Maruti Grand Vitara बेस व्हेरिअंट खरेदी करायचंय? 2 लाख डाउन पेमेंटनंतर किती बसेल EMI? संपूर्ण हिशोब समजून घ्या
मारुती ग्रँड विटाराचे बेस व्हेरिअंट म्हणून Sigma सादर करण्यात आले आहे. कंपनीने या मिड-साइज एसयूवीचे बेस व्हेरिअंट 10.76 लाख रुपयांच्या एक्स शोरूम किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. जर तुम्ही दिल्लीमध्ये ही गाडी खरेदी करणार असाल तर याच्या 10.76 लाख रुपयांच्या एक्स शोरूम किंमतीवर रजिस्ट्रेशन, इंश्योरेंस शुल्कही भरावे लागेल. ही गाडी खरेदी करण्यासाठी सुमारे 80 हजार रुपयांचा रजिस्ट्रेशन टॅक्स, सुमारे 47 हजार रुपये इंश्योरेंससाठी खर्च करावे लागणार आहेत. यासोबतच 10700 रुपये टीसीएस चार्ज देखील भरावा लागणार आहे. यानंतर दिल्लीमध्ये गाडीची ऑन रोड किंमत 12.16 लाख रुपये होणार आहे. (फोटो सौजन्य – Maruti)
जर तुम्ही मारुती ग्रँड विटाराचे बेस व्हेरिअंट सिग्मा खरेदी करत असाल तर बँक तुम्हाला एक्स-शोरूम किंमतीवर कर्ज देईल. दोन लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सुमारे 10.16 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागणार आहे. जर बँकेने तुम्हाला सात वर्षांसाठी 9% व्याजाने 10.16 रुपयांचे लाखांचे कर्ज दिले, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी फक्त 16352 रुपयांचा मासिक ईएमआय भरावा लागेल.
जर तुम्ही 9 टक्के व्याजाने सात वर्षांसाठी 10.16 लाख रुपयांचे कार लोन घेतले, तर तुम्हाला सात वर्षांपर्यंत दर महिन्याला 16352 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. या हिशोबानुसार, तुम्ही सात वर्षांमध्ये मारुती ग्रँड विटाराच्या बेस व्हेरिअंट सिग्मासाठी 3.57 लाख रुपये केवळ व्याजासाठी खर्च करावे लागणार आहेत. यानंतर एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याजासह तुमच्या कारची एकूण किंमत अंदाजे 15.73 लाख रुपये होणार आहे.






