Harley Davidson Sprint 440: भारतात तयार होणारी सर्वात स्वस्त हार्ले, जाणून घ्या फीचर्स आणि लाँच डेट
हार्ले-डेव्हिडसनच्या माजी सिईओने गेल्यावर्षी स्प्रिंट 440 बाबत घोषणा केली होती. आता कंपनीने या आगामी बाईकचे एक स्केच जारी केले आहे. या स्केचवरून बाईकचे डिझाईन ओळखले जाऊ शकते. एक्स 440 आणि एक्स 440 टी यांचे डिझाईन चाहत्यांच्या अपेक्षांपेक्षा थोडे वेगळे असले तरी, नवीन स्प्रिंट ही हार्लेच्या मूळ शैलीकडे परत येत असल्याचे दिसते. (फोटो सौजन्य – Pinterest)
ही एक लांब आणि कमी उंचीची पारंपरिक क्रूजर बाईक आहे. स्केचवरून असा अंदाज लावला जात आहे की, यामध्ये मागील चाक छोटे आणि समोरील चाक मोठे आहे. मागील चाक 16-इंच आणि पुढील चाक 19-इंच असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी बाईकच्या सीटची उंची सध्याच्या 440 मॉडेल्सच्या तुलनेत कमी असण्याची शक्यता आहे. कमी उंची आणि नवीन राइ़डर्ससाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण त्यांना सहज बॅलेन्स करता येणार आहे.
यामध्ये टीयरड्रॉपच्या आकाराचे फ्यूल टँक आहे, जे राइडरच्या सीटकडे खाली उतरते आणि नंतर पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीसाठी किंचित वर चढते. यामध्ये छोटा मागील फेंडर दिला आहे आणि हेडलाइट पुढे आलेला आहे. याचे इंजिन सध्याच्या 440 मॉडेल्ससारखे असण्याची शक्यता आहे. यामध्ये 440cc चे सिंगल सिलिंडर इंजिन आहे, जे 27hp ची पॉवर आणि 38nm चे टॉर्क जनरेट करते.
नवीन स्प्रिंट 440 मध्ये कोणते फीचर्स दिले जाणार, याबाबत यूजर्समध्ये आता प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या x440 T मध्ये राइड-बाय-वायर आणि ट्रॅक्शन कंट्रोल सारखे फीचर्स देण्यात आले होते. त्यामुळे आता अशी शक्यता आहे की, X440 प्रमाणेच नवीन बाईकमध्ये देखील अधिक चांगली क्वालिटी आणि फिनिशिंग पाहायला मिळू शकते. सध्या भारतात उपलब्ध असलेल्या हार्ले डेव्हिडसन बाईक्सच्या किमतींबद्दल बोलायचे झाल्यास, स्टँडर्ड एक्स440 ची एक्स-शोरूम किंमत 2.35 लाख ते 2.59 लाख रुपयांपर्यंत आहे. तर, एक्स 44O टी ची एक्स-शोरूम किंमत 2.85 लाख रुपये आहे.
अशी आशा आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर लाँच झाल्यानंतर स्प्रिंट 440 भारतात 2026 च्या अखेपर्यंत विक्रीसाठी येऊ शकते.






