फोटो सौजन्य: iStock
भारतीय बाजारात हाय परफॉर्मन्स बाईक्सना चांगली मागणी आहे. याच मागणीमुळे अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या नेहमीच मार्केटमध्ये दमदार बाईक्स लाँच करत असतात. देशात अनेक दमदार बाईक्सची क्रेझ पाहायला मिळते. पण सर्वात जास्त भाव जर कोणत्या बाईक खात असेल तर त्या रॉयल एन्फिल्डच्या बाईक्स आहेत.
आज प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते की आपल्याकडे रॉयल एन्फिल्डची बाईक असावी. कंपनीने देह्खील ग्राहकांच्या मागणीनुसार हाय परफॉर्मन्स आणि दमदार लूक असणाऱ्या बाईक्स सादर केल्या आहेत. यातीलच एक बाईक म्हणजे Royal Enfield Classic 350.
Fronx Vs Taisor: किंमत, मायलेज आणि फीचर्सच्या बाबतीत कोणती एसयूव्ही आहे बेस्ट?
जेव्हा जेव्हा रॉयल एनफील्ड 350 च्या सर्वात लोकप्रिय बाईक्सबद्दल बोलले जाते तेव्हा क्लासिक 350 चे नाव सर्वात टॉपला येते. या बाईकची ऑन-रोड किंमत 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. जर तुम्ही सुद्धा ही क्लासिक 350 लॉनवर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. चला जाणून घेऊया ही बाईक खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती डाउन पेमेंट आणि ईएमआय भरावा लागेल.
भारतीय बाजारात रॉयल एनफील्ड क्लासिक 350 चे पाच व्हेरियंट उपलब्ध आहेत. हेरिटेज व्हर्जन हे क्लासिक 350 चे सर्वात स्वस्त मॉडेल आहे. राजधानी दिल्लीमध्ये या मॉडेलची ऑन-रोड किंमत 2,28,526 रुपये आहे. लक्षात घ्या, देशातील इतर राज्यांमध्ये या किमतीत काही फरक दिसून येऊ शकतो. ही बाईक लोनवर खरेदी करण्यासाठी तुम्हाला 2,17,100 रुपयांचे कर्ज मिळेल. ही कर्जाची रक्कम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असते. जेवढा तुमचा खरेदी स्कोअर चांगला तेवढे लवकर लोन मिळण्याची शक्यता जास्त.
रॉयल एनफील्ड क्लासिक 350 खरेदी करण्यासाठी सुमारे 11,500 रुपये डाउन पेमेंट म्हणून जमा करावे लागतील. जर बँक तुमच्या कर्जावर 9 टक्के व्याज आकारते आणि हे कर्ज तुम्ही दोन वर्षांसाठी घेतले तर तुम्हाला दरमहा 10,675 रुपयांचा ईएमआय म्हणून जमा करावा लागेल. याशिवाय, जर तुम्ही क्लासिक 350 साठी तीन वर्षांचे कर्ज घेतले तर तुम्हाला 9 टक्के व्याजदराने दरमहा 7,650 रुपयांचा ईएमआय जमा करावा लागेल.
जर तुम्ही रॉयल एनफील्ड बाईक खरेदी करण्यासाठी बँकेकडून चार वर्षांचे कर्ज घेतले तर 48 महिन्यांसाठी दरमहा 6,150 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. लक्षात घ्या, वेगवेगळ्या बँका आणि त्यांच्या धोरणांनुसार या किमतीत फरक दिसू शकतो. कर्ज घेण्यापूर्वी सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचणे अत्यंत महत्वाचे आहे.