फोटो सौजन्य: @dhram_goswami (X.com)
भारतात अनेक उत्तम एसयूव्ही उत्पादक कंपन्या आहेत, त्यातीलच एक आघाडीची कंपनी म्हणजे Mahindra. महिंद्राने देशात अनेक उत्तम आणि दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर केल्या आहेत. एवढेच नव्हे तर कंपनीने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये देखील आपले पहिले पाऊल टाकले आहे. काही महिन्यनपूर्वीच कंपनीने BE 6 आणि XEV 9e या इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच केल्या होत्या. पण आता चक्क कंपनीने आपल्या लोकप्रिय Mahindra Thar चे 8 व्हेरियंट्स बंद केले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने महिंद्रा थारचे आठ व्हेरियंट बंद केले आहेत. त्यानंतर ही एसयूव्ही आता किती व्हेरियंटमध्ये सादर केली जाईल. कोणत्या कारणांमुळे याचे व्हेरियंट बंद झाले आहेत, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Odysse Electric कडून भारतातील सर्वात स्वस्त स्पोर्ट्स बाईक लाँच, किंमत फक्त…
माहितीनुसार, AX(O) आणि LX मध्ये देण्यात येणारे कन्व्हर्टिबल टॉप व्हेरियंट बंद करण्यात आले आहेत. यासोबतच, ओपन डिफरेंशियल असलेले त्याचे AX(O) 4WD आणि LX व्हेरियंट देखील बंद करण्यात आले आहेत. परंतु हे व्हेरियंट अद्याप कंपनीच्या वेबसाइटवरून काढून टाकण्यात आलेले नाहीत, परंतु लवकरच वेबसाइटवर हे अपडेट होण्याची शक्यता आहे.
कंपनीने आठ व्हेरियंट काढून टाकल्यानंतर, आता एसयूव्हीचे फक्त 11 व्हेरियंट निवडता येणार आहे. पूर्वी एसयूव्हीचे 19 व्हेरियंट ऑफर केले जात होते.
अहवालांनुसार, कंपनी महिंद्रा थार अपडेट करण्याची तयारी करत आहे. ज्यामुळे त्याचे काही व्हेरियंट बंद करण्यात आले आहेत. एसयूव्हीच्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये अनेक नवीन फीचर्स जोडले जाऊ शकतात. यासोबतच, या एसयूव्हीचे डिझाइन देखील थार रॉक्ससारखे ठेवता येईल. परंतु त्याच्या इंजिनमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता खूपच कमी असेल.
याबद्दल कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, परंतु 2026 पर्यंत महिंद्रा थारचे फेसलिफ्ट व्हर्जन भारतात लाँच केले जाऊ शकते अशी अपेक्षा आहे.
Royal Enfield ची ‘ही’ बाईक ग्राहकांच्या मनातून काही केल्या उतरेना, विक्रीत पटकावला टॉपचा नंबर
महिंद्रा थार एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 11.50 लाख रुपये देते. त्याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 17.60 लाख रुपयांपर्यंत आहे.
महिंद्रा एसयूव्ही सेगमेंटमध्ये थार ऑफर करते. ही कार तीन दरवाज्यांसह येते. ही एसयूव्ही ऑटो बाजारात इतर कोणत्याही एसयूव्हीशी स्पर्धा करत नाही. परंतु किंमत आणि ऑफ-रोडिंग क्षमतेच्या बाबतीत, या एसयूव्हीला Maruti Suzuki Jimny आणि Force Gurkha सारख्या एसयूव्हींकडून स्पर्धा करावी लागते.