फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये रॉयल एन्फिल्डच्या बाईकला नेहमीच चांगली मागणी पाहायला मिळते. विशेषकरून तरुणांमध्ये कंपनीच्या बाईक्सची वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. आज प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते की आपल्याकडे रॉयल एन्फिल्डची बाईक असावी. हीच मागणी पाहून कंपनी देखील मार्केटमध्ये दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या बाईक ऑफर करत असते. पण मार्च 2025 मध्ये कंपनीच्या एका बाईकच्या विक्रीत 30 टक्क्यांची वाढ झाली आहे.
जर आपण गेल्या महिन्यात म्हणजेच मार्च 2025 मध्ये झालेल्या विक्रीबद्दल बोललो तर पुन्हा एकदा Royal Enfield Classic 350 ने टॉपचा नंबर पटकावला आहे. या काळात रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ने एकूण 33,115 बाईक्स विकल्या आहेत, ज्यामध्ये वार्षिक आधारावर 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर अगदी १ वर्षापूर्वी म्हणजेच मार्च 2024 मध्ये हा आकडा 25,508 युनिट्स इतका होता. गेल्या महिन्यात कंपनीच्या इतर मॉडेल्सच्या विक्रीबद्दल देखील आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
मागील 12 महिन्यात ग्राहकांवर ‘या’ बाईकने केली जादू ! Activa, Shine आणि Pulsar ला टाकले मागे
या विक्रीच्या यादीत रॉयल एनफील्ड बुलेट 350 दुसऱ्या क्रमांकावर आहे. मार्चमध्ये बुलेट 350 ने एकूण 21,987 बाईक विकल्या, ज्यामध्ये वर्ष-दर-वर्ष 95 टक्क्यांची वाढ झाली आहे. या विक्रीच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर रॉयल एनफील्ड हंटर 350 आहे. हंटर 350 चे एकूण 16,958 बाईक विकल्या आहेत, ज्यामध्ये वर्ष-दर-वर्ष 8 टक्क्यांची वाढ झाली आहे. चौथ्या क्रमांकावर रॉयल एनफील्ड मेटीओर 350 आहे. या बाईकचे एकूण 8,912 युनिट्स विकल्या, ज्यामध्ये वर्ष-दर-वर्ष 1 टक्क्यांची घट दिसून आली.
दुसरीकडे, रॉयल एनफील्ड 650 ट्विन या विक्रीच्या यादीत पाचव्या स्थानावर होती. या बाईकचे एकूण 3,328 युनिट्स विकल्या आहेत, ज्यात वार्षिक आधारावर 53 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर रॉयल एनफील्ड हिमालयन सहाव्या स्थानावर राहिली आहे. रॉयल एनफील्ड हिमालयनने मार्च 2025 मध्ये एकूण 1,628 बाईक विकल्या, ज्यात वार्षिक आधारावर 27 टक्क्यांची घट दिसून आली आहे. तर रॉयल एनफील्ड सुपर मेटीओर आठव्या स्थानावर राहिली होती. या बाईकचे एकूण 1,067 युनिट्स विकल्या, ज्यात वार्षिक आधारावर 389 टक्क्यांची वाढ झाली आहे.
या विक्रीच्या यादीत रॉयल एनफील्ड गुरिल्ला 450 आठव्या स्थानावर होती. तर गेल्या महिन्यात या बाईकला एकूण 831 नवीन खरेदीदार मिळाले. याशिवाय रॉयल एनफील्ड शॉटगन नवव्या आणि शेवटच्या स्थानावर होती. या कालावधीत रॉयल एनफील्ड शॉटगनला एकूण 224 नवीन ग्राहक मिळाले.