% ते 80% पर्यंत चार्ज होते.