फोटो सौजन्य: Social Media
देशात अनेक सेगमेंटमध्ये कार्स ऑफर होत असतात. यातही एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना जोरदार मागणी असते. त्यामुळेच तर ऑटो कंपन्या एसयूव्हीच्या उत्पादनावर विशेष लक्ष केंद्रित करत असतात. आता तर मार्केटमध्ये इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील दाखल होताना दिसत आहे.
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी मिळत आहे. याच मागणीमुळे आता प्रत्येक ऑटो कंपनी इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनावर विशेष लक्ष केंद्रित करत आहे. देशातील आघाडीची एसयूव्हीची उत्पादक कंपनी, महिंद्राने देखील मार्केटमध्ये 2 दमदार इलेक्ट्रिक एसयूव्ही ऑफर केल्या आहेत.
हिट नाही तर सुपरहिट आहे ‘ही’ कार, परफॉर्मन्सच्या बाबतीत भल्याभल्यांना सोडेल मागे
महिंद्राने इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या जगात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. कंपनीने 20 मार्च 2025 पासून आतापर्यंत त्यांच्या नवीन ऑल-इलेक्ट्रिक एसयूव्ही XEV 9e आणि BE 6 च्या 3000 हून अधिक युनिट्सची डिलिव्हरी केली आहे. हे यश महिंद्राच्या पुढील जनरेशनच्या ईव्हीसाठी एक मजबूत सुरुवात दर्शवते. ग्राहक देखील या कार्सना आपली चांगली पसंती दर्शवित आहे.
महिंद्रा XEV 9e आणि BE 6 या दोन्ही मॉडेल्सना ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. बुकिंग डेटानुसार, 59% ग्राहक XEV 9e आणि 41% ग्राहक BE 6 ला पसंती देत आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बहुतेक लोकांनी या SUV मधील टॉप-स्पेक पॅक थ्री व्हेरियंट निवडला आहे.
वाढत्या मागणीमुळे, काही भागात या इलेक्ट्रिक वाहनांसाठी वेटिंग पिरियड आता 6 महिन्यांपर्यंत पोहोचला आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, महिंद्रा देशभरात डिलिव्हरी जलद वेगाने करत आहे, जेणेकरून ग्राहकांना जास्त वाट न पाहता त्यांच्या नवीन ईव्हीची राइड घेता येईल.
फक्त 11 हजारांचे डाउन पेमेंट आणि Royal Enfield Classic 350 होईल तुमची, दरमहा द्यावा लागेल इतकाच EMI?
महिंद्राने पहिल्यांदाच इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी एक खास ‘डिफॉल्ट’ ड्राइव्ह मोड सादर केला आहे. हा मोड पेट्रोल किंवा डिझेल कारसारखाच ड्रायव्हिंगचा अनुभव देतो, ज्यामुळे नवीन ग्राहकांना ईव्हीवर स्विच करणे सोपे जाईल.
प्रत्येक एसयूव्ही डिलिव्हरीसह, महिंद्रा ग्राहकांना स्मार्ट चार्जिंग पद्धती, ड्रायव्हिंग रेंज वाढवण्यासाठी टिप्स आणि कनेक्टेड फीचर्स कसे वापरायचे यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट करणारे विशेष व्हिडिओ गाइडलाइन्स प्रदान करत आहे. या गाइडलाइन्सच्या मदतीने, ग्राहक त्यांच्या वाहनाशी पूर्णपणे परिचित होतात आणि सुरुवातीपासूनच त्याचा सर्वोत्तम वापर करू शकतात.