फोटो सौजन्य: AI
Mahindra & Mahindraने आपल्या INGLO प्लॅटफॉर्मवर आधारित इलेक्ट्रिक SUVच्या विक्रीमध्ये मोठा टप्पा गाठला आहे. XEV 9e, BE 6 आणि XEV 9S या 3 इलेक्ट्रिक SUVची एकत्रित विक्री 1 लाख युनिट्सच्या पुढे गेली आहे. XEV 9e आणि BE 6चे पदार्पण 26 नोव्हेंबर 2024 रोजी झाले होते. त्यामुळे 2 वर्षे पूर्ण होण्याआधीच या इलेक्ट्रिक रेंजने हा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
पहिल्याच दिवशी मिळाले 30,179 बुकिंग्स
XEV 9e आणि BE 6च्या सुरुवातीच्या प्रतिसादाने महिंद्राला मोठा विश्वास दिला होता. या दोन्ही SUVसाठी पहिल्याच दिवशी तब्बल 30,179 बुकिंग्स मिळाल्या. मार्च 2025 मध्ये कस्टमर डिलिव्हरी सुरू झाल्यानंतर एप्रिलपर्यंत 3,000हून जास्त युनिट्स कस्टमर्सपर्यंत पोहोचल्या. नोव्हेंबर 2025 पर्यंत या दोन्ही मॉडेल्सची 30,000हून जास्त युनिट्स डिलिव्हर करण्यात आली.
महिंद्राचा SUV मार्केटमध्ये दबदबा! सप्टेंबरमध्ये 64 हजारांहून जास्त गाड्यांची विक्री
XEV 9Sने वाढवली रेंज
यानंतर XEV 9Sच्या रूपाने या इलेक्ट्रिक फॅमिलीमध्ये 3-रो SUVची भर पडली. या मॉडेलच्या कस्टमर डिलिव्हरी 23 जानेवारी 2026 पासून सुरू झाल्या. XEV 9Sमध्ये 59 kWh, 70 kWh आणि 79 kWh असे 3 बॅटरी ऑप्शन आहेत. 79 kWh व्हर्जनमध्ये 282 hp पॉवर आणि 380 Nm टॉर्क मिळतो. या बॅटरीला 180 kW DC फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे आणि 20 ते 80% चार्जिंगसाठी सुमारे 20 मिनिटे लागतात.
BE 6 आणि XEV 9eची रेंजही दमदार
BE 6 आणि XEV 9eमध्ये 59 kWh आणि 79 kWh LFP बॅटरीचे ऑप्शन मिळतात. 79 kWh व्हर्जनमध्ये 286 hp पॉवर आणि 380 Nm टॉर्क मिळतो. MIDCनुसार BE 6ची जास्तीत जास्त रेंज 683 km, तर XEV 9eची 656 km आहे. 175 kW चार्जरच्या मदतीने 79 kWh बॅटरी 20 ते 80% चार्ज करण्यासाठी 20 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो.
पुढचा नंबर BE 7चा
या 3 SUVमध्ये INGLO स्केटबोर्ड आर्किटेक्चर आणि MAIA इलेक्ट्रॉनिक्स प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला आहे. ADAS, मल्टिपल ड्राइव्ह मोड्स, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग आणि प्रीमियम ऑडिओ सिस्टमसारखी फीचर्सही मिळतात. आता महिंद्राची पुढची मोठी इलेक्ट्रिक SUV BE 7 असणार आहे. ही 5-सीटर SUV 2027 मध्ये लाँच होण्याची अपेक्षा असून, त्यामुळे कंपनीच्या EV लाइनअपमध्ये आणखी विस्तार होणार आहे.






