नवीन रंग आणि दमदार टेक्नॉलॉजीसह Toyota Camry Hybrid Sprint Edition लाँच
टोयोटाने त्यांच्या प्रतिष्ठित लक्झरी हायब्रिड इलेक्ट्रिक सेडानचे नवे स्पोर्टीयर व्हर्जन कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक वेईकल – स्प्रिंट एडिशन सादर केले आहे. आकर्षक ड्युअल-टोन एक्स्टेरियर, मॅट ब्लॅक ऍक्सेंट्स आणि विशेष स्पोर्ट्स किटसह सजलेले हे एडिशन केवळ स्टायलिशच नाही, तर गतीशील परफॉर्मन्स देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. दमदार उपस्थिती, नवे रंग आणि सुधारित तंत्रज्ञानामुळे स्प्रिंट एडिशन हे दमदार ड्रायव्हिंग अनुभव शोधणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय ठरणार आहे.
टीकेएमचे सेल्स, सर्विस आणि युज्ड कार बिझनेसचे उपाध्यक्ष वरिंदर वाधवा म्हणाले, “टोयोटा नेहमीच ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षांशी जुळून घेत प्रगत तंत्रज्ञान देण्यावर लक्ष केंद्रीत करते. कॅमरी स्प्रिंट एडिशन हे याच दृष्टीकोनातून तयार करण्यात आले आहे. ड्युअल-टोन स्टायलिंग, ब्लॅक मॅट अलॉय व्हील्स आणि विशेष स्पोर्ट्स किटमुळे हे मॉडेल रस्त्यावर वेगळीच छाप सोडते. आम्हाला विश्वास आहे की हे एडिशन आधुनिक ग्राहकांना आकर्षित करेल आणि शाश्वत गतीशीलतेप्रती टोयोटाची वचनबद्धता अधिक दृढ करेल.”
Hero Glamour Vs Honda Shine: 125 सीसी सेगमेंटमध्ये कोणती बाईक आहे जास्त वरचढ?
कॅमरी स्प्रिंट एडिशनमध्ये फिफ्थ जनरेशन हायब्रिड इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजी दिली आहे, जी परफॉर्मन्स आणि इंधन बचतीचे उत्तम मिश्रण देते. हे वाहन 169 kW (230 PS) चे एकूण आउटपुट निर्माण करते आणि 25.49 किमी/लिटरची प्रमाणित मायलेज क्षमता देते. इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे तीन ड्रायव्हिंग मोड्स असल्याने वापरकर्त्यांच्या वेगवेगळ्या ड्रायव्हिंग प्राधान्यांनुसार कार सहज जुळवून घेते.
टोयोटा सेफ्टी सेन्स 3.0 सह सज्ज असलेल्या या सेदानमध्ये प्री-कोलिजन सिस्टीम, डायनॅमिक रडार क्रूझ कंट्रोल, लेन डिपार्चर अलर्ट, लेन ट्रेसिंग असिस्ट आणि ऑटोमॅटिक हाय बीम अशी ॲडव्हान्स फीचर्स आहेत. याशिवाय, 9 SRS एअरबॅग्स, व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल-स्टार्ट असिस्ट, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, टायर प्रेशर मॉनिटरिंग आणि 360-डिग्री पॅनोरॅमिक कॅमेरा यामुळे सेफ्टी लेव्हल आणखी उंचावली आहे.
दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?
यात 10-वे पॉवर ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट विथ लंबर सपोर्ट व मेमरी, पुढील बाजूस हवेशीर सीट्स, वायरलेस चार्जर, पॅडल शिफ्टर्स, हेड्स-अप डिस्प्ले, ORVM मेमरी सेटिंग्ज आणि टिल्ट-टेलिस्कोपिक स्टीअरिंग कॉलमसारखी अनेक लक्झरी सोयी देण्यात आल्या आहेत.
स्प्रिंट एडिशन 5 ड्युअल-टोन स्पोर्टी रंगांमध्ये उपलब्ध आहे – इमोशनल रेड व मॅट ब्लॅक, प्लॅटिनम व्हाईट पर्ल व मॅट ब्लॅक, सिमेंट ग्रे व मॅट ब्लॅक, प्रीसियस मेटल व मॅट ब्लॅक तसेच डार्क ब्ल्यू मेटॅलिक व मॅट ब्लॅक. हायब्रिड बॅटरीवर कंपनी 8 वर्षे किंवा 1,60,000 किमीपर्यंतची वॉरंटी (जे आधी येईल ते) देते, ज्यामुळे ग्राहकांना दीर्घकाळ मन:शांती मिळते. या कारची किंमत 48.50 लाख रुपयांच्या एक्स शोरूम किमतीत उपलब्ध आहे.