महिंद्रातर्फे XUV 3XO REVX सिरीज लाँच, प्रीमियम फीचर्ससह मिळणार दमदार परफॉर्मन्स
भारतातील अग्रगण्य SUV उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आज त्यांच्या लोकप्रिय XUV 3XO चे नवीन व्हेरिएंट्स असलेल्या REVX सीरिजचे लाँचिंग केले. REVX सिरीजची सुरुवात आकर्षक ₹८.९४ लाख (एक्स-शोरूम) पासून होत असून, यात दमदार डिझाइन, प्रीमियम फीचर्स आणि उत्कृष्ट परफॉर्मन्सचा संगम साधण्यात आला आहे.
महिंद्राची XUV 3XO ही SUV अल्पावधीतच १ लाखांहून अधिक विक्रीचा टप्पा पार करून कंपनीची सर्वाधिक वेगाने विकली जाणारी SUV ठरली आहे. REVX सीरिजच्या माध्यमातून XUV 3XO चा पोर्टफोलिओ अधिक व्यापक होणार असून, ग्राहकांच्या स्टाइल, परफॉर्मन्स आणि कंफर्टसंबंधित अपेक्षा अधिक प्रभावीपणे पूर्ण करण्यात येणार आहेत.
‘डिफरंट इज इन’ या टॅगलाइनसह सादर करण्यात आलेली REVX सीरिज ही विशेषतः वेगळेपण जपणाऱ्या, स्टाईलसह तडका असलेल्या SUV पसंत करणाऱ्यांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. यामध्ये तीन प्रमुख व्हेरिएंट्स – REVX M, REVX M(O) आणि REVX A – सादर करण्यात आले आहेत.
आता ‘या’ कारच्या बॅटरीचे टेन्शन विसरा ! टाटा मोटर्सकडून मिळतेय लाइफटाइम बॅटरी वॉरंटी
या व्हेरिएंटमध्ये 1.2L mStallion TCMPFi इंजिन असून ते ८२ किलोवॅट पॉवर आणि २०० एनएम टॉर्क प्रदान करते. याचे खास एक्सटेरियर्स फीचर्स म्हणजे बॉडी-कलर्ड फ्रंट ग्रिल, फुल-विड्थ एलईडी डीआरएल, ब्लॅक व्हील कव्हर्स आणि ड्युएल टोन रूफ. आतून, ब्लॅक लेदरेट सीट्स, २६.०३ सेमी इन्फोटेनमेंट सिस्टीम, स्टिअरिंग माउंटेड ऑडिओ कंट्रोल्स आणि ४-स्पीकर साऊंड सिस्टीम इमर्सिव्ह अनुभव देतात. सुरक्षेसाठी ६ एअरबॅग्स, ESC, हिल-होल्ड कंट्रोल आणि सर्व चार डिस्क ब्रेक्ससह ३५ अत्याधुनिक फीचर्सचा समावेश आहे.
REVX M वर आधारित हा व्हेरिएंट सिंगल पेन सनरूफ, क्रोम फिनिश आणि अधिक प्रीमियम इंटेरियर्ससह येतो. ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक आरामदायक बनवण्यासाठी यात सनरूफ, अधिक सुसज्ज डिझाइन आणि टच पॉइंट्सवर दर्जेदार फिनिश देण्यात आले आहे.
विद्यार्थी, व्यावसायिक व गिग वर्कर्ससाठी बेस्ट स्कूटर मिळाली ! सुरवातीची किंमत फक्त 54000 रुपये
या टॉप-एंड व्हेरिएंटमध्ये १.२ L TGDi mStallion इंजिन असून ते ९६ किलोवॅट पॉवर आणि २३० एनएम टॉर्क निर्माण करते. यामध्ये मॅन्युअल तसेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय आहे. REVX A मध्ये पॅनोरमिक सनरूफ, लेदर सीट्स, ड्युएल टोन इंटेरियर्स, ऑटो डिमिंग IRVM, आणि सिग्नेचर ब्लॅक अलॉय व्हील्स आहेत.
आधुनिक कनेक्टिव्हिटीसाठी ट्विन HD २६.०३ सेमी डिस्प्ले, बिल्ट-इन अलेक्सा, ऑनलाइन नेव्हिगेशन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो व अॅपल कारप्ले देण्यात आले आहे. अड्रेनॉक्स कनेक्ट, क्रूझ कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग, आणि ड्युएल झोन क्लायमेट कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये REVX A ला एक प्रीमियम SUV बनवतात.
REVX सीरिज पाच आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे – गॅलेक्सी ग्रे, टँगो रेड, नेब्युला ब्लू, एव्हरेस्ट व्हाइट आणि स्टेल्थ ब्लॅक.