
Thar OG मध्ये आता हायड्रॉलिकऐवजी इलेक्ट्रिक पॉवर स्टीयरिंग, पुश-बटन स्टार्ट, 18-इंच स्टील व्हील्स आणि दुसऱ्या रांगेत सॉफ्ट आर्मरेस्ट मिळतो. मागच्या मॉडेलमध्ये असलेले रिअर AC व्हेंट्स, ड्युअल एअरबॅग्स, ESP, रोलओव्हर मिटिगेशन आणि हाइट-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीटही कायम आहेत. त्यामुळे रोजच्या वापरात स्टीयरिंग आणि केबिन कम्फर्टमध्ये फरक जाणवू शकतो.
Mahindra Thar OG भारतात लॉन्च; किंमत Rs. 10.32 लाखांपासून सुरु! पाहा फीचर्स आणि इंटेरियर
यातील मोठा बदल गाडीच्या प्लॅटफॉर्ममध्ये करण्यात आला आहे. Thar OG आता M_Glyde 4G प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. यामध्ये जास्त स्ट्रक्चरल स्टिफनेससोबत रिअर Pentalink सस्पेंशन आणि Watts Link देण्यात आला आहे. NVH डॅम्पिंगमध्येही सुधारणा करण्यात आली असून ZXT व्हेरिएंटमध्ये Frequency Dependent Damping मिळते. या बदलांचा उद्देश राइड क्वालिटी, स्टीयरिंग आणि कॉर्नरिंग स्थिरता सुधारण्याचा आहे.
LXT च्या 4-व्हील-ड्राइव्ह व्हर्जनमध्ये Electronic Locking Differential तसेच Mud, Sand आणि Snow टेरेन मोड्स मिळतात. काही RWD व्हेरिएंट्समध्ये Terrain Assist देण्यात आला आहे. रंगीत MID आणि 10.25-इंच टचस्क्रीनसह Android Auto, Apple CarPlay आणि क्रूझ कंट्रोलही मिळतात.
महिंद्रा XUV 3XO REVX EDGE लाँच; ₹10 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळणार पॅनोरॅमिक सनरूफचा ऑप्शन
इंजिनमध्येही जास्त पॉवर मिळते. 2.2-लिटर mHawk आता सुमारे 150 hp आणि 330 Nm, तर 2.0-लिटर mStallion सुमारे 160 hp आणि 330 Nm देते. 1.5-लिटर डिझेल 117 hp आणि 300 Nm देते. टॉप ZXT मध्ये 6 एअरबॅग्स, फ्रंट-रिअर डिस्क ब्रेक्स, वायरलेस चार्जिंग, 19-इंच अलॉय व्हील्स, LED लॅम्प्स आणि फ्रंट पार्किंग सेन्सर्स मिळतात. कस्टमर्सना डिलिव्हरी 11 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.