Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahindra Bolero साठी आता मोजावे लागणार जास्त पैसे! कंपनीने केली नव्या किंमतीची घोषणा, या कारणामुळे घेतला निर्णय

Mahindra Bolero New Prices: महिंद्राने त्यांच्या लोकप्रिय Bolero लाइनअपच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. उत्पादन खर्च वाढल्यामुळे कंपनीने बोलेरो क्लासिक, निओ आणि निओ प्लस मॉडेल्सच्या एक्स-शोरूम किंमतीत वाढ केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 09, 2026 | 10:56 AM
Mahindra Bolero साठी आता मोजावे लागणार जास्त पैसे! कंपनीने केली नव्या किंमतीची घोषणा, या कारणामुळे घेतला निर्णय

Mahindra Bolero साठी आता मोजावे लागणार जास्त पैसे! कंपनीने केली नव्या किंमतीची घोषणा, या कारणामुळे घेतला निर्णय

Follow Us
Follow Us:
  • Mahindra ने Bolero Classic, Neo आणि Neo Plus मॉडेल्सच्या किंमतीत 26,500 रुपयांपर्यंत वाढ केली आहे.
  • Bolero Classic च्या B6 आणि B6 (O) व्हेरिअंट्सवर सर्वाधिक किंमतवाढ करण्यात आली आहे.
  • वाढलेल्या किंमती असूनही Mahindra ने गाड्यांचे इंजिन आणि फीचर्स पूर्वीप्रमाणेच कायम ठेवले आहेत.
वाहन निर्माता Mahindra ने त्यांच्या मजबूत Bolero लाइनअपच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्व ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. कंपनीने केलेल्या या घोषणेनंतर बोलेरो क्लासिक, निओ आणि निओ प्लस मॉडेल्सवर नव्या किंमती त्वरित लागू करण्यात आल्या आहेत. म्हणजेच आता ग्राहकांना महिंद्राच्या बोलेरो लाइनअपमधील मॉडेल्स खरेदी करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार आहेत. गाडीच्या वेगवेगळ्या मॉडेल्सच्या हिशोबाने एक्स-शोरूम किंमतींमध्ये 26,500 रुपयांपर्यंत वाढ केली जाणार आहे. उत्पादन खर्च वाढल्याने कंपनीने हा मोठा निर्णय जाहिर केला आहे.

Harley Davidson Sprint 440: भारतात तयार होणारी सर्वात स्वस्त हार्ले, जाणून घ्या फीचर्स आणि लाँच डेट

मजबूती आणि परफॉर्मंस

4-मीटरहून छोट्या कार्स आणि त्यापेक्षा थोड्या मोठ्या सेगमेंटमध्ये महिंद्रा एकमेव अशी कंपनी आहे जी, पारंपरिक बॉडी-ऑन-फ्रेम वाहनांचे उत्पादन करते. बोलेरो गाड्या विशेषत: भारतातील विविध प्रकारच्या रस्त्यांसाठी डिझाईन केल्या जातात. या गाड्यांमध्ये एक साधे इंजिन आणि मजबुतीवर भर देणारी एक साधी केबिन आहे. कंपनीने बदललेल्या किंमतींची घोषणा केल्यानंतर आता जे ग्राहक गाडीचे मिड रेंज व्हेरिअंट खरेदी करतील, त्यांना वाढलेल्या किमतींचा सर्वाधिक फटका बसेल. (फोटो सौजन्य – Pinterest) 

महिंद्रा बोलेरो ची किंमत वाढली

महिंद्रा बोलेरो क्लासिक B4, B6, B6 (O) आणि B8 या चार व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. B4 व्हेरिअंटच्या किंमतीत केवळ 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या व्हेरिअंटची एक्स-शोरूम किंमत आज देखील 7.99 लाख रुपये आहे. तर B6 व्हेरिअंटच्या किंमतीत तब्बल 25,500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर B6 (O) व्हेरिअंटच्या किंमतीत 26,500 रुपयांची आणि B8 व्हेरिअंटच्या किंमतीत 21,500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता या व्हेरिअंटची एक्स-शोरूम किंमत 9.90 लाख रुपये झाली आहे. या सर्व मॉडेल्समध्ये आधीप्रमाणेच 1.5 लीटर mHAWK 75 डिझेल इंजिन मिळते, ज्यामध्ये 5-स्पीड मॅनुअल गियरबॉक्स देण्यात आला आहे.

बोलेरो निओ च्या नव्या किंमती

महिंद्रा बोलेरो निओ N4, N8, N10 (R), N11 आणि N10 (O) या पाच व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. या गाडीच्या बेस मॉडेल N4 च्या किंमतीत सर्वाधिक 15,500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर N8 मॉडेलच्या किंमतीत 5,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत अंदाजे 8.84 लाख रुपये झाली आहे.

Maruti Grand Vitara बेस व्हेरिअंट खरेदी करायचंय? 2 लाख डाउन पेमेंटनंतर किती बसेल EMI? संपूर्ण हिशोब समजून घ्या

बोलेरो निओ प्लस

बोलेरो निओ प्लस P4 आण P10 या दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. याच्या बेस मॉडेल (P4) च्या किंमताीत 9,500 रुपयांची वाढ झाली आहे. तर P10 व्हेरिअंटची किंमत 4,500 रुपयांनी वाढली आहे. या 7-सीटर गाडीची एक्स-शोरूम किंमत 10.99 लाख रुपये ते 11.99 लाख रुपयांदरम्यान आहे. निओ प्लसमध्ये स्कॉर्पिओ क्लासिकप्रमाणेच 2.2-लिटरचे डिझेल इंजिन आहे.

Web Title: Mahindra increases bolero range prices by up to 26500 rupees auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 10:56 AM

Topics:  

  • auto news
  • cars
  • Mahindra

संबंधित बातम्या

कियाचा मोठा धमाका! कियाच्या ३ नवीन एसयूव्ही लवकरच येणार मार्केटमध्ये!
1

कियाचा मोठा धमाका! कियाच्या ३ नवीन एसयूव्ही लवकरच येणार मार्केटमध्ये!

२०२७ पूर्वी भारतात होणार ‘या’ नवीन इलेक्ट्रीक कार लॉन्च! संपूर्ण यादी जाणून घ्या
2

२०२७ पूर्वी भारतात होणार ‘या’ नवीन इलेक्ट्रीक कार लॉन्च! संपूर्ण यादी जाणून घ्या

निसान टेक्टॉनचा पहिला लूक समोर; ‘बेबी पेट्रोल’ म्हणून मारणार एन्ट्री
3

निसान टेक्टॉनचा पहिला लूक समोर; ‘बेबी पेट्रोल’ म्हणून मारणार एन्ट्री

भारतीय कार बाजारातील ‘इमोशनल गेम’! भारतीयांसाठी कार म्हणजे केवळ प्रवास की स्टेटस?
4

भारतीय कार बाजारातील ‘इमोशनल गेम’! भारतीयांसाठी कार म्हणजे केवळ प्रवास की स्टेटस?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.