Odysse Electric कडून भारतातील सर्वात स्वस्त स्पोर्ट्स बाईक लाँच, किंमत फक्त...
एक काळ होता जेव्हा भारतीय रस्त्यांवर फक्त इंधनावर चालणाऱ्या बाईक्सच मोठ्या प्रमाणात धावयाच्या. पण आज हे चित्र बदलताना दिसत आहे. आता भारतीय रस्त्यांवर इलेक्ट्रिक वाहनं देखील मोठ्या प्रमाणात धावताना दिसत आहे. यात इलेक्ट्रिक बाईक आणि कार्सची संख्या जास्त आहे.
मार्केटमध्ये अनेक ऑटो कंपन्या चांगली रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक बाईक लाँच करत आहे. आता तर स्पोर्टी लूकमध्ये देखील इलेक्ट्रिक बाईक लाँच झाली आहे, ज्याची किंमत अगदी मापक ठेवण्यात आली आहे.
वाह बॉस काय कार आहे ! नवीन Range Rover Evoque Autobiography भारतात लाँच, किंमत असेल…
दि. 28 एप्रिल 2025 रोजी, Odysse Electric ने देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईक लाँच केली आहे. ही बाईक कोणत्या किंमतीत लाँच केली गेली आहे? ती कोणत्या प्रकारच्या फीचर्ससह ऑफर केली जात आहे, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
ओडिसी इलेक्ट्रिकने भारतातील सर्वात स्वस्त स्पोर्ट्स इलेक्ट्रिक बाईक लाँच केली आहे. या बाईकला Evoqis Lite असे नाव देण्यात आले आहे. कंपनीच्या मते, बाईकमध्ये 60V बॅटरी आहे. जी पूर्ण चार्ज केल्यानंतर 90 किलोमीटरपर्यंत चालवता येते. यासोबतच, त्यात बसवलेली मोटर या बाईकला जास्तीत जास्त 75 किलोमीटर प्रति तासाची स्पीड देते.
ओडिसी इलेक्ट्रिक बाईक इव्होकिस लाइटमध्ये अनेक उत्तम फीचर्स दिले आहेत. यात कीलेस इग्निशन, मल्टीपल ड्रायव्हिंग मोड्स, मोटर कट-ऑफ स्विच, अँटी-थेफ्ट लॉक, आणि स्मार्ट बॅटरी उपलब्ध आहे. ही बाईक Cobalt Blue, Fire Red, Lime Green, Magna White and Black रंगांच्या ऑप्शन आहेत.
Royal Enfield ची ‘ही’ बाईक ग्राहकांच्या मनातून काही केल्या उतरेना, विक्रीत पटकावला टॉपचा नंबर
नवीन बाईकच्या लाँचिंगच्या वेळी, ओडिसी इलेक्ट्रिकचे संस्थापक नामीन व्होरा म्हणाले की, या लाँचिंगसह, आम्ही स्पोर्टी राइड्स पूर्वीपेक्षा अधिक उत्तम करत आहोत. ही बाईक परफॉर्मन्स आणि परवडणारी किंमत यांचे उत्तम मिश्रण आहे. ही बाईक त्या लोकांसाठी बनवली आहे ज्यांना कोणत्याही तडजोडशिवाय थ्रिल हवे आहे आणि त्याच वेळी पर्यावरणाला हानी पोहोचवू इच्छित नाही.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Odysse Electric Evoqis Lite बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.18 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
ओडिसीची नवीन बाईक इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. या सेगमेंटमध्ये, ती Revolt, Oben Rorr, Ola, Kabira, Matter सारख्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक बाईक्सशी थेट स्पर्धा करेल.